महाइंडेक्स मेगा इंडस्ट्रीयल एक्सपोचे सिडको एक्झिबिशन सेंटर नवी मुंबईनगरीत श्री उदय सामंत उद्योग मंत्री सन्माननीय पाहुणे यांच्या उपस्थितीत सन्मा श्री.एकनाथ शिंदे, मा.मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे उदघाटन करणार

महाइंडेक्स मेगा इंडस्ट्रीयल एक्सपोचे सिडको एक्झिबिशन सेंटर नवी मुंबईनगरीत श्री उदय सामंत उद्योग मंत्री सन्माननीय पाहुणे यांच्या उपस्थितीत सन्मा श्री.एकनाथ शिंदे, मा.मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे उदघाटन करणार

नवी मुंबई दि. 30 : महा इंडेक्स २०२३ हे औद्योगिक प्रदर्शन सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी, नवी मुंबई येथे 1 ते 3 जून 2023 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.

चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्स (COSIA) व महाराष्ट्रातील सुमारे ३५ औद्योगिक संघटना प्रथमच एका छताखाली नेटवर्कसाठी एकत्र येणार असल्याने हे महाराष्ट्रातील पहिले मेगा इंडस्ट्रियल एक्स्पो (MahaindX) आहे.

महाइंडेक्स मध्ये सुमारे 150 उद्योजक त्यांची उत्पादने प्रदर्शित करणार आहेत. त्यामुळे लघुउद्योगांकडे उपलब्ध असणारे आधुनिक तंत्रज्ञान बघण्याची संधी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या उद्योजकांना मिळेल .

ह्या एक्स्पो मध्ये अभियांत्रिकी आणि त्यासंलग्न उद्योगांसाठी संभाव्य खरेदीदार आणि पुरवठादारांशी संपर्क साधण्यासाठी B2B मॅच मेकिंगच्या संधी उपलब्ध होतील. आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिष्ट मंडळ सहित काही देशांचे दूत व वाणिज्य अधिकारी तसेच जर्मनी, इंडोनेशिया, फ्रांस, कोरिया, मॉरिशस तसेच अनेक देशांचे प्रतिनिधी व कंपन्या भेट देणार आहेत.

महाइंडेक्स मध्ये उद्योगांसाठी आयोजित काँक्लेव मध्ये शासनाच्या लघुउद्योगांसाठी विविध योजना, लिन मॅनुफॅक्चरिंग, फॅक्टरिंग, पॅकेज स्कीम ऑफ इंसेंटिव, डिलेड पेमेंट इत्यादी विषयांबद्दल मार्गदर्शन करण्यात येईल.

सार्वजनिकक्षेत्रातील नवरत्न कंपन्यांकडून थेट कामे मिळावी ह्या करिता कोसीआने कोंकण रेल्वे, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल, माझगाव डॉक, अटल इंक्यूबेशन सेंटर, थरमॅक्स ह्यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

महाइंडेक्स मध्ये लार्सन अँड टूब्रो, रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या नेव्हल मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी अशा दिग्गज कंपन्यांची आत्मनिर्भर भारत अंतर्गत उत्पादित प्रोडक्टस बघण्याची पर्वणी मिळणार आहे

एमएसएमई साठी एक वेगळे व्यासपीठ तयार करणे, सार्वजनिक उद्योग तसेच उद्योग क्षेत्रातील मोठ्या इंडस्ट्रीयल प्लेयर्सना जोडणे, परस्पर सहकार्य करण्यास त्यांना सक्षम करणे व नवीन व्यवसायाच्या संधींचा शोध घेण्यास सहाय्य करणे असा ह्या प्रदर्शनाचा उद्देश आहे.

सदर मेगा एक्स्पो हे एका वेगळ्या उपक्रमांचे केंद्र असेल, ज्यामध्ये व्यावसायिच्या नवीन संधी, नवीन सौदे केले जातील,
नवीन उत्पादने लाँच केली जातील आणि सामायिक ज्ञानाचे आदानप्रदान केले जाईल व्यवसाय वाढीसाठी नवीन मार्ग मिळतील.

हे औद्योगिक प्रदर्शन राज्याच्या रोजगार निर्मितीत , आर्थिक वाढीत आणि उद्योग विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

ह्या प्रदर्शनात शासनाचा सहभाग असून महाराष्ट्र शासनातर्फे महाइंडेक्स साठी पूर्ण पाठिंबा देण्याच्या सूचना संबंधित विभागास शासनातर्फे देण्यात आल्या आहेत .
नवी मुंबई महापालिकेने देखील महाइंडेक्स ला पाठिंबा दिला आहे.

महाइंडेक्स मध्ये जास्तीत जास्त उद्योजकांनी भेट द्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Maha index
Maha index

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *