गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड पालघरमधील मनोर येथे ५० एकराचा निवासी प्रकल्प आणत आहे I

गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड पालघरमधील मनोर येथे ५० एकराचा निवासी प्रकल्प आणत आहे

हा प्रकल्प अंदाजे रु.५०० कोटी ची बूकिंग मूल्य क्षमता प्रदान करेल

मुंबई, नोव्हेंबर ३२०२२: भारतातील एक अग्रगण्य रीयल इस्टेट डेव्हलपर  गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (जी पी एल), (बी एस इ स्क्रिप आय डी: GODREJPROP) ने आज जाहीर केले की, त्यांनी जलद गतीने विकसित होणाऱ्या पालघरमधील  मनोरच्या लघु बाजारपेठेत प्रत्यक्ष जमीन खरेदीचा करार केला आहे.

   ५० एकराच्या क्षेत्रामध्ये पसरलेल्या या प्रस्तावित प्रकल्पामध्ये प्रामुख्याने निवासी भूखंड विकासाची अंदाजे १.२ दशलक्ष चौरस फूट क्षेत्राची विक्री योग्य जागा असल्याचा अंदाज आहे. मनोर, पालघर, बोईसर, आणि वाडा हे त्यांच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वामुळे वीकएंडला फिरायला जाण्यासाठी प्रसिद्ध असल्याने ते गुंतवणुकीसाठी लोकप्रिय लघु बाजारपेठ बनले आहेत.

मनोर हे विविध शाळा, महाविद्यालये, दवाखाने, बाजारपेठ असे चांगली पायाभूत सुविधा असलेले एक स्वयंपूर्ण शहर आहे. सदर प्रस्तावित भूखंड महाराष्ट्र आणि गुजरात च्या महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या  मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या जवळ आहे. प्रस्तावित मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन चे सुद्धा स्टेशन मनोरच्या जवळ बोईसर येथे असेल.

गोदरेज प्रॉपर्टीज चे व्यवस्थापकीय संचालक आणि सी. इ ओ. मोहित मल्होत्रा म्हणाले की, “भूखंड विकासाच्या दृष्टीने मनोर ही एक अत्यंत आश्वासक बाजारपेठ आहे. आमच्या पोर्टफोलिओ मध्ये हा प्रकल्प जोडला जात आहे याचा आम्हाला आनंद होत आहे. प्रीमिअम सेकंड होम च्या मागणीत आता कोविड संपल्यानंतर वाढ झाली आहे. हा प्रकल्प या प्रकारच्या ग्राहकांसाठी असेल आणि निवासी लघु बाजारपेठेत सखोल प्रवेश करण्याच्या गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडच्या  धोरणाला पूरक ठरेल.”

Godrej Properties
Godrej Properties

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *