लोकांची हाव आणि हजारो कोटींचा आर्थिक झोल ! अर्थसंकेत गुंतवणूक विशेष ! सौ रचना लचके बागवे (सह संस्थापिका – अर्थसंकेत)

लोकांची हाव आणि हजारो कोटींचा आर्थिक झोल ! अर्थसंकेत गुंतवणूक विशेष ! सौ रचना लचके बागवे (सह संस्थापिका – अर्थसंकेत)

बरेच महिने ह्या विषयावर लिहण्याचे ठरविले होते, पण आज ते कृतीत येत आहे आणि तो विषय म्हणजे financial frauds किंवा आर्थिक गुन्हे, share market fraud आणि आर्थिक साक्षरता. अर्थसंकेतच्या कामाच्या माध्यमातून आमची महाराष्ट्रातल्या विविध छोट्या मोठ्या गावात भ्रमंती होत असते.

तेथील लोकांशी बोलताना कळते कि, अमुक अमुक गावात १५० – २०० कोटी रुपयांचा शेअर मार्केट घोटाळा झाला आहे. सांगायचं झालं तर, खरं तर ते गाव खूप छोटं असते.. तरी देखील इतकी मोठी रक्कम कोणत्यातरी स्कीमखाली जमा होते आणि ती स्कीम देणारी माणसं ५-६ महिने नियमित महिना ३ टक्के ते  १० टक्के परतावा किंवा रिटर्न्स देतात आणि मग लोकांचा विश्वास बसला कि, एका रात्री सर्व पैसे घेऊन फरार होउन जातात…. त्यात गुंतवणूकदार कंगाल होऊन जातो… आणि ती लोकं मालामाल होतात. असे पहिले गेले आहे कि, ह्या स्किम्समध्ये गुंतवणूक करण्याकरिता लोकं अक्षरशः बँकेतून कर्ज घेतात, आपले दागिने विकतात, घरं आणि जमीन विकतात …. आणि मग सगळं एक दिवस गायब झालं कि, मग रडत बसतात. अशी अनेक उदाहरणे आम्ही जवळून पाहिली आहेत. जास्तीत जास्त परतावा मिळण्याच्या हव्यासापोटी आपल्याकडे असलेले पैसेदेखील गमावून बसतात आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये अशिक्षित न्हवे तर शिक्षित वर्गाचा वाटा जास्त दिसून येतो…. जे त्याहून दुर्दैव आहे.

ह्याचे एक उदाहरण द्यायचे झाले तर, एक मराठी जोडप्याने, आपले नाव बदलून जैन आडनाव लावून स्टॉक गुरु इंडिया नावाने कंपनी काढली आणि २०१२ साली ११००/- कोटीचा घोटाळा करून फरार झाले होते. सहा महिन्यात तुमचे पैसे डबल, म्हणत त्यांनी हजारो लोकांना फसविले आणि त्यातील १४,३०३ गुंतवणूकदरांनी त्यांच्यावर केस केल्यावर महाराष्ट्रातील आर्थिक गुन्हे विभागाने त्यांना बरीच मेहनत करून, वेष आणि ओळख बदलून राहिलेले असताना देखील रत्नागिरी येथे पकडले.

२०१२ साली ११००/- कोटी रुपये ही काही छोटी रक्कम नक्कीच नव्हती. अशाप्रकारे महाराष्ट्रातच न्हवे, तर भारतातील अनेक गावागावांमध्ये असे आर्थिक गुन्हे रोज होत आहेत.

पण मला आश्चर्य ह्याचे वाटते कि, इतक्या बातम्यामध्ये बघून सुद्धा लोकं अशा फसव्या लोकांवर आणि त्यांच्या दुप्पट पैसे मिळण्याच्या आणि टक्क्यांच्या स्किममध्ये आपले मेहनतीचे पैसे कसे गुंतवतात?

जरी आपण एकीकडे साक्षर होत चाललो आहोत, तरी देखील दुसरी कडे हे आर्थिक गुन्ह्यांचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि साक्षर लोकच ह्याला बळी पडत आहेत.

विविध्य माध्यमातून खरी आर्थिक साक्षरता होणं खूप जास्त गरजेचे आहे. एकदा हा गुन्हा होऊन गेल्यावर गुंतवणूकदाराला पुन्हा त्याचे पैसे मिळणं फार मुश्किल आहे.

ह्या अशा प्रकारच्या गुंतवणूक करून, मग फसल्यावर आम्हाला बराचदा विचारतात…. आता आम्ही काय करू? अशा वेळेस त्यांच्याकडे काही ठोस कागदपत्र किंवा अधिकृतरित्या केलेला व्यवहार देखिल नसतो. थोडक्यात त्यांनी स्वतःचाच पायावर कुऱ्हाडी मारून घेतलेली असते आणि मग असे वाईट अनुभव आले कि त्यांच्यासाठी आणि त्यांच्या नातेवाईक – मित्र परिवार आणि पुढील पिढ्यासाठी शेअर मार्केट वाईट होऊन जाते. जो पुन्हा आर्थिक साक्षरतेचा अभाव प्रामुख्याने दर्शवतो.

ह्या लेखाद्वारे एकच विनंती करीन की, आपले कष्टाचे पैसे कुठेही गुंतवणूक करताना ती गुंतवणूक डोळसपणे करा आणि स्वतःच्या डिमॅट अकाऊंटमध्येच पैसे ठेवा. आपले पैसे….फसव्या परताव्यासाठी दुसऱ्या कोणाच्या अकाउंटला ट्रेडिंग साठी किंवा गुंतवणूकसाठी देऊ नका

गुंतवणूक करताना अजून कोणत्या गोष्टी लक्षात घायला हव्या ह्या बद्दल अधिक माहिती माझ्या दुसऱ्या लेखात असेल.

बाबांनो… डोळस गुंतवणूक करा आणि स्वतःचे पैसे वाचवा.

– सौ रचना लचके बागवे

सह संस्थापिका – अर्थसंकेत

लेखिका – “आर्थिक गुंतवणूकीचे प्राथमिक धडे “ Contact – 8082349822

Stock Market Investment Fraud
Stock Market Investment Fraud

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *