PFRDA पेन्शन स्कीम अंतर्गत सदस्य संख्येत २४% ची वाढ I

PFRDA पेन्शन स्कीम अंतर्गत सदस्य संख्येत २४% ची वाढ

PFRDA च्या दोन पेन्शन स्कीम अंतर्गत एकूण सदस्य संख्या २४% ने वाढली असून मे २०२२ अखेर एकूण सदस्य ५.३२ कोटी आहेत. तर नॅशनल पेन्शन स्कीम अंतर्गत एकूण सदस्य संख्या २४.०७% ने वाढली असून ५३१.७३ लाख आहे. मे २०२१ अखेर सदस्य संख्या ४२८.५६ लाख होती. अशी माहिती PFRDA ने दिली.
मे २०२२ अखेर अटल पेन्शन योजने अंतर्गत सदस्य संख्या ३१.६% ने वाढली असून NPS अंतर्गत सेंट्रल गव्हर्नमेंट सदस्य संख्या ५.२८% ने वाढली असून २२.९७ लाख आहे. तर राज्य सरकार कर्मचारी संख्या ७.७०% ने वाढून ५६.४० लाख आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात NPS सदस्य संख्या २६.८३% ने वाढली असून १४.६९ लाख आहे. या दोन्ही योजनेत एकूण मालमत्ता व्यवस्थापन २१.५% ने वाढले असून रु.७.३८/- लाख कोटी आहे.

NPS June 2022
NPS June 2022
Mutual Fund part 2
Mutual Fund part 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *