महिंद्रा लॉजिस्टिक्सतर्फे ओएनडीसी नेटवर्कवर सुविधा लाँच I

महिंद्रा लॉजिस्टिक्सतर्फे ओएनडीसी नेटवर्कवर सुविधा लाँच I

महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड या भारतातील आघाडीच्या सर्वसमावेशक थर्ड पार्टी लॉजिस्टिक्स सेवा पुरवठादार कंपनीने ओएनडीसी नेटवर्कवर सेवा लाँच करत कामकाज सुरू केले आहे. महिंद्रा लॉजिस्टिक्सद्वारे ओएनडीसीवरील सर्व विक्रेत्यांना त्याच दिवशी आणि दुसऱ्या दिवशी इन्ट्रा सिटी पिक अप व डिलीव्हरी सर्व्हिसेस दिल्या जाणार आहेत. कंपनीद्वारे इंटर- सिटी एक्सप्रेस पार्सलफुल ट्रक लोड आणि मोबिलिटी सेवांसह सर्व प्रकारच्या सेवा पुरवल्या जातील. ओएनडीसी नेटवर्कवरील विक्रेत्यांना महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या सेवांची पूर्ण श्रेणी आणि इन्ट्रा व इंटर- सिटी डिलीव्हरी मिळून १९,००० पिनकोड्सवर उपलब्ध होईल.

प्रभावी लॉजिस्टिक्सही ओएनडीसी नेटवर्कवरील सर्व सदस्यांसाठी महत्त्वाचे आहे. महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या सेवा संपूर्ण तंत्रज्ञान पुरवतात, डीटुसी ब्रँड्स आणि विक्रेत्यांना वेगवान इंटिग्रेशन आणि फुलफिलमेंट सेवा देतात. या उपक्रमाचा एक भाग म्हणून महिंद्रा लॉजिस्टिक्स ओएनडीसी नेटवर्कवरील इतर सदस्यांसह सहकार्य करून सेवा पुरवठ्याद्वारे स्थानिक व्यवसायाला सक्षम करण्यासाठी बांधील आहे.

या सहकार्याविषयी महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रामप्रवीण स्वामीनाथन म्हणाले, ‘ओएनडीसी हा स्थानिक व्यापाराचे लोकशाहीकरण करण्यासाठी तसेच त्याला बळकटी आणण्यासाठी क्रांतीकारी पद्धतीने प्रयत्न करत आहे. प्रभावी लॉजिस्टिक्स ओएनडीसीच्या संपूर्ण क्षमतेचा पूर्ण वापर करणारा महत्त्वाचा घटक आहे आणि या नेटवर्कमध्ये सहभागी होताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही ग्राहकांना हायपर- लोकल आणि इंटर- सिटी वाहतूक व मोबिलिटी सेवा व तंत्रज्ञान त्यांच्या ग्राहकांना पुरवण्यासाठी उपलब्ध करून देतो. प्लॅटफॉर्मवर नाविन्यपूर्ण लॉजिस्टिक्स सेवा पुरवून पर्यायाने व्यवसाय आणि ग्राहकांनाही लाभ करून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.’

ओएनडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी टी कोशी म्हणाले, ‘देशभरात ई- कॉमर्सचा यशस्वी प्रसार होण्यासाठी लॉजिस्टिक्स महत्त्वाचे आहे. विशेषतः लघु आणि मध्यम उद्योगांना त्यांची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रभावी लॉजिस्टिक्स गरजेचे आहे. महिंद्रा लॉजिस्टिक्ससारख्या मोठ्या कंपन्या ओएनडीसी नेटवर्कवर सहभागी झाल्याने त्यावरील वैविध्यपूर्ण व्यापाऱ्यांसाठी देशभरातील लॉजिस्टिक्सच्या पर्यायांमध्ये वाढ होईल.’

ओएनडीसीने सुरळीत लॉजिस्टिक्स कामकाजासाठी ओपन नेटवर्क तयार केले असून त्यामुळे व्यवसाय वृद्धी, क्षमतांचा अधिक चांगला वापर आणि ब्रँडच्या दमदार अस्तित्वासाठी नव्या संधी तयार होत आहेत. हे सहकार्य भारतीय सरकारच्या न्याय्य आणि खुले डिजिटल कॉमर्स नेटवर्क उभे करण्याच्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे.

ONDC MAHINDRA LOGISTICS
ONDC MAHINDRA LOGISTICS

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *