वर्ष अखेरीचे विशेष भाष्य I

वर्ष अखेरीचे विशेष भाष्य

गोदरेज अप्लायन्सेस चे व्यवसाय प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष श्री. कमल नंदी म्हणाले, “या वर्षी कोविड १९ च्या महामारी चा प्रभाव घरगुती उपकरणे विभागात कमी झाल्याचे आम्ही पाहिले. दोन वर्षांनंतर यावर्षी उन्हाळ्यात थंड उपकरणांना (रेफ्रीजरेटर व एयर कंडिशनर) जास्त मागणी दिसून आली आणि नंतर सणासुदीच्या काळात ग्राहकांनी त्यांची जी खरेदी काही काळापासून पुढे ढकलली होती त्या खरेदीस सुरुवात केली. तसेच हा कालावधी ग्राहकांना त्यांची जुनी उपकरणे अपग्रेड करण्यासही अनुकूल ठरला. महागाईने जरी सर्वांना मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या वस्तूंच्या क्षेत्रावर (मास सेगमेन्ट) परिणाम केला असला तरी विशेष वस्तूंचे क्षेत्र (प्रिमियम सेगमेन्ट) मात्र तेजीत होते.

मास सेगमेन्ट पेक्षा प्रिमियम सेगमेन्ट ने सर्व भौगोलिक क्षेत्रात आणि सर्व चॅनेल्स मध्ये वाढ पाहिली. गोदरेज अप्लायन्सेससाठी, प्रिमियम सेगमेन्ट आर्थिक वर्ष १९-२० च्या कोविड महामारीपूर्व कालावधीच्या तुलनेत १००% पेक्षा जास्त वाढला आहे; हा विकासदर उद्योग क्षेत्राच्या विकासदराच्या सममूल्य आहे. या व्यतिरिक्त, अधिक आरामदायी, जास्त क्षमता असलेली, आधुनिक तंत्रज्ञानासह आरोग्याला प्रथम महत्व देणारी नावीन्यपूर्ण व कल्पक उपकरणांसाठी आम्ही जास्त आकर्षण पाहिले. याची पूर्तता करण्यासाठी आम्ही सर्व प्रकारांमध्ये मुख्यत्वे प्रिमियम श्रेणींच्या उत्पादनांभोवती केंद्रित असलेली- साइड बाय साइड रेफ्रीजरेटर पासून ते सर्वात उत्तम ऑटोमेटिक वॉशिंग मशीन पर्यंत, डबल डोअर रेफ्रीजरेटरपासून ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या एयर कंडीशनर आणि आमच्या नवीन कूलिंग सोल्यूशन इन्स्यूलीकूल पर्यंत- अशी १०० हून अधिक नवीन उत्पादन एस के यूस् (SKU) प्रदान केली आहेत. यापैकी बऱ्याच प्रिमियम ऑफर या ग्राहकांच्या आरोग्यासाठी जास्त उपयुक्त आणि अधिक आरामदायी व पेटंट लागू केलेल्या आहेत; ज्यामध्ये रेफ्रीजरेटरमध्ये अन्न निर्जंतुकीकरण तंत्रज्ञान, वॉशिंग मशीन मध्ये जंतु निर्जंतुकीकरण तंत्रज्ञान किंवा एयर कंडिशन मधीन इंसुलिन साठी अनोखे थर्मॉइलेक्ट्रिक प्रिसिजन कूलिंग असे तंत्रज्ञान समाविष्ट आहेत. यामुळे आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये गोदरेज अप्लायन्सेसने गेल्या वर्षी च्या तुलनेत ६६% पेक्षा जास्त वाढ म्हणजेच उद्योग क्षेत्राच्या विकासदराच्या सममूल्य वाढ प्राप्त केली आहे.

        २०२३ च्या वाढीच्या संभाव्यतेबाबत बोलायचे झाल्यास, आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये संपूर्ण उद्योग क्षेत्राचीच साधारणतः १०%-१५% वाढ होण्याची शक्यता आहे आणि गोदरेज अप्लायन्सेस या कालावधी मध्ये २०% वाढीची अपेक्षा करीत आहे. ही वाढ प्रामुख्याने प्रिमियम विभागांद्वारा केली जाईल. या वर्षात नोव्हेंबरपर्यंत (YTD) चा डेटा फ्रॉस्ट फ्री  रेफ्रीजरेटर आणि पूर्णपणे ऑटोमेटिक वॉशिंग मशीनसह प्रिमियम ट्रेंड च दाखवीत आहे आणि ते अजून अधिक तेजीत वाढत ही आहे. आम्ही महत्त्वपूर्ण गुंतवणूकीच्यादेखील योजना आखल्या आहे आणि आमची नवीन उत्पादनेही बाजारात येत आहेत.
Mr. Kamal Nandi, Business Head and Executive Vice President – Godrej App...
Mr. Kamal Nandi, Business Head and Executive Vice President – Godrej App…

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *