एयू स्मॉल फायनान्स बँकेतर्फे बचत खाते, चालू खाते आणि डेबिट कार्ड ग्राहकांसाठी रिवॉर्ड पॉइंट योजना I

ए यू स्मॉल फायनान्स बँकेतर्फे बचत खाते, चालू खाते आणि डेबिट कार्ड ग्राहकांसाठी रिवॉर्ड पॉइंट योजना

ग्राहकांना व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट मिळवण्याची संधीनानाविध उत्पादनेगिफ्ट व्हाउचरएअर तिकीट आणि अन्य काही योजनांवरसुध्दा रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्याची अनोखी संधी

मुंबई/जयपूर, 13 सप्टेंबर, 2023:  भारतातील सर्वात मोठी एसएफबी असलेल्या एयू स्मॉल फायनान्स बँकेने निवडक कासा (CASA) आणि डेबिट कार्ड धारकांसाठी एक विशेष लॉयल्टी योजना सादर करून ग्राहकांचा बँकिंग अनुभव वाढवण्यासाठी एक अग्रगण्य पाऊल उचलले आहे. ही अनोखी योजना ग्राहकांचे आर्थिक व्यवहार हे केवळ व्यवहारपुरते मर्यादीत न ठेवता त्यांना फायद्याच्या टप्प्यात रुपांतरित करत आहे.

एयू बँक लॉयल्टी योजना सक्रियता आणि प्रतिबद्धता वाढवण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. या योजनेमुळे ग्राहकांना विविध व्यवहारांवर पॉइंट मिळवण्याची संधी मिळते. आर्थिक व्यवहारांपासून ते बिगर-आर्थिक प्रक्रियांसाठीग्राहकांनी आर्थिक क्रियांसाठी केलेली कृती यात गणली जाते. या योजनेत मिळवलेले पॉइंट नंतर उत्‍पादनांच्या रोमांचक श्रेणीगिफ्ट व्हाउचरहवाई तिकिटे आणि इतर बऱ्याच बाबींसाठी रिडीम केले जाऊ शकतातजे दैनंदिन बँकिंग व्यवहाराला बक्षीसरुपी प्रवासात रूपांतरित करतात.

या योजनेतग्राहक एयूची उत्पादने आणि सेवांच्या नानाविध पर्यायात  रिवॉर्ड पॉइंटस् मिळवू शकतात आणि ते रिडीमही करू शकतात. डेबिट कार्डपासून बचत खाते आणि चालू खात्यांपर्यंत, AU 0101 अॅप ते नेट बँकिंग असे कितीतरी पर्याय ग्राहकांना उपलब्ध आहेत. ट्रॅव्हल बुकिंगमोबाइल रिचार्जएअर माईलगोल्फ सेशन्सशॉपिंग स्प्री आणि जीवनशैली सेवा या सर्व गोष्टी आता ग्राहकांच्या सहजरितीने आवाक्यात आल्या आहेत.

ग्राहक त्यांचे जमा झालेले रिवॉर्ड पॉइंट AU 0101 अॅप किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे अगदी सहज तपासू शकतात आणि या सेवांचा लाभ घेण्यासाठी https://rewardz.aubank.in/ या संकेतस्थळाला भेटही देऊ शकतात.

डेबिट कार्डसाठीची वैशिष्टे: डेबिट कार्ड लॉयल्टी योजना पिन सेट करण्यासाठी आणि ई-कॉमर्स व्यवहार सक्षम करण्यासाठी तब्बल 200 रिवॉर्ड पॉइंट ऑफर करते. शिवायप्रत्येक खर्च ग्राहकाच्या रिवॉर्ड पॉइंट्समध्ये भर घालतो.

CASA च्या माध्यमातून मिळणारे फायदे: CASA लॉयल्टी योजना त्याच्या ग्राहकांना 500 रिवॉर्ड पॉइंट्स पर्यंत लाभ देते. इंटरनेट बँकिंगमोबाईल बँकिंगयूपीआय आणि बिल पेमेंट नोंदणीसाठी ग्राहकांना सक्रियकरण बोनस दिला जातो.

याशिवायही योजना ग्राहकांना दर महिन्याला इंटरनेट बँकिंगमोबाइल बँकिंग आणि बिल पेमेंट व्यवहार वापरण्यासाठी पॉइंट देऊन बक्षीस देत आहे. हा चमत्कार घडवून आणण्यासाठीएयू बँकेने लॉयल्टी रिवॉर्ड्झ या भारतातील आघाडीच्या लॉयल्टी आणि ग्राहक प्रतिबद्धता मंचाबरोबर भागीदारी केली आहे.  या मंचाने सतत विकसित आणि समृद्ध रिवॉर्ड्सचा छानसा संच ग्राहकांसाठी तयार केलेला आहे.

बँकेच्या या नवीन योजनेबद्दल माहिती देताना एयू स्मॉल फायनान्स बँकेचे कार्यकारी संचालक उत्तम टिब्रेवाल म्हणाले , “डिजिटल भारताचे स्वप्न पुढे नेणारे ग्राहक केंद्रित पर्याय आणण्यात एयू एसएफबी आघाडीवर आहे. आमच्या CASA आणि डेबिट कार्ड लॉयल्टी रिवॉर्ड योजनेच्या माध्यमातून सहजरित्या संधी  उपलब्ध करणे आणि फायद्यांच्या गतिशील वातावरणात डिजिटल व्यवहारांना चालना देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. CASA आणि डेबिट कार्ड्सच्या नाविन्यपूर्ण लॉयल्टी रिवॉर्ड्स योजनेची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. मुळात ही योजना आमच्या कार्यप्रणाली धोरणाचा केंद्रबिंदू मानून ग्राहकांच्या प्रवासासाठी खास तयार करण्यात आलेली आहे. आमच्यासाठी मूल्यवान असलेल्या ग्राहकांना प्रत्येक डिजिटल व्यवहारातून सर्वोत्कृष्ट लाभ मिळवून देणे हे सुनिश्चित करण्यावर आमचे उद्दीष्ट भर देते आणि या लाभांत गुण, कूपन, ऑफर, रिचार्ज पर्याय, खरेदी प्रोत्साहन आणि कॅशबॅक रिवॉर्ड्स आदींचा समावेश आहे. ग्राहकांबरोबरील आमचे नातेसंबंध मजबूत आणि दृढ करण्यासाठी, त्यांचे समाधान आणि निष्ठा वाढवण्यासाठी हे मनमोहक बक्षीसरुपी अनुभव सज्ज आहेत. डिजिटल युगात एयू एसएफबीसह चिरकालीन आणि प्रदीर्घ भागीदारी सुनिश्चित करून आमच्या ग्राहकांना विजेते बनवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”

AU bank rewards
AU bank rewards

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *