देवेंद्र भुजबळ यांना ”एकता” पुरस्कार प्रदान I

देवेंद्र भुजबळ यांना ”एकता” पुरस्कार प्रदान

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात गेली ३५ वर्षे कार्यरत असलेल्या मुंबई येथील प्रख्यात एकता कल्चरल अकादमी तर्फे प्रसार माध्यमातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल निवृत्त माहिती संचालक तथा न्यूज स्टोरी टुडे पोर्टल चे संपादक देवेंद्र भुजबळ यांना जेष्ठ अभिनेते श्री प्रमोद पवार यांच्या हस्ते “नारायण पेडणेकर स्मृती पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. गिरगांव येथील साहित्य संघ नाट्यगृहात हा व अन्य विविध पुरस्कार मान्यवर आणि शेकडो रसिकांच्या उपस्थितीत नुकतेच प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक –
अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन लोक कलेचे अभ्यासक प्रा अवधूत भिसे यांनी केले.या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. त्यापैकी कलाकार नागेश मोर्वेकर व बाल कलाकार ऋतिका वाघ यांनी उस्फूर्तपणे सादर केलेले मराठमोळे गीत व नृत्य दिलखेचक ठरले. त्यांच्या अदाकारीने सर्व रसिकांची दाद मिळवली.

अल्प परिचय- देवेंद्र भुजबळ गेली ४० वर्षे प्रसार माध्यमांमध्ये सक्रिय आहेत. नगर च्या दैनिक समाचार मधून त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली.त्यानंतर पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचा रितसर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर दै.केसरी,सा सह्याद्री या वृत्तपत्रांत काम केले.

पुढे भारत सरकारच्या मुंबई दूरदर्शन केंद्रात आणि नंतर महाराष्ट्र शासनाच्या माहिती खात्यात जिल्हा माहिती अधिकारी ते माहिती संचालक या सर्व पदांवर उल्लेखनीय कार्य केले आहे.त्यांची ७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते विविध विषयांवर व्याख्याने देत असतात. तसेच लेखनही करीत असतात.

श्री भुजबळ सध्या न्यूज स्टोरी टुडे पोर्टल चे संपादक आहेत. हे पोर्टल ८६ देशात पोहोचले असून त्याला आतापर्यंत ४ लाख ७६ हजार व्ह्यूज मिळाले आहेत.या बद्दल त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते विकास पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना अप्रतिम मीडिया संस्थेतर्फे देण्यात येणारा चौथा स्तंभ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

Devendra Bhujbal
Devendra Bhujbal

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *