आर आय टीची आयडिया लॅब संशोधक अभियंते निर्माण करेल- डॉ राजा दयानिधी

आर आय टीची आयडिया लॅब संशोधक अभियंते निर्माण करेल- डॉ राजा दयानिधी

आर आय टी-आयडिया लॅबच्या उदघाटनावेळी काढले गौरव उद्दगार

इस्लामपूर येथील राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि मधील युवा अभियंत्यांना संशोधनाचे प्रेरणास्तोत्र ठरलेल्या आयडिया लॅबचे उदघाटन सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित संशोधक युवा अभियंते, विद्यार्थी आणि शिक्षक यांना संबोधित करताना ते बोलत होते. ते म्हणाले कि गरज हि शोधाची जननी आहे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी समाजातील छोट्या छोट्या गरजांवर संशोधन करून ती गरज पूर्ण करण्याचा प्रयन्त केला पाहिजे. निसर्गातील प्रत्येक बदल तुम्हाला संशोधनाची प्रेरणा असतो त्याचा नीट अभ्यास करा आणि आयडिया लॅब सारख्या तांत्रिक दृष्टया प्रगत अशा सर्व यंत्रांचा वापर करून नाविन्याची निर्मितीचा अनुभव घ्या अपयश आले तरी यातूनच तुम्ही शिकाल. आर आय टी चा हा प्रयन्त खरंच अभिनंदनास्पद आहे काळाची गरज ओळखून फक्त अभियंत्याला नोकरी करायला न लावता त्यांना संशोधन आणि उद्योजकता या दोन क्षेत्रात कसे यशस्वी होता येईल यासाठी आयडिया लॅब हा एक इतर शैक्षणिक संस्थांच्यासाठी आदर्श उपक्रम आहे.

याप्रसंगी आयडिया लॅबचे समन्वयक डॉ आनंद काकडे यांनी सांगितले कि एआयसीटीई ला संपूर्ण भारत भरातून आलेल्या एकूण ८५० संस्थांच्या अर्जातून शेवटी ज्या ४९ संस्थांना आयडिया लॅब स्थापने साठी निधी मिळाला त्यामध्ये आर आय टी महाविद्यालय हे एक आहे. आयडिया लॅबच्या स्थापनेसाठी एकूण एक कोटी पाच लाख इतका खर्च आला असून त्यापैकी पन्नास टक्के निधी हा एआयसीटीई ने दिला असून उर्वरित पन्नास टक्के निधीपैकी एकवीस लाख झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीने, वीस लाख किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड, दहा लाख भारत फोर्ज लिमिटेड , दहा लाख कल्याणी स्टील लिमिटेड, दहा लाख कल्याणी टेक्नोफोर्ज लिमिटेड, एक लाख कुलकर्णी पॉवर टूल्स आणि पन्नास हजार वितराग कॉम्प्युटर्स प्रा लिमिटेड यांनी देणगी स्वरूपात दिला. त्यांनी सांगितले कि या निधीतून आयडिया लॅब साठी आधुनिक यंत्रे आणि संशोधनासाठी लागणारे थ्रीडी प्रिंटर, लेजर कटिंग मशीन, थ्री डी स्कॅनर, सी एन सी वूड राउटर यासाराखी अनेक साधने उपलब्ध करून दिलेली आहेत.

यावेळी आरआयटी च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष भगतसिंह पाटील यांनी सांगितले कि या सर्व नामवंत उद्योगांनी दिलेली हि देणगी म्हणजे आरआयटी वर दाखवलेला विश्वास आहे. त्यामुळे आता आमची जबाबदारी अजून वाढली असून यातून निश्चितच उद्योगांना आणि समाजाला चांगला परतावा देण्याचा प्रामाणिक प्रयन्त करणार आहोत. आयडिया लॅबची स्थापना म्हणजे काम संपले नसून आता खऱ्या कामाची सुरवात झाली आहे.

आरआयटी च्या संचालिका डॉ सौ सुषमा कुलकर्णी यांनी सांगितले कि विद्यार्थ्यांच्या मध्ये संशोधन कौशल्ये निर्माण व्हावीत म्हणून आयडिया लॅबचा वापर करता येईल असे विषय आणि प्रॅक्टिकल्स अभ्यासक्रमात समाविष्ट केली असून या सर्व आधुनिक साधनांच्या वापराचे प्रशिक्षण आयडिया लॅब मधून विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हि लॅब चोवीस तास वापरासाठी उपलब्ध असणार आहे. तसेच यासाठी लागणार पन्नास टक्के निधी देऊन ग्रामीण भागात जागतिक दर्जाचे अभियंते निर्माण होण्यासाठी दिलेल्या आर्थिक साहाय्य बद्दल सर्व देणगीदार उद्योग संस्थांचे आभार मानले.

या उदघाटन प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे डॉ राजा दयानिधी झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे अध्यक्ष नरेंद्र झंवर, आष्टा लायनर्सचे व्यवस्थापकीय संचालक नितीन झंवर, केपीटी इंडस्ट्री चे सी एम आरोलकर, वितराग कॉम्प्युटर्स चे प्रवीण नाईक, जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक कमिशनर जमीर करीम, प्रांत अधिकारी संपत खिलारी , तहसीलदार प्रदीप उबाळे, धनंजय महाजन या सर्वांनी आयडिया लॅब मधील सर्व उपकरणांची माहिती घेतली आणि आरआयटी च्या या उपक्रमाबद्दल सर्वांचे कौतुक केले.

याप्रसंगी कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव आर डी सावंत, राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील नेत्रा आरआयटीचे सीईओ सुधीर आरली सर्व डीन्स विभागप्रमुख आयडिया लॅब टीम मेंबर्स आणि स्टाफ मेंबर्स उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा रणधीर पाटील यांनी केले आणि आभार हर्षल पाटील यांनी मांडले.

R I T Idea Lab
R I T Idea Lab

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *