मोस्ट पॉप्युलर ब्रँड म्हणून ‘योजक फूड्सची निवड
अर्थसंकेत प्रस्तुत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड उपक्रमात झालेल्या सार्वजनिक व्होटिंग मध्ये मोस्ट पॉप्युलर ब्रँड म्हणून ‘योजक फूड्सची निवड करण्यात आली.

२०१९ मध्ये स्थापन झालेल्या ‘योजक फूड्स’ या ब्रँडमागे भिडे कुटुंबाची १९८५ पासूनची समृद्ध घरगुती पाकपरंपरा आहे.
‘फार्म टू फॅक्टरी’ या विशेष मॉडेलचा वापर करून, योजक फूड्स कोकणातील शुद्ध आणि नैसर्गिक उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवते. त्यांचे आंबा पोळी, फणस पोळी, विविध प्रकारची लोणची आणि घरगुती मसाले प्रचंड लोकप्रिय आहेत.
‘चव कोकणची, परंपरा योजकची’ हे ब्रीदवाक्य जपत, या ब्रँडने अल्पावधीतच गुणवत्ता आणि पारंपारिक चवीच्या जोरावर ग्राहकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. नैसर्गिक घटक आणि आधुनिक पॅकेजिंगचा मेळ हेच त्यांच्या यशाचे गमक आहे.

🗳️ सार्वजनिक मतदानाद्वारे ब्रँड निवड
या उपक्रमात ७ दिवसांची पारदर्शक सार्वजनिक मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. अर्थसंकेतच्या व्हॉट्सअॅप चॅनेलद्वारे घेतलेल्या मतदानात ब्रँड्सची निवड तीन प्रमुख श्रेणींमध्ये करण्यात आली.
💡 संकल्पनेमागील उद्दिष्ट
‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड’ या उपक्रमाची सुरुवात २०१७ मध्ये करण्यात आली. मराठी उद्योजकांनी आपली ब्रँड ओळख जागतिक स्तरावर निर्माण करावी, ब्रँड व्हॅल्यूचे महत्त्व समजावे आणि लोकशाही पद्धतीने ग्राहकांच्या मतांवर आधारित ब्रँड निवड व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
यंदा Single Click Voting System सुरू करून प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सर्वांसाठी सुलभ करण्यात आली. ग्राहक, गुंतवणूकदार, विक्रेते आणि सर्वसामान्य नागरिकांना या प्रक्रियेत सहभागी होता येते.
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स

