गोदरेज सिक्युरिटी सोल्यूशन्सच्या अभ्यासानुसार, मुंबईतील ४०% लोकांचा प्रतिसाद – घर सुरक्षित आहे म्हणजे ‘सुरक्षित व सुखरूप असणे’ I

गोदरेज सिक्युरिटी सोल्यूशन्सच्या अभ्यासानुसार, मुंबईतील ४०% लोकांचा प्रतिसाद – घर सुरक्षित आहे म्हणजे ‘सुरक्षित व सुखरूप असणे’

~घराच्या सुरक्षिततेसाठीच्या सुविधा, उत्पादनांबाबत जागरूकता आणि त्यांचा स्वीकार करण्याची वृत्ती यांची कमतरता दूर करण्यासाठी कंपनी तंत्रज्ञान व नावीन्य यामध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देत आहे~

मुंबई २६ ऑगस्ट २०२२: ‘सुरक्षित आणि सुखरूप’ असणे म्हणजे काय? महामारीमुळे भारतीयांच्या सुरक्षिततेसंदर्भातील सवयींमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. गुन्हेगारीचा दर कायम वाढत असला तरी भारतीय घराच्या सुरक्षिततेपेक्षा आरोग्य आणि शारीरिक सुरक्षिततेला महत्त्व देऊ लागले आहेत. घराच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता आणि त्यासाठीच्या सुविधा, उपाययोजनांचा स्वीकार केला जाणे यामधील वाढती दरी पाहता, गोदरेज अँड बॉयस या गोदरेज समूहातील प्रमुख कंपनीचे एक बिझनेस युनिट असलेल्या गोदरेज सिक्युरिटी सोल्यूशन्सने ‘डीकोडिंग सेफ अँड साऊंड: इन द इंडियन कॉन्टेक्स्ट’ हे सर्वेक्षण केले. यामध्ये असे दिसून आले की, भारतीयांसाठी ‘सुरक्षित व सुखरूप’ असणे हे तीन गोष्टींवर अवलंबून आहे: निरोगी असणे, संपत्ती सुरक्षित असणे आणि तंत्रज्ञानाची सुरक्षितता. मुंबईमधून या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ४४% लोक ‘सुरक्षित व सुखरूप’ असण्याचा संबंध त्यांचे स्वतःचे व स्वतःच्या प्रियजनांचे आरोग्य चांगले असण्याशी जोडतात.

महामारीचा प्रभाव कमी होत आहे आणि लोक घराबाहेर पडू लागले आहेत, या पार्श्वभूमीवर असे लक्षात आले आहे की, मुंबईतील ४०% रेस्पॉन्डन्ट्सनी ‘सुरक्षित व सुखरूप’ असण्याचा संबंध त्यांच्या संपत्ती व मालकीच्या इतर वस्तूंशी जोडला आहे. आरोग्य चांगले राहण्यावर पुन्हा भर दिला जात असल्याचे लक्षात आले जेव्हा ७४% मुंबई रेस्पॉन्डन्ट्सनी सांगितले की घराच्या सुरक्षिततेच्या सुविधांची निवड करताना देखील ते कॉन्टॅक्टलेस (प्रत्यक्ष हाताने स्पर्श न करता वापरता येतील अशा) पर्यायांची निवड करतील. गेल्या दोन वर्षांत गोदरेज सिक्युरिटी सोल्यूशन्सने कॉन्टॅक्टलेस सिक्युरिटी सोल्यूशन्सची श्रेणी सादर केली आहे. या कॅटेगरीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी २०% ची वाढ झाली आहे. सर्वेक्षणात असेही आढळून आले आहे की, कॉन्टॅक्टलेस सिक्युरिटी सुविधा वापरण्याकडे महिलांपेक्षा पुरुषांचा कल जास्त आहे.

एक उल्लेखनीय बाब अशी की, २०२१ मध्ये जेव्हा या ब्रँडने अशाच प्रकारचे सर्वेक्षण केले होते तेव्हा ८०% पेक्षा जास्त रेस्पॉन्डन्ट्सनी चोरीपासून आपल्या घराचे संरक्षण करण्यापेक्षा देखील प्रवास करत असताना आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याविषयी जास्त चिंता वाटते असे मत नोंदवले होते. यावर्षीच्या अहवालात नोंदवण्यात आलेल्या प्रतिक्रिया अधिक संतुलित आहेत. महामारीचा प्रभाव कमी होत असल्याचा हा परिणाम आहे.

गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सचे बिझनेस हेड श्री. पुष्कर गोखले म्हणाले, “गुन्हेगारीचा वाढता दर पाहता, शारीरिक सुरक्षिततेबरोबरीनेच घराच्या सुरक्षिततेवर देखील भर देणे महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आज अनेक वेगवेगळ्या प्रकारची होम सिक्युरिटी सोल्युशन्स बाजारपेठेत उपलब्ध आहेत. पण या अभ्यासातून आमच्या असे निदर्शनास आले आहे की, सुविधा आणि उत्पादने जरी उपलब्ध असली तरी त्यांच्याविषयी लोकांमध्ये असलेली जागरूकता आणि या तंत्रज्ञानयुक्त सुविधांचा स्वीकार करण्याची वृत्ती यामध्ये बरेच अंतर आहे. सुरक्षितता गरजेची आहे हे लोकांना जाणवून देणे, बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या सुविधा, उत्पादनांबद्दल लोकांना जागरूक करणे आणि होम सिक्युरिटी सोल्युशन्समुळे अधिक जास्त सुरक्षित, अधिक सुविधाजनक व लवचिक दिनचर्या कशी ठेवता येईल हे त्यांना समजून सांगणे हा या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतू होता.”

डेटाच्या गोपनीयतेवर संपूर्ण जग भर देत असताना, मुंबईतील फक्त १५.५% रेस्पॉन्डन्ट्स मानतात की सुरक्षित व सुखरूप असणे म्हणजे डेटा सुरक्षित असणे आहे. गेल्या वर्षी गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सने होम कॅमेऱ्यांची भारतातील सर्वात सुरक्षित श्रेणी प्रस्तुत केली. बहुतांश इतर होम सीसीटीव्ही सर्व डेटा देशाबाहेर असलेल्या सर्व्हर्समध्ये डेटा स्टोर करतात पण गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स हे कॅमेरा भारतातील क्लाऊड सर्व्हर्सवर डेटा ट्रान्सफर करतात. गेल्या एका वर्षभरात या ब्रँडच्या सीसीटीव्हींच्या विक्रीत ४०% वाढ झाली आहे.

गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सने हे सर्वेक्षण भारतातील ७ शहरांमध्ये सुरु केले. या सर्वेक्षणातून हाती आलेली एक प्रमुख माहिती म्हणजे फिजिटल सुविधा, उत्पादनांची खूप निकड आहे. देशातील हा आघाडीचा सिक्युरिटी ब्रँड आपला उत्पादन विकास व कम्युनिकेशन्समध्ये या सर्वेक्षणातून हाती आलेल्या निष्कर्षांना विचारात घेणार आहे. भारतीय ग्राहकांना नाविन्यपूर्ण सुरक्षा सुविधा, उत्पादने उपलब्ध करवून देण्यासाठी जागतिक तंत्रज्ञानावर संपूर्ण लक्ष केंद्रित करत या ब्रँडने तंत्रज्ञान व नावीन्य यामधील आपली गुंतवणूक गेल्या वर्षभरात ५०% नी वाढवली आहे.

Godrej security solutions
Godrej security solutions

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *