रेशामंडीचे हिंदी, कन्नड, तामिळ, तेलगू आणि मराठीमध्ये मोबाईल ऍप I

रेशामंडीने आयओएस डिव्हायसेससाठी सुरु केले आपले सुपर ऍप

इंग्रजीव्यतिरिक्त हिंदीकन्नडतामिळतेलगू आणि मराठीमध्ये या ऍपचा उपयोग करता येईल.

बंगलोर, २१ नोव्हेंबर २०२२: भारतात प्राकृतिक धाग्यांसाठी सर्वात मोठीफार्म-टू-फॅशन डिजिटल इकोसिस्टिमरेशामंडीने नुकतेच आपले ऍप सुरु केले आहे जे आयओएस डिव्हायसेसवर काम करेल. सध्या रेशामंडीच्या ३४००० हितधारकांनी हे ऍप इन्स्टॉल केले असूनत्यांच्यापैकी ४०% लोकांनी ऍपच्या पेमेंट सिस्टिमचा उपयोग केला आहे आणि त्यांना पेमेंटची पावती ऍपवर मिळाली आहे. रेशामंडीचे नवे आयओएस ऍप इंग्रजीव्यतिरिक्त पाच भारतीय भाषांमध्ये हिंदीकन्नडतामिळतेलगू आणि मराठीमध्ये उपलब्ध आहे.

सध्या रेशामंडीचे ९५% शेतकरी या प्लॅटफॉर्मवर व्यवहारांचे मॅपिंग करण्यासाठी ऍपचा वापर करत आहेत. विणकर समुदायाने या ऍपवर ५००० पेक्षा जास्त साडी एसकेयू सूचिबद्ध केले असूनत्यामुळे आता ते एका खूप मोठ्या रिटेलर बेससोबत थेट संपर्क साधू शकतात आणि त्यांना उत्पादने वितरित करण्यात सक्षम आहेत. या ऍपवर साडीकपडेघर व जीवनशैली आणि कापड या चार व्यापक श्रेणींमध्ये साहाय्य प्रदान केले जात आहे.    

रेशामंडीचे संस्थापक व सीईओ श्री. मयंक तिवारी यांनी सांगितले, आर्थिक तंत्रज्ञान आणि डिजिटायजेशन यांचा मिलाप झाल्यामुळे कापड उद्योगक्षेत्रासाठी एक नवे विकास मॉडेल तयार झाले आहे.  आम्ही डिजिटायजेशनमार्फत पुरवठा शृंखलेमध्ये पारदर्शकता आणण्याच्या दिशेने सक्रिय प्रयत्न करत आहोत.  आम्ही एक असे सुपर ऍप बनवू इच्छितो जे स्पिनर्सजीनर्सशेतकरीमिल्सवितरकांसहित सर्व हितधारकांना उद्योगव्यवसाय अधिक कार्यशील बनवण्यासाठी आणि एका मंचाच्या माध्यमातून खरेदी विक्री करण्यात सक्षम बनवते. आम्हाला हे पाहून आनंद होत आहे कीमूल्य शृंखलेमध्ये आमचे हितधारक रेशामंडी ऍपला समजून घेत आहेत आणि त्याचा उपयोग करत आहेत.”

रेशामंडी ऍपची सुरुवात २०२० साली झाली आणि तेव्हापासून आजतागायत या ऍपचा वापर करणरे शेतकरी, रीलर्स, यार्न उत्पादक, विणकर आणि रिटेल विक्रेत्यांच्या संख्येत सातत्याने वाढ झाली आहे.  गेल्या दोन वर्षात सर्व हितधारकांनी या ऍपसोबत स्थापन केलेले संबंध रेशामंडीकडून आपल्या हितधारकांना सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना व्यवसायामध्ये अजून व्यापक संधी प्रदान करण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न दर्शवतात.  ऍपच्या माध्यमातून २०,००० टन कोकुन, १,५०० टन कापूस, ६,००० टन कापूस गाठी, ८ लाख साड्या, ५ लाख कपडे आणि १५० लाख मीटर कापड यांची विक्री आणि व्यवहार करण्यात आले आहेत.

Reshamandi App
Reshamandi App

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *