श्री नितिन गडकरी आणि महिंद्रा लॉजिस्टिक्स यांच्यातर्फे ‘देश चालक’चे अनावरण, भारतीय चालकांचा सन्मान करणारे पुस्तकI
श्री नितिन गडकरी आणि महिंद्रा लॉजिस्टिक्स यांच्यातर्फे ‘देश चालक’चे अनावरण, भारतीय चालकांचा सन्मान करणारे पुस्तक
~ या पुस्तकांत वाहन चालकांच्या आयुष्यावर आधारित छोट्या गोष्टी समाविष्ट करण्यात आल्या असून त्यात त्यांना येणारी आव्हानं आणि तरीही काम सुरू ठेवण्याची दुर्दम्य इच्छा यांबद्दल वाचायला मिळतं. वेगवेगल्या अडचणी येत असूनही हा समाज कशाप्रकारे काम करत राहातो याचं वर्णन या पुस्तकात करण्यात आलं आहे.
– चालकांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी महिंद्रातर्फे त्यांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वाटप
नवी दिल्ली, १९ जून २०२३ – श्री. नितिन गडकरी, माननीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, भारत सरकार आणि महिंद्रा लॉजिस्टिक्स या भारतातील सर्वात मोठ्या इंटिग्रेटेड लॉजिस्टिक्स सुविधा पुरवठादार कंपनीने आज ‘देश चालक’ या पुस्तकाचे अनावरण केले. नवी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात या अनोख्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पत्रकार आणि या क्षेत्रातील दिग्गज रमेश कुमार यांनी या पुस्तकाचे लेखन केले असून त्यांना चालक समाजाची सखोल जाण आहे. हे पुस्तक भारतीय समाजातील पडद्यामागच्या हिरोंना – चालकांना समर्पित करण्यात आले आहे.
‘देश चालक’ या पुस्तकात भारतात काम करत असलेल्या चालक समाजाने देशाच्या विकासासाठी दिलेल्या मूक योगदानाची दखल घेण्यात आली आहे. त्याशिवाय चालकांचे प्रवास करत असतानाचे आयुष्य, त्यांच्या अडचणी, त्यांनी पूर्ण केलेले कित्येक अवघड प्रवास याविषयी या पुस्तकात वाचायला मिळतं. प्रत्यक्ष आयुष्यातील अनुभवांवर आधारित ३० गोष्टींचा समावेश रंजक पद्धतीने देश चालकमध्ये मांडण्यात आला आहे.
या पुस्तकाच्या लाँच वेळेस माननीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, भारत सरकार नितिन गडकरी यांनी भारतातील चालकांचे कौतुक केले. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी चालक समाजाने दिलेल्या योगदानाची प्रशंसा करत ते म्हणाले, ‘महिंद्रा लॉजिस्टिकने चालकांसारख्या पडद्यामागच्या योद्ध्यांच्या कामाची दखल घेण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. अविरतपणे काम करणारा चालकवर्ग आपल्या देशाचा कणा आहे आणि देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जात आहे. जागतिक दर्जाचे रस्ते आणि त्याला पायाभूत सुविधांची जोड देत आम्ही या चालकांचे आयुष्य जास्त चांगले करण्याचा प्रयत्न करत आहोत. भारताच्या विकासासाठी हा चालकवर्ग देत असलेल्या योगदानाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लिहिण्यात आलेले देश चालक हे पुस्तक त्या दिशेने टाकलेले योग्य पाऊल आहे.’
देश चालक पुस्तकाचे लेखक श्री. रमेश कुमार म्हणाले, ‘हे पुस्तक आपल्या देशाने कायम दुर्लक्ष केलेल्या समाजघटकाकडे लक्ष वेधणारे आहे. या निमित्ताने भारतीय चालकांचे असामान्य आयुष्य आणि त्यांची गोष्ट प्रकाशझोतात आणण्याचा हा प्रयत्न आहे. या उपक्रमासाठी महिंद्रा लॉजिस्टिक्सने दिलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्या मदतीने चालकवर्गाच्या प्रेरणादायी व भावस्पर्शी कथा सर्वांसमोर आणणे व चालकवर्गाच्या कामाची दखल घेणे शक्य झाले आहे.’
महिंद्रा लॉजिस्टिक्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रामप्रवीण स्वामीनाथन म्हणाले, ‘महिंद्रा लॉजिस्टिक्सचे असे ठाम मत आहे, की चालकवर्ग या क्षेत्राच्या कामकाजाचा कणा आहेतच, शिवाय ते संपूर्ण लॉजिस्टिक्स उद्योगाची ताकद आहेत. त्यांच्या असामान्य योगदानाची दखल घेण्यासाठी लिहिण्यात आलेल्या देश चलाक पुस्तकात लॉजिस्टिक उद्योग चालू ठेवण्यासाठी ते कशाप्रकारे अखंडपणे काम करत असतात याचे वर्णन वाचायला मिळते. हे पुस्तक चालकांप्रती आम्हाला वाटणाऱ्या कृतज्ञतेचे प्रतीक आहे. या पुस्तकामुळे त्यांच्या कष्टांची, योगदानाची दखल घेतली जाईल अशी आशा वाटते.’
लाँचप्रसंगी महिंद्रा लॉजिस्टिक्सने चालकांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वाटप करत या समाजाच्या हितासाठी आपली बांधिलकी दाखवून दिली.
आपल्या चालक- भागिदारांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी महिंद्रा लॉजिस्टिक्स बांधील आहे. चालकवर्गात स्वच्छता आणि सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनी
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo‘
- ‘खवणे कयाक्स’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’
- ‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
- राजगुरू टूर्सचा ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने सन्मान
- उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे