महिंद्रा लाइफस्पेस® तर्फे पुण्यातील पहिली बायोफिलिया-प्रेरित घरे सादर

महिंद्रा लाइफस्पेस® तर्फे पुण्यातील पहिली बायोफिलिया-प्रेरित घरे सादर

दहाव्या निवासी प्रकल्पाच्या शुभारंभासह केले पुण्यातील आपले स्थान अधिक बळकट

पुणे, ०६ जुलै २०२२: महिंद्रा समूहाची बांधकाम क्षेत्र आणि पायाभूत सुविधा विकास शाखा महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडने आज आपली संपूर्णपणे मालकीची उपकंपनी महिंद्रा ब्लूमडेल डेव्हलपर्स लिमिटेडच्या द्वारे पुण्यातील पहिली बायोफिलिया प्रेरित घरे पिंपरी येथे सादर केली. निसर्गाशी मानवाच्या सहज संबंधाने प्रेरित होणे याला बायोफिलिया म्हणतात. त्यासाठी प्रकल्पाचे घटक नैसर्गिक साहित्य, पोत, नमुने आणि आकार यांनी प्रेरित असतात. शाश्वत भविष्य घडवताना जुन्या आठवणींना उजाळा देतात. या सहयोगातून महिंद्रा नेस्टॅल्जिया येथील घरे एखाद्याच्या बालपणाची आठवण करून देणारी सक्रिय आणि निरोगी जीवनशैलीला पोषक असतील  आणि तरुण पिढ्यांमधील रहिवाशांना तशाच प्रकारचे जीवन आणि समुदाय अनुभव घेण्यास सक्षम करतील.

Mahindra Nestalgia - Pond View
Mahindra Nestalgia – Pond View

नॉस्टॅल्जिया-प्रेरित सौंदर्यशास्त्रासह डिझाइन केलेली ही बायोफिलिया-प्रेरित घरे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य सक्षम करतील. स्वातंत्र्य, कुतूहल आणि निरागसतेच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या सुविधांमध्ये हॉपस्कॉच, सन डायल, बेअरफूट पार्क, हॅमॉक गार्डन, बर्मा ब्रिज, ड्यू गार्डन, फर पार्क आणि बरेच काही समाविष्ट आहे. महिंद्रा नेस्टॅल्जिया येथील घरे कोई तलाव,  ८ आकारातील फूट ची, गपशप अड्डा, रेन बेंचेस आणि एल्डर्स पार्कलेटसह हिरव्यागार पसरलेल्या जागेत रहिवाशांना प्रकल्पाच्या सुरक्षित परिघात निसर्गाचा आनंद लुटता येईल.

महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद सुब्रमण्यन म्हणाले, ” आमच्यासाठी महत्वाच्या आणि मुख्य भर असलेल्या बाजारपेठापैकी एक असलेल्या पुण्यात आम्ही आमचे स्थान मजबूत करत असताना शहरातील पहिला बायोफिलिया-प्रेरित निवासी प्रकल्प सादर करण्यास आम्ही खूप उत्सुक आहोत. महिंद्रा नेस्टॅल्जिया हा आमचा पुण्यातील दहावा प्रकल्प आहे. पुणे हे एक असे शहर आहे जिथे थोडी उसंत आहे, निवांतपणा आहे आणि या शहराने पुन्हा पुन्हा आमच्या नाविन्यपूर्ण सादरीकरणासाठी जोरदार मागणी केली आहे.

कुटुंबाच्या सर्वांगीण स्वास्थ्यात घर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर याबाबतची भूमिका अनेकदा दुर्लक्षित झालेली असते. आपण आपल्या वाढत्या वयातील दिवसांपासूनच्या गोष्टी प्रेमाने लक्षात ठेवलेल्या असतात. यातूनच महिंद्रा नेस्टॅल्जिया जगण्याचे सार परत आणते. यातील अनेक गोष्टींचा संबंध निसर्गाशी आहे. हा प्रकल्प पुणेकरांना झपाट्याने विकसित होणाऱ्या शहराच्या सोयीसुविधांचा आनंद घेत निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची संधी देईल.”

महिंद्रा लाइफस्पेसेसच्या पर्यावरणास अनुकूल घरे तयार करण्याच्या वचनबद्धतेनुसार, महिंद्रा नेस्टॅल्जियाला IGBC द्वारे ‘गोल्ड’ रेटिंगसह पूर्व-प्रमाणित करण्यात आले आहे. हा प्रकल्प रहिवाशांना लो-फ्लो वॉटर फिक्स्चर, सोलर वॉटर हीटर, सामाईक भागात एलईडी लाइटिंग, कचरा विलगीकरण इत्यादींद्वारे मूर्त बचत सुविधा प्रदान करतो. प्रकल्पातील शाश्वत वैशिष्ट्ये वार्षिक ७% पर्यंत ऊर्जेचे संरक्षण करण्यास, बाह्य पाण्यावरील अवलंबित्व ५२ % नी कमी करण्यास आणि ९०% कचरा लँडफिलमधून वळवण्यास मदत करतील.

महिंद्रा लाइफस्पेसेसने मार्च २०२२ मध्ये अधिग्रहित केलेल्या २.७९-एकर जागेवर महिंद्रा नेस्टॅल्जिया विकसित केले आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात २४९ युनिट्सचा समावेश आहे. 2 आणि 3 BHK घरे ७३० चौरस फूट ते १०४० चौरस फूट पर्यंत आहेत. महिंद्रा नेस्टॅल्जियाचे हवामान-प्रतिसादक डिझाइन घरांमध्ये इष्टतम सूर्यप्रकाश, ताजी हवा अभिसरण आणि शेजारच्या शांत लँडस्केपसाठी खुले असल्याचे सुनिश्चित करते. येथे विचारपूर्वक तयार केलेली भव्य लॉबी, मुलांच्या खेळण्यासाठी पूलसह स्विमिंग पूल, क्रिशे आणि हेल्थ क्लबसाठी जागा, सेलिब्रेशन हॉल, ड्राय पॅन्ट्री, सिनेमा लाउंज, रीडर्स बे आणि इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्याची तरतूद यासारखी आधुनिक वैशिष्ट्ये देखील आहेत.

नामांकित शैक्षणिक संस्था, आरोग्य सेवा सुविधा आणि रिटेल अव्हेन्यू यासारख्या विकसित सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये हा प्रकल्प वसला आहे. केवळ २० किमी त्रिज्येच्या परिसरामध्ये अनेक मोठ्या उत्पादन आणि तंत्रज्ञान कंपन्यांसह हा परिसर एक प्रमुख रोजगार केंद्र देखील आहे. हा परिसर जुना मुंबई-पुणे महामार्ग, पुणे-धुळे-नासिक महामार्ग, रेल्वे स्थानके (कासारवाडी आणि पिंपरी), बस स्टॉप (पिंपरी चौक) आणि मेट्रो स्टेशन (संत तुकाराम नगर) मार्गे उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी देखील प्रदान करतो.

महिंद्रा लाइफस्पेसेस® २००७ पासून पुण्यात अस्तित्वात आहे आणि त्यांनी शहरातील सुमारे ३.५  दशलक्ष चौरस फूट विकास पूर्ण केला आहे. महिंद्रा नेस्टॅल्जिया हे महिंद्रा रॉयल, महिंद्रा अँथिया आणि महिंद्रा सेंट्रलिस – जे सर्व पूर्णपणे विकले गेले आहेत अशा सध्याच्या निवासी प्रकल्पांच्या जवळ स्थित आहे.

महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड विषयी

महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड (‘महिंद्रा लाइफस्पेसेस’) ची स्थापना १९९४ मध्ये झाली.  समृद्ध रहिवासी समुदाय आणि व्यावसायिक परिसंस्था सक्षम करून भारतातील बांधकाम व्यवसाय क्षेत्र आणि पायाभूत सुविधा उद्योगात ‘भरारी’ आणण्याचे महिंद्रा समूहाचे तत्त्वज्ञान ते पुढे नेत आहेत. सात भारतीय शहरांमध्ये पूर्ण झालेले, चालू असलेले आणि आगामी निवासी प्रकल्प मिळून २९.९ दशलक्ष चौ. फूट (२.७८  दशलक्ष चौ. मीटर) असा कंपनीचा विकासाचा ठसा उमटला आहे आणि ५,००० एकर पेक्षा जास्त चालू आणि आगामी प्रकल्प विकासाच्या प्रक्रियेत/ व्यवस्थापन अंतर्गत त्याच्या एकात्मिक विकास / औद्योगिक क्लस्टर्सवर चार ठिकाणी सुरू आहेत.

महिंद्र लाइफस्पेसेसच्या विकास पोर्टफोलिओमध्ये प्रीमियम निवासी प्रकल्पांचा समावेश आहे; ‘महिंद्रा हॅपिनेस्ट® ब्रँड अंतर्गत व्हॅल्यू होम्स आणि अनुक्रमे ‘महिंद्रा वर्ल्ड सिटी’ आणि ‘ओरिजिन्स बाय महिंद्रा’ ब्रँड अंतर्गत एकत्रित शहरे आणि औद्योगिक क्लस्टर्स समाविष्ट आहेत. दर्जेदार, गुणवत्तापूर्ण जीवन आणि व्यवसाय वाढीसाठी कंपनी नावीन्यपूर्णता, विचारपूर्वक केलेले डिझाइन आणि शाश्वततेसाठी असलेली सखोल बांधिलकी यांचा लाभ घेते.

जागतिक विज्ञान आधारित लक्ष्य उपक्रम (SBTI) साठी बांधील असलेली ही भारतातील पहिली रिअल इस्टेट कंपनी आहे.  महिंद्रा लाइफस्पेसचे सर्व प्रकल्प पर्यावरणपूरक प्रमाणित आहेत. २०१३  पासून १००% हरित पोर्टफोलिओसह कंपनी २०४० पर्यंत कार्बन न्यूट्रॅलिटीच्या दिशेने काम करत आहे आणि भारतातील हवामान परिस्थितीनुसार हरित इमारतींच्या संशोधनाला सक्रियपणे समर्थन देत आहे. महिंद्रा लाइफस्पेस® ला त्याच्या प्रकल्पांसाठी आणि ESG उपक्रमांसाठी ८० हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.

www.mahindralifespaces.com वर महिंद्रा लाइफस्पेस® बद्दल अधिक जाणून घ्या

Mahindra Nestalgia - Elevation
Mahindra Nestalgia – Elevation

महिंद्रा बद्दल

१९४५ मध्ये स्थापन झालेला महिंद्रा समूह हा सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक प्रशंसनीय बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या महासंघापैकी एक असून १०० पेक्षा जास्त देशांमध्ये त्यांचे २,६०,००० कर्मचारी आहेत. शेती उपकरणे, उपयुक्तता वाहने, माहिती तंत्रज्ञान आणि वित्तीय सेवांमध्ये भारतात हा समूह  आघाडीवर आहे आणि आकारमानाच्या प्रमाणात जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे. अक्षय ऊर्जा, कृषी, लॉजिस्टिक, आदरातिथ्य आणि रिअल इस्टेटमध्ये त्यांचे मजबूत स्थान आहे.

समाजाच्या आणि भागधारकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने महिंद्रा समूहाने जागतिक स्तरावर ESG नेतृत्त्व करण्यावर, ग्रामीण समृद्धी सक्षम करण्यावर आणि शहरी जीवनमान उंचावण्यावर स्पष्ट लक्ष केंद्रित केले आहे.

www.mahindra.com/Twitter आणि Facebook: @MahindraRise वर महिंद्राबद्दल अधिक जाणून घ्या: अधिक माहितीसाठी https://www.mahindra.com/news-room वर सबस्क्राईब करा.

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा:

श्रीमती जसविंदर मनचंदा कोचर

कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स,

महिंद्रा लाईफस्पेसेस डेव्हलपर्स लिमिटेड

ईमेल: kochar.jaswinder@mahindra.com

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe
Avadhut sathe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *