युवा अभियंतेच आधुनिक तंत्रज्ञानाचे संशोधन आणि विकास करून शेती व्यवसायाला वाचवतील: विलास शिंदे I

युवा अभियंतेच आधुनिक तंत्रज्ञानाचे संशोधन आणि विकास करून शेती व्यवसायाला वाचवतील: विलास शिंदे

आर आय टी च्या नवव्या पदवीपूर्ती समारंभात ७२० स्तनाकाना पदवी प्रदान

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ डी टी शिर्के यांची उपस्थिती

इस्लामपूर येथील राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजि या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संलग्नित स्वायत्त महाविद्यालयाचा बी टेक, एम टेक आणि एम बी ए या शाखांचा नववा पदवीपूर्ती समारंभ पार पडला. याप्रसंगी सह्याद्री फार्म्स नाशिक या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले आपल्या देशात शहरी भाग आणि ग्रामीण भागात खूप दरी आहे. हि दरी दूर करावयाची असेल तर युवा अभियंत्यांनी सूत्रे हातात घेऊन ग्रामीण भागातील शेती व्यवसायाला आधुनिकतेकडे नेणाऱ्या तंत्रज्ञानाची जोड देऊन ग्रामीण भागाला शाश्वत विकासाकडे नेले पाहिजे. अभियंत्यांनी आजूबाजूला असणाऱ्या लहान लहान समस्यांवर उपाय शोधून समाजाचे जीवन सुखकर बनवले पाहिजे .

प्रामाणिकपणा आणि सर्वसमावेशकता हीच यशस्वितेची गुरुकिल्ली आहे. पदवीप्राप्त अभियंत्यांनी उद्योजकीय मानसिकता निर्माण करून नैतिक मूल्यांचे जतन करून समाजाला आणि देशाला अभिमान वाटावा असे कार्य करणे अपेक्षित आहे. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, आर आय टी महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे सदस्य आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव आर डी सावंत उपस्थित होते.

RIT Convocation
RIT Convocation

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी आर आय टी महाविद्यालय हे विदयापीठ कार्यक्षेत्रातील एक नामवंत महाविद्यालय असल्याचे तसेच सततच्या नावीन्यतेमुळे हे महाविद्यालयाला एक विशिष्ट असा दर्जा प्राप्त झाला असल्याचे सांगितले. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले कि अभियंत्यांनी समाजाच्या शाश्वत विकासासाठी सतत प्रयन्तशील असले पाहिजे. शिक्षणाची प्रक्रिया अव्याहतपणे सुरु ठेवा यानंतर जरी तुम्हाला आता औपचारिक शिक्षण मिळणार नसले तरी बाहेरील जगात मिळणारे अनुभव हे सुद्धा तुम्हाला ज्ञान देऊन जाणार आहेत.

आर आय टी च्या नियामक मंडळाचे सदस्य जयंत पाटील यांनी सह्याद्री फार्म्स कंपनीच्या शेती पूरक उपक्रमांचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या उद्योजकीय अनुभवातून बरच काही शिकण्यासारखे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्याकडील नवनिर्मितीची क्षमता ओळखून यशाला नवीन गवसणी घालण्याचा प्रयन्त करावे तसेच जेवढे मेंदू तेवढ्या नवीन कल्पना आणि संशोधन गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.

RIT Convocation
RIT Convocation

आर आय टी च्या संचालिका डॉ सौ सुषमा कुलकर्णी यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. त्या म्हणाल्या आर आय टी महाविद्यालयाचे विद्यार्थी शैक्षणिक, सांस्कृतिक, संशोधन, उद्योजकता, क्रीडाक्षेत्र आणि नवनिर्मित या सर्वच क्षेत्रात अग्रस्थानी असून राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरावरती महाविद्यालयाचा गौरव वाढवत आहेत. तसेच त्यांनी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना पदवी निष्ठतेची शपथ दिली.

याप्रसंगी पदवी पूर्ती समारंभाचे प्रमुख पाहुणे , समारंभाचे अध्यक्ष आणि इतर मान्यवरांच्या बरोबर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील पदवी प्राप्त विद्यार्थी मिरवणुकीने समारंभास्थळी दाखल झाले. यानंतर दीप्रज्वलन आणि स्वागतगीतानंतर प्रमुख पाहुणे आणि कुलगुरूंचा सत्कार माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला .

तसेच या पदवी पूर्ती समारंभा निम्मित शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये सर्व पदवी शाखांतून प्रथम आलेल्या वैष्णवी अंगठेकर या स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीस आणि सर्व पदव्युत्तर शांखांमधून प्रथम आलेल्या विश्वेन्द्र मोरे या एम टेक डिझाईन इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्यास सुवर्ण पदक घेण्यासाठी डीन अकॅडेमिक्स डॉ सचिन पाटील यांनी आमंत्रित केले . तसेच एम टेकच्या श्वेता पाटील ( इलेक्ट्रॉनिक्स), पूनम भंडारे ( स्ट्रक्चरल इंजिनीरिंग) , अंकिता तुराटे (कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट), तेजस्विनी पाटील (कॉम्प्युटर इंजिनीरिंग) नायगावकर सुमित (मॅकेनिकल इंजिनीरिंग ऑटोमोबाईल), अभिजीत दिवटे ( मॅनुफॅक्चरिंग इंजिनीरिंग) , प्रतिभा काणेरे ( थर्मल इंजिनीरिंग ), मयुरेश पटवर्धन ( मॅकेनिकल इंजिनीरिंग) , आर्कन मुल्ला (पॉवर इलेक्ट्रॉनिक्स) , वृषाली थोरात( एम्बइडेड सिस्टिम), आणि प्राजक्ता सूर्यवंशी (एम बी ए) या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आली.

तसेच पदवीच्या प्रत्येक शाखेमधून प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदक देऊन गौरवण्यात आले. यामध्ये ऑटोमोबाईल इंजिनीरिंग मधून ऋषिकेश ढोरे, ऋषिकेश कुंभार, सौरभ पवार सिव्हील इंजिनीरिंग मधून वैष्णवी अंगठेकर, कीर्ती पवार , श्वेता कुंभार कॉम्प्युटर इंजिनीरिंग मधून ओंकार नांगनूर, सुजय पुजारी, हिरेन आंबेकर इन्फॉरमेशन टेक्नोलोंजि मधून श्वेता काशीद , जयंत कोकितकर, ऐश्वर्या पवार इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कॉम्युनिकेशन मधून दर्शन शहा , अमृता पाटील, सुधीर पोळ मॅकेनिकल इंजिनीरिंग मधून मुसादिक मोमीन, दीप्ती शिंगटे, अजय तेलंग आणि इलेक्ट्रिक इंजिनीरिंग मधून शिवानी कारंडे, रेश्मा पाटील, शिवराज मोरे या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

या पदवी पूर्ती समारंभासाठी परिसरातील उद्योजक, माजी विद्यार्थी , राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आर आय टी मधील सर्व डीन्स, विभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सूत्रसंचालन डॉ पी एन पवार यांनी केले आभार परीक्षा नियंत्रक डॉ एस आर पाटील यांनी मानले .

RIT Convocation
RIT Convocation

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *