महिंद्रा लॉजिस्टिक्सने १ लाख चौरस फुटांचे मल्टी-क्लायंट वेयरहाऊस नाशिकमध्ये सुरु केले I

महिंद्रा लॉजिस्टिक्सने लाख चौरस फुटांचे मल्टी-क्लायंट वेयरहाऊस नाशिकमध्ये सुरु केले.

~ द्वितीय व तृतीय श्रेणी शहरामध्ये नेटवर्क विस्तारासाठी हाती घेतला महत्त्वाकांक्षी उपक्रम ~

~नूतनीकरणीय उर्जेवर लक्ष केंद्रित करणारी पर्यावरणपूरक वेयरहाऊसिंग वास्तुकला~

मुंबई, नाशिक, ८ सप्टेंबर २०२२: एकीकृत लॉजिस्टिक्स सेवा पुरवणारी भारतातील एक सर्वात मोठी कंपनी महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडने (एमएलएल) १ लाख चौरस फुटांच्या वेयरहाऊसचे आज उद्घाटन केले.  अनेक वेगवेगळ्या ग्राहकांना सेवा पुरवण्याच्या क्षमता, नूतनीकरणीय ऊर्जा, संसाधनांचे संवर्धन आणि हरित कव्हर यांचा समावेश असलेल्या पर्यावरणपूरक वेयरहाऊसिंग वास्तुकलेच्या साहाय्याने या वेयरहाऊसची रचना करण्यात आली आहे.

हे अत्याधुनिक वेयरहाऊस महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या संपूर्ण भारतभरात विस्तारलेल्या मल्टी-युजर सुविधांचा एक महत्त्वाचा भाग असणार आहे. या सुविधांमार्फत ग्राहकांना उत्पादन आणि पूर्तता कामांमध्ये मदत पुरवली जाते. हे नवे वेयरहाऊस ई-कॉमर्स, ग्राहकोपयोगी वस्तू, उत्पादन व अभियांत्रिकी उद्योगक्षेत्रांना साहाय्य पुरवेल. बिल्ट-टू-सूट (बीटीएस) पद्धतीचे हे वेयरहाऊस महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या पर्यावरण संरक्षण व संवर्धन मानकांनुसार डिझाईन करण्यात आले आहे, यामध्ये रिसायकल करण्यात आलेल्या बांधकाम साहित्याचा वापर, द्रव कचऱ्याचे व्यवस्थापन, नूतनीकरणीय ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापन आणि अत्याधुनिक ऑटोमेशन यांचा समावेश आहे. वेयरहाऊसमध्ये ऑनसाईट सोलर ऊर्जा निर्मिती क्षमता असून त्याद्वारे ऊर्जेच्या संपूर्ण गरजा पूर्ण केल्या जातात. कार्गो वाहने आणि व्यक्तिगत वाहनांसाठी सोलर चार्जिंगची क्षमता देखील यामध्ये आहे. 

महिंद्रा लॉजिस्टिक्सचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ श्री. रामप्रवीण स्वामिनाथन यांनी यावेळी सांगितले, या नव्या फॅसिलिटीमध्ये जागतिक दर्जाच्या वेयरहाऊसिंग पायाभूत सोयीसुविधांचे भारतभर पसरलेले नेटवर्क ग्राहकांना पुरवण्यावर भर दिला जाणार आहे. आमच्या ग्राहकांना एकीकृत, त्यांच्या गरजांनुसार तयार करण्यात आलेल्या सुविधा पुरवण्यावर आणि पूर्तता करण्यावर आमचा भर कायमच राहील आणि त्यासाठी प्रचंड मोठे वेयरहाऊसिंग नेटवर्क अतिशय महत्त्वाचे आहे. द्वितीय श्रेणी शहरांमध्ये अधिक मोठ्या आणि जागतिक दर्जाच्या सुविधांचा विस्तार करण्याच्या आमच्या योजनेचा भाग म्हणून आम्ही हे वेयरहाऊस सुरु करत आहोत. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हे नवे वेयरहाऊस म्हणजे एक मापदंड आहे. २०४० सालापर्यंत कार्बन तटस्थ होण्याचे आमचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हे पुढचे पाऊल आम्ही उचलले आहे.”

Mahindra Logistics warehouse (1)
Mahindra Logistics warehouse (1)

About Mahindra Logistics

Mahindra Logistics Limited (MLL) is an integrated third-party logistics (3PL) service provider, specializing in supply chain management and enterprise mobility. MLL serves over 400+ corporate customers across various industries like Automobile, Engineering, Consumer Goods and E-commerce. The Company pursues an “asset-light” business model, providing customised and technology enabled solutions that span across the supply chain and people mobility services.  

For more information, visit www.mahindralogistics.com

About Mahindra

Founded in 1945, the Mahindra Group is one of the largest and most admired multinational federation of companies with 260,000 employees in over 100 countries. It enjoys a leadership position in farm equipment, utility vehicles, information technology and financial services in India and is the world’s largest tractor company by volume. It has a strong presence in renewable energy, agriculture, logistics, hospitality and real estate. 

The Mahindra Group has a clear focus on leading ESG globally, enabling rural prosperity and enhancing urban living, with a goal to drive positive change in the lives of communities and stakeholders to enable them to Rise.

Learn more about Mahindra on www.mahindra.com / Twitter and Facebook: @MahindraRise/ For updates subscribe to https://www.mahindra.com/news-room  

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *