निरोगी आयुष्य देणारे आयुर्वेद – डॉ सुरभी वैद्य I Charak Health Solutions Mulund & Thane I Dr Surabhi Vaidhya 9867510223 I

निरोगी आयुष्य देणारे आयुर्वेद – डॉ सुरभी वैद्य I Charak Health Solutions Mulund & Thane I 9867510223 I http://wellness24by7.co.in/

डॉ. सुरभी वैद्य या आयुर्वेदिक क्षेत्रात काम करीत असून २५ हजार हुन अधिक पेशंटना त्यांनी सेवा दिली आहे. प्रामुख्याने गुडघेदुघी, मूळव्याध यासारख्या आजारांवर मात करण्यासाठी त्या रुग्णांना मदत करतात.

तुमच्या व्यवसायाचे स्वरूप काय आहे? व्यवसायाची प्रेरणा कशी मिळाली?

  • मी जेव्हा टीसीएस मध्ये फार्माकोव्हिजिलन्स मध्ये काम करीत होते. त्यावेळी तेथे कर्क रोगावरील औषधांचा शोध लावण्याचे काम करीत होते.परंतु त्या औषंधाचे साईड इफेक्ट बरेच होते. त्यावेळी असे वाटले कि आपण जे ज्ञान घेतले आहे त्याचा फायदा इतरांना करून द्यावा. हे आजार होऊच नये म्हणून आयुर्वेदात ची चिकीत्सा पद्धती वापरली जावी या उद्धेशाने स्वतःचे सेन्टर सुरु करण्याचे ठरवले. त्याआधी भिवंडी ला केरला आयुर्वेदिक स्पेशालिसम मध्ये CMO म्हणून जॉईन झाले. ऍलोपॅथी मध्ये विल्यम ओसलर म्हणतात – प्रत्येक डॉक्टर चे प्रथम मिशन हे लोकांना औषधे घेऊ नका हे शिकविणारे असले पाहिजे. पण ५००० वर्षांपूर्वीचे आयुर्वेद आपण आचरणात आणले पाहिजे. जे हेल्दी आहेत त्यांना हेल्दी ठेवणे व आपल्या चुकीच्या कर्मातून उत्पन्न झालेल्या व्याधींवर औषधी योजना आयुर्वेदात दिली आहे. औषधे विकण्यापेक्षा माणसास त्यांच्या नियमित दिनचर्येतून निरोगी ठेवणे महत्वाचे आहे.

आपल्या भारताला आयुर्वेदाची परंपरा आहे. पण मॉडर्न सायन्स ने औषधे आणली. आपली लाइफस्टाइल अशी झाली आहे कि, शुल्लक आजारांसाठी आपण औषधे घेतो. हि औषधे काही काळानंतर शरीरावर विपरीत परिणाम करतात. पण आयुर्वेद हा तुमचे शरीर स्वतःच हिल करण्यास मदत करतो.चरक हेल्थ सोल्युशन व मॉडर्न सायन्स यांचा मेळ कसा घालता?

  • आमचा हाच मोटो आहे कि, कमीत कमी औषधे व वर्षभरातून एकदा पंचकर्म करून घेतल्यास बरेच आजार होताच नाहीत. जसे सिंक चे उदाहरण आपण घेऊ. पहिल्यांदा आपण चोक अप झाले तर काही उपाय करून पुन्हा सिंक चालू करू. दुसऱ्यांदा पुन्हा सिंक चोक अप झाल्यास ड्रेनेक्स ची गोळी टाकतो. नंतर त्या पाईप ची क्षमता तिसऱ्यांदा मात्र प्लम्बर ला बोलावून संपूर्ण साफसफाई करावी लागते. कोणतीही व्याधी अचानक होत नाही. डायबेटीस मध्ये देखील त्याच्या सात स्टेजेस आहेत. लाईफ स्टाईल मॅनेजमेंट डिसॉर्डर्स या रिव्हर्स करणे हे आमचे काम आहे. आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा ते भेद या अवस्थेत असतात. शुगर ३०० ते ४५० झालेली असते. औषधे घेऊन पण कंट्रोल मध्ये येत नाही. कुठलाही व्याधी व्हायचा असेल तर चय प्रकोप प्रसर स्थानःसंशय व्यक्ती आणि भेद या सहा टप्प्यातून तो आजार जातो. यासाठी आयुर्वेदात आधी डिटॉक्सिफिकेशन करण्यास सांगितले जाते. यामुळे शरीरातील घाण आधी बाहेर काढण्यास मदत होते. व नंतर वमन केल्यास बऱ्याच अंशी आजार कंट्रोल होतो. कोलेस्टोरॉल, ट्रायग्लिसरीआड , थायरॉईड,शुगर या अवस्था केवळ पंचकर्माने आपण कमी करू शकतो. आम्ही लोकांमध्ये अवेरनेस आणतो. खाणेपिणे व्यवस्थित करणे, आजाराच्या अवस्थेनुसार औषध घेणे या गोष्टी आम्ही सुचवितो. चूक काय व बरोबर काय हे लोकांना आयुर्वेदाच्या साह्याने सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो. व लोकांनी त्यांचा लाभ घ्यावा.

गुडघेदुखी वर आपण उपचार पद्धती देता. हि एक समस्या अशी आहे जिथे ती व्यक्ती व घरातील इतरांना देखील त्रास होतो. हा आजार होऊ नये व झाल्यास याकरिता काय उपचार पद्धती तुम्ही देता?

-इथे मी सांगू इच्छिते कि जे जिम ला जातात त्यांनी त्रास होईल इथपर्यंत वजने न उचलता यथाशक्ती व्यायाम करावा. यथाशक्ती या शब्दाला आयुर्वेदात खूप महत्व आहे.क्लास जॉईन करून विविध डान्स फॉर्म केल्याने गुडघे खराब झालेले पेशन्ट इथे येतात. अश्यावेळी ३०-४० च्या वयात ऑपरेशन शक्य नसते. इथे मस्क्युलर इंटेलिजन्स वर आम्ही भर देतो. कोणत्याही हाडांना स्वतःचा इंटेलिजन्स नसतो. त्याच्या आजूबाजूचे जे मांडीचे मसल व पोटरी चे मसल व लिगामेंट वर आम्ही काम करतो. कंबरदुखीमुळे हा त्रास मुळापासून सुरु होतो. जे लोक बैठी कामे करतात व अजिबात व्यायाम करीत नाहीत त्यांचा मांडीचा मसल लूस होतो. व गुडघ्यावर त्याचे प्रेशर येते. हि मसल टाईट केल्यास हे प्रेशर कमी होते. बोन अलाइनमेंट, बन्धचिकित्सा, कफिन्ग, निडलिंग, ऍक्युप्रेशर, ऍक्युपंक्चर हे पेन मॅनेजमेंट चे टेक्निक इथे वापरले जातात. सायटिका मध्ये कफिन्ग ची ट्रीटमेंट देतो. पंचकर्म मध्ये आम्ही बस्ती, एनिमा, स्नेहसदन, मालिश, स्टीम हे प्रकार देतो. जळवा यांचा वापर केला जातो. मान, खांदे ,टाचा, कंबर यांचे देखील पेशन्ट इथे येतात.

पाईल या आजारावर आपली उपचार पद्धती काय आहे ?
पाईलला संस्कृत मध्ये अर्ष असे म्हणतात. एखादा शत्रू जसा आपल्याला सतत त्रास देत राहतो तसा हा आजार त्रास देतो. तरुण वयात आज हा आजार होताना दिसतो. बैठे व्यवसाय ,कमी पाणी पिणे, खानपान चुकीच्या पद्धती, कोरडे अन्न खाणे यामुळे हा आजार बळावतो. ऑपरेशन झालेले पेशंट देखील आमच्याकडे येतात. पाईल, फिशर ,फिशतुला हे एनस मसल मध्ये झालेले आजार आहेत. या आजाराची सुरवात पचनसंस्थेपासून सुरु होते.याकरिता मलबद्धता होऊ ने देणे आवश्यक आहे. मलाचे खडे तयार झाले कि चुकीचे प्रेशर ने एनस मसल ला दुखापत होते. बॉडीची कॅपेसिटी असते बरेच अत्याचार ती सहन करीत असते. परंतु हि क्षमता संपली कि त्रास सुरु होतो. यामध्ये पहिली लेयर एनस मसल बाहेर येते. दुसऱ्या व तिसऱ्या स्टेज ला पेशंट ला बसताना , उठताना त्रास होतो. हा आजार झाला आहे हे सांगण्यास देखील लोक कचरतात. याकरिता आम्ही प्रकृती परीक्षा, नाडी परीक्षा, तेल,पिचू,कॅप्सूल,ओइन्टमेन्ट, सीट बाथ ट्रीटमेंट मध्ये आपण पहिल्या स्टेज ची ट्रीटमेंट दिल्यानंतर अगदी हसत हसत ऑफिस ला जाऊ शकतात.ट्रीटमेंट व मेडिसिनल किट्स पण दिले जाते.

कॉसमॅटॉलॉजी हि देखील आज गरज झालेली आहे .यामध्ये आयुर्वेद कसा उपचार करते ?

-आज प्रत्येक व्यवसायाची देखील गरज झालेली आहे. आपले वजन, उंची, केस यांना मेंटेन ठेवण्यास आम्ही येथे मदत करतो. इथे नॅचरल उपचार पद्धती दिली जाते. दिनचर्येवर आपण भर देतो. केस, स्किन, फिगर . यात पोट सुटणे, दंड मोठे असणे. यात उद्वर्तनाच्या ट्रीटमेंट आपण देतो. कोणतेही यंत्र वापरत नाही. केस गळती, डॅन्डरफ यांची कारणे मुळापासून शोधतो. ताणतणाव, रात्रीचे जागरण होते का हे पाहिले जाते. स्किन साठी सात्विक आहार ,उत्तम जीवनशैली अवलंबणे आवश्यक आहे. अनहेल्थी अन्न न खाणे याचे आम्ही अवेअरनेस करतो.

डॉ. सुरभी वैद्य संपर्क 9867510223

Dr Surabhi Vaidya
Dr Surabhi Vaidya

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *