अल्ट्राटेक सिमेंटला १३००/- करोड रुपयांचा नफा I Ultratech Cement profit 1,300/- Crore I

अल्ट्राटेक सिमेंटला १३००/- करोड रुपयांचा नफा

अल्ट्राटेक सिमेंटला तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ७.६% ची वाढ

अल्ट्राटेक सिमेंटला सप्टेंबर अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ७.६ टक्क्यांची वाढ झाली असून हि रक्कम रु. १३००.१/- करोड आहे. हि रक्कम विश्लेषकांच्या अपेक्षेपेक्षा कमी आहे.

कंपनीने या तिमाहीत महसुलात १५.३ टक्क्यांची वाढ केली असून हि रक्कम रु.११,५४८.४/- करोड आहे . या तिमाहीत एकूण नफा केवळ १.६ टक्क्यांनी वाढला . अहवालित तिमाही सिमेंट कंपन्यांसाठी आर्थिक दृष्टया फायदेशीर ठरली नाही कारण मान्सूनमुळे देशभरातील बहुतेक बांधकाम काम मंदावते.

कंपनीने म्हटले आहे की, रिपोर्ट केलेल्या तिमाहीत पेटकोक आणि कोळशाच्या किंमती जवळजवळ दुप्पट झाल्या आहेत, ज्यामुळे दरवर्षी ऊर्जा खर्च १७ टक्क्यांनी वाढला.

“अल्ट्राटेकला कोळसा, डिझेल आणि इतर निविष्ठांच्या किंमतीत वाढ होण्याच्या समस्येचा सामना करावा लागला,परंतु त्यांच्या शाश्वत कार्यक्षमता सुधारण्याच्या पद्धतीमुळे आणि विक्रीच्या किंमती वाढविल्याने यावर मत करणे शक्य झाले,” असे कंपनी प्रवक्त्यांनी म्हंटले.

कंपनी आशावादी आहे की सलग तिसऱ्या तिमाहीत सामान्य मान्सून आणि पायाभूत सुविधांच्या बांधकाम कार्यात वाढ झाल्यामुळे सिमेंटची मागणी वाढेल.

ultratech cement
ultratech cement

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Rachna Book English
Rachna Book English

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *