FPO मधून रुची सोया कंपनी करणार कर्जाची परतफेड I Ruchi Soya to pay off debts from FPO I
FPO मधून रुची सोया कंपनी करणार कर्जाची परतफेड
रुची सोया इंडस्ट्रीज चे कार्यकारी अधिकारी संजीव कुमार अस्थाना यांनी सांगितले कि, एडिबल ऑइल च्या किमतीत दुसऱ्यांदा कपात करण्यात आली असून पाम ऑइल सारखे मोठी मागणी असलेले प्रॉडक्ट व सोया ऑइल यांच्या किमती रास्त ठेवल्या जातील . कंपनीने FPO वितरणातून रु.३३००/- करोड चे कर्ज फेडण्याचा मानस असून हि रक्कम एकूण कर्जाच्या ८० ते ८५% आहे. या फंडातील काही भाग वर्किंग कॅपिटल करिता वापरला जाईल. असे ते पुढे म्हणाले. कंपनी न्यूट्रासिटीकल बिझनेस मध्ये व्यवसायास सुरवात करणार असून या क्षेत्रात संधीचा फायदा घेणार आहे. डिस्ट्रिब्युशन करिता पतंजली च्या मेगा स्टोअर्स,आरोग्य केंद्र, चिकित्सा केंद्र यांचा वापर केला जाणार असून ग्रामीण भागात डिस्ट्रिब्युशन नेटवर्क मध्ये वाढ करण्याचा कंपनीचा मानस आहे. कच्या मालाच्या किमतीत वाढ झाली असूनही कंपनीने ग्राहकांना दिलासा देत दर वाढ केली नसल्याचे ते पुढे म्हणाले.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo