गोदरेज लॉक्सची अतुलनीय डिझाइन आणि सुरक्षिततेसह होम डेकोर हँडल्स I

गोदरेज लॉक्सची अतुलनीय डिझाइन आणि सुरक्षिततेसह होम डेकोर हँडल्स I

मुंबई, २७ जून २०२३: गोदरेज आणि बॉयसची प्रमुख कंपनी असलेली गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्स (GLAFS) मुंबई मध्ये इंटरकनेक्टेड डिजिटल लॉक्सच्या नवीनतम श्रेणीसह होम डेकोर हँडल्सच्या नवीन श्रेणीचे अनावरण करून त्यांच्या आर्किटेक्चरल फिटिंग श्रेणीचा विस्तार करत आहे. कार्यक्षमता आणि सौंदर्यशास्त्राच्या मिश्रणातून चालना मिळालेली, होम डेकोर हँडलची ही नवीन सादर केलेली वैविध्यपूर्ण श्रेणी निओ-लक्झरी, युरो-मॉडर्न, अर्बन चिक आणि स्मार्ट एथनिक यांसारख्या विशिष्ट शैली आणि डिझाइनमध्ये उपलब्ध असेल. ग्राहकांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करताना अभिजातता जपत रोझ गोल्ड आणि ब्लॅक सारखी अत्याधुनिक फिनिशेस सादर करण्यात ब्रँडला अभिमान वाटत आहे.

भारताच्या डिजिटल लॉक बाजारपेठेमध्ये असलेल्या मजबूत स्थितीसह गोदरेज लॉक्सने निवासी आणि आदरातिथ्य क्षेत्रासाठी भारतातील पहिले इंटरकनेक्टेड डिजिटल लॉक सादर करण्याची घोषणा केली. वाढता ग्राहक वर्ग आणि डिजिटल पद्धतीने गृह सुरक्षा उपायांचा अवलंब करण्याचा वाढता कल यासह गोदरेज लॉक आधुनिक डिझाइन आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत उपाय पुरवून  सुरक्षितता आणि गोपनीयतेला प्राधान्य देत आहे. डिझाईन, सुरक्षितता आणि कस्टमायझेशनवर मजबूत लक्ष केंद्रित करून, ब्रँडचे उद्दिष्ट कार्यक्षमता आणि सौंदर्यशास्त्र यांचे अखंडपणे मिश्रण करणाऱ्या आर्किटेक्चरल फिटिंग्ज आणि डिजिटल लॉक्सची विस्तृत श्रेणी सादर करण्याचे आहे.

कंपनी आर्किटेक्चरल फिटिंग क्षेत्राशी पूर्णपणे बांधील असून पुढील पाच वर्षांत या क्षेत्रातील पहिल्या तीन ब्रँडमध्ये स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट आहे. GLAFS तर्फे Neu-Lift Bed Fittings आणि HIKIDO वॉर्डरोब फिटिंग्ज श्रेणी देखील सादर करण्यात येत असून ते भविष्यातील डिझाईन्स आणि सानुकूल उपायसुविधा सादर करत आहे. कंपनीचा आर्किटेक्चरल फिटिंग श्रेणीतील धोरणात्मक विस्तार, अतुलनीय गुणवत्ता, नाविन्यपूर्ण डिझाइन आणि तडजोड न होणारी सुरक्षा मानके पुरविण्याच्या अटूट बांधिलकीसह आर्किटेक्चरल फिटिंग्ज उपायसुविधांचा विश्वासार्ह पुरवठादार म्हणून आपला नावलौकिक अधिक मजबूत करण्याच्या बांधिलकीची पुष्टी करते.

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी भारतातील पहिले इंटरकनेक्ट केलेले डिजिटल लॉक सादर करत असताना  Catus हॉस्पिटॅलिटी लॉक्स हे हॉटेल सुरक्षा गरजांचे व्यवस्थापन करण्यासाठीच्या अत्याधुनिक उपायसुविधा आहेत. क्लाउड तंत्रज्ञान आणि बीएलई मेश नेटवर्किंगसह हे लॉक वैयक्तिक हॉटेल परिसर तसेच देशभरातली हॉटेल सेटअपसाठीचे संपूर्ण नियंत्रण पुरवते.

Catus कनेक्टेड रेसिडेन्शिअल लॉक हे ५ इन १ कनेक्टेड लॉक असून ते फिंगरप्रिंट, पासकोड, आरएफआयडी कार्ड, मेकॅनिकल की आणि मोबाईलद्वारे कार्यरत केले जाऊ शकते. हे व्हिडिओ डोअर फोनसह विविध स्मार्टहोम उपकरणांसह अखंडपणे विनाअडथळा एकत्रित केले जाऊ शकते. वायफाय कनेक्टिव्हिटीसह ते जगात कुठूनही कार्यरत केले जाऊ शकते. शिवाय, त्याचे ट्रेंडी फिनिश, दीर्घ बॅटरी लाईफ आणि सुरक्षितता सुनिश्चित करणारी मजबूत लॉक बॉडी निवासी वापरासाठी या कुलूपाला आदर्श बनवते.

About Godrej Locks & Architectural Fittings and Systems:

Godrej Locks & Architectural Fittings and Systems is a 125-year-old leading manufacturer of innovative locking devices. Since its inception in 1897 by Ardeshir Godrej, the name ‘Godrej’ has become synonymous with trust, protection and integrity. From the first Anchor branded lock in 1897 to the first ever spring less lock in 1907, to the iconic ‘Nav-Tal’ in 1954, and to the postmodern biometric locks, Godrej has set every benchmark in the locks industry. Over the years, Godrej Locks &Architectural Hardware and Fittings have changed in form, function and scope of application. But one thing still remains the same – the solid stamp of trust and reliability. Godrej Locks & Architectural Fittings and Systems adhere to global quality norms and hold ISO 9001, ISO 14001 and OHSAS 18001 certifications.

Godrej Locks-Catus

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *