सणासुदीच्या योजनांसह FedEx Express करत आहे आनंदाचे वाटप I

सणासुदीच्या योजनांसह FedEx Express करत आहे आनंदाचे वाटप

दिवाळी पासून मकर संक्रांती पर्यंतच्या सणासुदीच्या हंगामासाठी FedEx तर्फे खास सवलत योजना

भारत,१२ ऑक्टोबर २०२२: FedEx Corp. (NYSE: FDX) ची उपकंपनी आणि जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस वाहतूक कंपन्यांपैकी एक असलेल्या FedEx Express ने सणासुदीच्या हंगामासाठी खास योजनांची घोषणा केली. या वैशिष्ट्यपूर्ण योजनेद्वारे ग्राहकांना १ किलो ते ५ किलो वजनाच्या भेटवस्तू मालवाहतुकीवर ४०% सवलत देऊन सणाच्या आनंदात भर घातली जात आहे. ही योजना १० ऑक्टोबर २०२२ पासून १५ जानेवारी २०२३ पर्यंत वैध आहे.

नुकत्याच FedEx-ने केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की भारतामध्ये शॉपिंग फेस्टिव्हल मध्ये ९०% पेक्षा जास्त ग्राहक भाग घेत असल्यामुळे असे फेस्टिव्हल ई-कॉमर्स क्षेत्राचा एक महत्त्वाचा भाग राहतील. बहुसंख्य एसएमईज पुढील १२ महिन्यांत ई-कॉमर्स कार्यक्रम आयोजित करतील आणि त्यामध्ये हंगामी सवलती या गोष्टी सर्वसाधारण[1] असतील. या सणासुदीच्या हंगामात ग्राहकांना त्यांच्या भेटवस्तू वेळेत पोहोचतील याची खात्री करण्यासाठी त्यांना विश्वसनीय लॉजिस्टिक सेवा मिळणे आवश्यक आहे. FedEx International Priority® Express या काळविशिष्ट, आंतरराष्ट्रीय प्राधान्य शिपिंग पर्यायासह भारतासह AMEA मधील ग्राहकांना आशियातील निवडक बाजार* (हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया) तसेच युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि युरोप सकाळी १०:३० किंवा दुपारपर्यंत डिलिव्हरी शेड्यूल करण्याची लवचिकता आहे.

“भारतात ई-कॉमर्स अभूतपूर्व पद्धतीने वाढत आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात अधिकाधिक  ग्राहक खरेदी आणि शिपिंग करत आहेत. FedEx भारतीय ग्राहकांना आपल्या जागतिक नेटवर्कच्या सामर्थ्याने जगभरातील लोकांशी आणि शक्यतांशी, उपाय सेवा सुविधा आणि मूल्यवर्धित सेवा यांच्याशी जोडणे सोपे करते. खास FedEx ऑफरसह आपल्या भारतीय ग्राहकांना ते जगात कुठेही असले तरीही परवडणाऱ्या वाजवी किमतीत त्यांच्या प्रियजनांच्या जवळ आणण्याचे आमचे ध्येय आहे,” असे FedEx Express चे इंटरनॅशनल ऑपरेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक सुवेन्दू चौधरी म्हणाले.

संपूर्ण भारतातील कोणत्याही FedEx रिटेल आउटलेटला भेट देऊन सणाच्या योजनांचा लाभ घेता येईल. ग्राहक पर्याय म्हणून ग्राहक सेवेद्वारे पिकअप शेड्यूल देखील करू शकतात.

Festive Image
Festive Image

About FedEx Express 

FedEx Express is the world’s largest express transportation company, providing fast and reliable delivery to more than 220 countries and territories. FedEx Express uses a global air and ground network to speed delivery of time-sensitive shipments, by a definite time and date.

*Service availability in 1 to 3 business days and exact delivery time depends on origin and destination postal codes. Terms and conditions apply. For detailed information, please log in to fedex.com to obtain a quotation, or refer to Rate & Transit Times.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *