क्रूड, पाम ऑइलच्या किमती घसरल्या I

क्रूड, पाम ऑइलच्या किमती घसरल्या

क्रूड व पाम ऑइलच्या किमतीत मोठी घसरण झाली असली तरीही पॅकेज प्रॉडक्टच्या किमतीत आम्ही घसरण करणार नसून किंमत वाढीवर अंकुश लावू असा निर्णय पॅकेज कन्झ्युमर गुड्सच्या निर्मात्यांनी घेतला आहे.

पाम ऑइल चा वापर सोपं, बिस्कीट, नूडल असे पदार्थ बनविण्याकरिता होत असून क्रूड ऑइल हे डिटर्जेंट व प्रॉडक्ट मध्ये वापरले जाते. पाम ऑइल ची किंमत $१९०० वरून घसरून $१३०० प्रति मेट्रिक टन वर आली असून क्रूड ऑइल $१०७ प्रति बॅरेल वर आले आहे.

इम्पोर्ट ड्युटी मध्ये घट झाल्याने एडिबल ऑइल च्या किमती देखील घसरल्या आहेत. विप्रो चे कंझ्युमर केअर बिझनेस चे अद्यक्ष अनिल चौघ म्हणाले, किमतीत वाढीची गती कमी होईल परंतु किमतीत घट होणार नाही. आमच्या मार्जिन वर परिणाम झाला असून ऑपरेशन कॉस्ट मध्ये घट केली आहे.

दुसऱ्या सहामाहीत मागणीत वाढ व मार्जिन मध्ये रिकव्हरी अपेक्षित असल्याचे कंपन्यांनी सांगितले.

Palm Oil June 2022
Palm Oil June 2022
Avadhut sathe
Avadhut sathe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *