श्री निखिल बल्लाळ यांच्या ‘Know Your Town’ ला ‘बिझनेस मॅगझीन ऑफ द ईअर’ सन्मान !

श्री निखिल बल्लाळ यांच्या ‘Know Your Town’ ला ‘बिझनेस मॅगझीन ऑफ द ईअर’ सन्मान !

अर्थसंकेत प्रस्तुत अर्थ साक्षर पुरस्कार २०२० सोहळा बुधवार २३ डिसेंबर २०२० रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे संपन्न झाला. कार्यक्रमात श्री निखिल बल्लाळ ‘Know Your Town’ ला ‘बिझनेस मॅगझीन ऑफ द ईअर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बी एस ई इन्व्हेस्टमेंटचे व्यवस्थापकीय संचालक श्री शंकर जाधव, अर्थसंकेतचे डॉ अमित बागवे व सौ रचना बागवे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘Know Your Town’ या मासिका अंतर्गत श्री निखिल बल्लाळ यांनी आतापर्यंत २०० हुन अधिक उद्योजकांच्या मुलाखती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. श्री निखिल बल्लाळ हे १९७५ साली सुरु झालेल्या ‘ठाणे वैभव’ या वर्तमानपत्राचे ‘कार्यकारी संपादक’ म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. जोशी बेडेकर महाविद्यालयांत त्यांनी शिक्षकाची नोकरी सुद्धा केली आहे. तसेच ‘ए बी पी माझा’ वृत्तवाहिनीमध्ये पोलिटिकल रिपोर्टर या पदावर काम केले आहे.

ठाणे शहरामध्ये ‘हो रिक्षावाला’, ‘प्लास्टिक मुक्त शहर’, ‘माझा नगरसेवक’, ‘सूर्यनमस्कार, ‘आर्यन वुमन’ असे विविध कार्यक्रम श्री निखिल बल्लाळ यांनी राबविले आहेत.

Know Your Town
Know Your Town

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *