गोदरेज अप्लायन्सेसतर्फे भारतातील पहिला लीक प्रूफ स्प्लिट एअर कंडिशनर सादर I
गोदरेज अप्लायन्सेसतर्फे भारतातील पहिला लीक प्रूफ स्प्लिट एअर कंडिशनर सादर
- त्याचे अग्रगण्य अँटी-लीक तंत्रज्ञान (पेटंटसाठी दाखल) एसीमधून पाणी गळतीचे आव्हान हाताळते
- आगामी उन्हाळ्यात एसी श्रेणीसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढीचे लक्ष्य
दिल्ली, १६ फेब्रुवारी २०२३: गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयसची व्यवसाय शाखा असलेल्या गोदरेज अप्लायन्सेसने अँटी-लीक तंत्रज्ञानासह भारतातील पहिला लीक प्रूफ स्प्लिट एअर कंडिशनर सादर केला आहे आणि त्यासाठी पेटंट देखील दाखल केले आहे. ‘थिंग्ज मेड थॉटफुली’ (विचारपूर्वक गोष्टी बनविणे) या ब्रँड तत्त्वज्ञानानुसार या शक्तिशाली उद्योगक्षेत्रातील प्रथम, अग्रगण्य नवकल्पना आज एसी ग्राहकांना भेडसावत असलेल्या अनेक समस्यांचे निराकरण करण्याचे वचन देते.
घरात आत एअर कंडिशनरमधून पाणी गळणे ही अनेक एसी वापरकर्त्यांना भेडसावणारी एक सर्वसाधारण समस्या आहे. अंदाजे ८५% एसी ग्राहकांना उत्पादन चालू असतानाच्या काळात किमान एकदा तरी या समस्येचा सामना करावा लागतो आणि परिणामी ही समस्या एसीच्या प्रमुख समस्यांपैकी एक आहे. ग्राहकांनी केलेल्या गुंतवणुकीपैकी एअर कंडिशनर हे सर्वात महागडे उपकरण आहे आणि घराच्या सौंदर्यावरही त्याचा प्रभाव पडतो. खोलीत पाणी ठिबकत राहणे हा एक निराशाजनक अनुभव आहे. कायमस्वरूपी उपाय मिळत नाही म्हणून लोकही दुरुस्ती सेवांचा अवलंब करतात किंवा तात्पुरत्या उपायांचा अवलंब करतात. पण चिंता ही केवळ सौंदर्य आणि अवघडवून टाकणारी निराशाजनक परिस्थिती एवढ्यापुरती मर्यादित नाही; तर त्यामुळे इतर महागडे खर्चही भोगावे लागतात. जसे की वॉल पेंट किंवा वॉलपेपर खराब होणे. त्यामुळे तो बदलणे आवश्यक होते. तिथे प्लग पॉइंट असल्यास इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट सारख्या दुर्घटना घडू नयेत म्हणून सुरक्षिततेच्या समस्या भेडसावतात. दीर्घकाळ भिंती ओलसर राहिल्यास बुरशीची वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे अॅलर्जी आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांसारखे संभाव्य आरोग्य विषयक धोके उद्भवतात. लहान मुले किंवा दम्याचे रुग्ण यांना तर अधिक त्रास होऊ शकतो.
गोदरेज लीक प्रूफ* स्प्लिट एसी मध्ये अंतर्भूत केलेल्या अत्याधुनिक अँटी-लीक तंत्रज्ञानाचा उद्देश वरील समस्यांशी लढण्यासाठी कायमस्वरूपी उपाय सादर करण्याचा आहे. हा एसी इतर अनेक संबंधित तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्ये सादर करतो जसे की 5-इन-1 कन्व्हर्टेबल कूलिंग टेक्नॉलॉजी. हे तंत्रज्ञान खोलीतील लोकांच्या संख्येच्या आधारे सेट केले जाऊ शकते आणि ऊर्जा वाचविण्यास मदत करते. आरामासाठी सेट तापमानाशी जास्तीत जास्त जुळण्यासाठी आय-सेन्स तंत्रज्ञान, ५२ डिग्री सेल्सिअस तापमानातही कमी डेरेटिंगसह शक्तिशाली कूलिंग, ऊर्जा बचती साठी इन्व्हर्टर तंत्रज्ञान आणि शून्य ओझोन डिपलेशन असलेला पर्यावरणपूरक R32 रेफ्रिजरंट आणि कमी ग्लोबल वार्मिंग परिणाम अशी यात वैशिष्ट्ये आहेत. याव्यतिरिक्त, यात १००% तांबे कॉइल आहेत आणि कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि गंज प्रतिकार करण्यासाठी कनेक्टिंग पाईप आणि गंजरोधक ब्ल्यू फिन्स बसवले आहेत.
या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या सादरीकरणाबद्दल बोलताना गोदरेज अँड बॉयसचा भाग असलेल्या गोदरेज अप्लायन्सेसचे व्यवसाय प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी म्हणाले, “गोदरेज अप्लायन्सेसमध्ये आम्ही ग्राहकांसमोरील आव्हानांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानासह नाविन्यपूर्ण उपाय सुविधा देण्यासाठी अथक प्रयत्न करत आहोत. आमच्या संशोधन आणि डिझाईन केंद्रांवर अनेक चाचण्यांनंतर, आम्ही अँटी-लीक तंत्रज्ञान परिपूर्ण केले आहे आणि भारतातील पहिला लीक प्रूफ स्प्लिट एसी बनवला आहे. यामुळे ग्राहकांना दीर्घ काळ त्रास होत असलेल्या एसी तील पाणी गळतीच्या समस्येपासून अत्यंत आवश्यक असा दिलासा मिळण्याची खात्री आहे. आगामी उन्हाळी हंगामासाठी मजबूत उत्पादन पोर्टफोलिओसह गेल्या वर्षीच्या तुलनेत एसीच्या विक्रीत दुपटीपेक्षा जास्त वाढ अपेक्षित आहे.”
गोदरेज अप्लायन्सेसच्या एअर कंडिशनर्स विभागाचे प्रॉडक्ट ग्रुप हेड सब्यसाची गुप्ता पुढे म्हणाले, “भारतातील पहिला लीक प्रूफ स्प्लिट एअर कंडिशनर सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. त्याचे उद्दिष्ट पाणी गळतीवर उत्कृष्ट प्रतिबंध करणे हे आहे. अधिक टिकाऊपणा, चांगले कार्यप्रदर्शन, सौंदर्य वृद्धी, आरोग्य आणि सुरक्षितता पुरवत हे सादरीकरण ग्राहकांना अधिक चांगला आणि त्रासमुक्त एसी अनुभव देते. या अग्रगण्य प्रस्तावासह, आगामी उन्हाळी हंगामासाठी, गोदरेज अप्लायन्सेसकडे २५ हून अधिक SKU ची लाइनअप आहे. त्यामध्ये अनेक प्रगत तंत्रज्ञान आणि ४ वे-स्विंग, 5-इन-1 परिवर्तनीय कुलिंग, UVCool आणि नॅनो कोटेड अँटी-व्हायरल फिल्टरेशन तंत्रज्ञान, हेवी ड्यूटी कूलिंग, हॉट आणि कोल्ड एसीज आणि स्मार्ट IOT सक्षम एसीज वैशिष्ट्यांचा समावेश आहे.”
गोदरेज लीक प्रूफ स्प्लिट एसी १० वर्षांच्या इनव्हर्टर कंप्रेसर वॉरंटीसह येतो. हा एसी लवकरच विविध स्टोअर्स आणि लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ४८,९००/- रु.मध्ये उपलब्ध होणार आहे. ग्राहक त्यासाठी सुलभ वित्त पर्यायांचा लाभही घेऊ शकतात.
About Godrej Appliances
Godrej Appliances, a business unit of Godrej & Boyce, is one of the leading Home Appliances players in India. Godrej & Boyce was the first Indian Company in 1958 to manufacture refrigerators and since then Godrej Appliances has expanded its portfolio across several categories like Washing Machines, Air Conditioners, Microwave Ovens, futuristic Thermo-electric cooling solutions, Air Coolers, Deep Freezers, highly specialized Medical Refrigerators, UVC Technology-Based Disinfecting devices, Dishwashers, and more recently InsuliCool product range. This portfolio has been powered by the driving philosophy of ‘Things Made Thoughtfully.’
Environment protection is a core value at Godrej. Thus, this concept extends from human-centric design to planet-centric design. Both manufacturing units of Godrej Appliances became the first in India to win the coveted Platinum Plus Green Co. certification for their pioneering eco-friendly practices. The brand takes pride in its carefully designed products and environment-friendly technologies. Further to this, it promptly provides the best-in-class, after-sales service through more than 680 service centers and 4500 + SmartBuddy service experts pan-India.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi