फेडेक्स ‘एस एम ई कनेक्‍ट’ सिरीजने फार्मा व हेल्‍थकेअर लघु व्‍यवसायांना जागतिक संधींचा लाभ घेण्‍यासाठी केले सक्षम I

भारतनोव्‍हेंबर २२०२२ – फेडेक्स एक्सप्रेस या फेडेक्स कॉर्प. (NYSE: FDX)ची उपकंनी आणि जगातील सर्वात मोठ्या एक्‍स्‍प्रेस परिवहन कंपनीने ‘इमर्जिंग पॉसिबिलिटीज फॉर एसएमई इन फार्मा, हेल्‍थकेअर अॅण्‍ड लाइफ सायन्‍स’वरील ‘एसएमई कनेक्‍ट’च्‍या सातव्‍या पर्वाची घोषणा केली. व्‍हर्च्‍युअल ‘एसएमई कनेक्‍ट’ सिरीज विचारशील नेतृत्‍व व माहितीची देवाणघेवाण करणारे व्‍यासपीठ आहे. लघु व मध्‍यम उद्योग (एसएमई) उद्योगातील विचारवंत प्रमुख आणि विषय तज्ञांशी परस्‍पदसंवाद साधून त्यांच्या व्यवसायाला लाभदायक ठरणाऱ्या समाधानाभिमुख चर्चेसाठी अधिक संधी मिळवू शकतात. 

एसएमई कनेक्‍ट सिरीजचे हे पर्व फार्मा व हेल्थकेअर ट्रेंडसंधी व आव्हाने यावर व्यवसायसंबंधित माहिती देणार्‍या उद्योग प्रमुखांवर लक्ष केंद्रित करते. हे सत्र हेल्थकेअर क्षेत्रातील एसएमईंवरील वैविध्‍यपूर्ण तंत्रज्ञान व ऑटोमेशनचा प्रभावउद्योगाच्या वाढीला चालना देणारी प्रमुख सरकारी धोरणे आणि एसएमई जागतिक मागणी व संधींचा कशाप्रकारे लाभ घेऊ शकतात यावर प्रकाश टाकतोजेथे जागतिक व्यापार व्यत्यय असूनही निर्यातीत सकारात्मक वाढीचा वेग कायम आहे.[1]

जागतिक औषध व लस उद्योगात भारताची महत्त्वाची भूमिका आहेजेथे भारताचा जागतिक पुरवठा आकारमानात २० टक्‍के हिस्‍सा आहे आणि जागतिक लसींमध्ये जवळपास ६० टक्‍के हिस्‍सा आहे[2]. एसएमई हे पुरवठा साखळीचा महत्त्वपूर्ण भाग आहेत. एसएमई जवळपास ७० टक्‍के भारताच्या गरजांची पूर्तता करतात[3] आणि फार्मा निर्यातीत ४८ टक्‍के योगदान देतात[4]. आज हेल्थकेअर शिपमेंट सोल्यूशन्समध्ये अधिक दृश्यमानतानियंत्रण आणि स्थिरतेची गरज पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण बनली आहे.

कोविड-१९ महामारीने फार्मा पुरवठा साखळीमध्‍ये परिपूर्ण क्रांती घडवून आणलीफार्मास्‍युटिकल मागणीमध्‍ये अधिकाधिक वाढ होत असताना विश्‍वसनीय व अधिक कार्यक्षम पुरवठा साखळी भारतातील एसएमईंसाठी मोठी भूमिका बजावेल. FedEx एसएमई कनेक्‍ट सिरीज भारतीय एसएमईंना सर्वसमावेशक माहिती व उपाययोजनांच्‍या माध्‍यमातून जागतिक स्‍तरावर नवीन व उद्योन्‍मुख बाजारपेठांमध्‍ये व भारतात विस्‍तारित होण्‍यास सक्षम करते आणि भावी वाटचालीसाठी सुसज्‍ज करते,’’ असे एएमईएच्‍या मार्केटिंग अॅण्‍ड कस्‍टमर एकस्‍पेरिअन्‍सचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष सलिल चारी म्‍हणाले.

FedEx चा सानुकूल उपाययोजनांसह एसएमईंना हेल्‍थकेअर आणि फार्मामध्ये पाठिंबा देण्याचा मोठा इतिहास आहेया उपायोजनांमध्‍ये प्राधान्य बोर्डिंग व मॉनिटरिंगसह सक्रिय पॅकेजिंग सोल्यूशन्ससाठी FedEx Customized Freightशिपमेंट क्रियाकलाप व्यवस्थापित करण्यासाठी समर्पित तज्ञांची सुविधा देणारे FedEx Priority Alert®तापमान-नियंत्रित शिपमेंट व इतर तापमान-नियंत्रित कंटेनरश्रेणी व उपाययोजनांसाठी FedEx Thermal Blanket Solution यांचा समावेश आहे.

FedEx Express बाबत

FedEx Express ही जगातील सर्वात मोठी एक्‍स्‍प्रेस परिवहन कंपनी आहे. कंपनी २२० हून अधिक देश व प्रदेशांना जलद व विश्‍वसनीय डिलिव्‍हरी सेवा देते. FedEx Express जागतिक एअर-अॅण्‍ड-ग्राऊंड नेटवर्कचा वापर करत निश्चित वेळ व तारखेनुसार वेळेमध्‍ये शिपमेंट्सच्‍या डिलिव्‍हरीला गती देते.    

###

FedEx Express प्रसिद्धी पत्रक https://newsroom.fedex.com/newsroom/middle-east-indian-subcontinent-and-africa येथे उपलब्‍ध आहेत.

लॉजिस्टिक्‍स उद्योगातील नवीन माहितीबाबत अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या:

FedEx Business Insights Hub

LinkedIn FedEx Go Global

Fedex sme connect Nov 2022
Fedex sme connect Nov 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *