अर्थसंकेत प्रस्तुत अर्थ साक्षर पुरस्कार २०२० सोहळा संपन्न !

अर्थसंकेत प्रस्तुत अर्थ साक्षर पुरस्कार २०२० सोहळा संपन्न !

मराठी उद्योजकांनी खुप मोठे व्हावे – बी एस ई चे स्ट्रेटजी हेड श्री शंकर जाधव

अर्थसंकेत प्रस्तुत अर्थ साक्षर पुरस्कार २०२० सोहळा बुधवार २३ डिसेंबर २०२० रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे संपन्न झाला. बी एस ई चे स्ट्रेटजी हेड श्री शंकर जाधव श्री शंकर जाधव, अर्थसंकेतचे डॉ अमित बागवे व सौ रचना बागवे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे हे आठवे वर्ष होते.
अर्थ साक्षर पुरस्कार हा एकमेव पुरस्कार आहे ज्या अंतर्गत गुंतवणूकदारांचा सन्मान केला जातो. तसेच आर्थिक साक्षरता प्रचारकांचा, गुंतणवूक तसेच उद्योजकता क्षेत्रातील तज्ञांचा, व्यवसाय प्रशिक्षकांचा व युवा उद्योजकांचा सन्मान केला जातो.

ज्या संस्था मराठी समाजात उद्योजकता पसरविण्यासाठी व वाढविण्यासाठी कार्यरत आहेत त्यांचा प्रचार व प्रसार जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत व्हावा असा यामागे उद्देश असतो.

श्री निखिल बल्लाळ यांचे ‘Know Your Town’ ला ‘बिझनेस मॅगझीन ऑफ द ईअर’, श्री दिपक वालझडे यांना ‘बेस्ट शेअर मार्केट ट्रेनर’, डॉ संदिप माळी यांना ‘बेस्ट इन्शुरन्स ऍडव्हायझर’, श्री आशिष संकपाळ यां ‘युवा उद्योजक’, श्री सौरभ म्हात्रे यांना ‘बेस्ट पोर्टफोलिओ मॅनेजर’, जनसेवा पतसंस्थेला ‘सर्वोत्कृष्ट पतसंस्था’, डॉ चेतन कुलकर्णी यांना ‘बेस्ट बिझनेस अँड मोटिव्हेशन कोच’, श्री संतोष सावंत व श्री मनोज सावंत यांच्या रक्षक सेक्युरिटी सिस्टमला ‘बेस्ट फायर प्रोटेक्शन कंपनी’, डॉ दिनेश गुप्ता यांच्या OMG बुक ऑफ रेकॉर्डला ‘बेस्ट एम एस एम ई’, GBS बिझनेस क्लबला ‘बेस्ट बिझनेस ऑर्गनायझेशन ऑफ द ईअर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अर्थसंकेतचे संस्थापक डॉ अमित बागवे यांनी उपस्थितांचे स्वागत केले व बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज हे उद्योजकांसाठी भांडवल उभारणीसाठी महत्वाचे असल्याचे सांगितले. उद्योजक हे देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावत असतात व त्यांचा सन्मान होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

बी एस ई चे स्ट्रेटजी हेड तसेच बी एस ई इन्व्हेस्टमेंटचे व्यवस्थापकीय संचालक श्री शंकर जाधव यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांना शाबासकीची थाप दिली परंतु नियम आणि अटी पाळून व्यवसाय करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले. मराठी उद्योजकांनी खुप मोठे व्हावे, वेळेवर टॅक्स भरावा. कायद्याच्या बंधनात राहून व्यवसाय केल्यास कोणत्याही अडचणी येत नाहीत व उद्योग व्यवसाय मोठा होण्यास मदत होते असेही त्यांनी सांगितले.

अर्थसंकेतच्या सौ रचना बागवे यांनी आभार प्रदर्शन केले.

Arth sakshar purskar 2020
Arth sakshar purskar 2020

अर्थसंकेत मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र आहे. अर्थसंकेत मराठी माणसांमध्ये आर्थिक व उद्योजकीय साक्षरता पसरविण्याचे कार्य गेली ७ वर्षे करीत आहे. यात महाराष्ट्र पोलिस आर्थिक गुन्हे विभाग तसेच NSDL सहभागी होत असतात.

पैसे कमविणे व ते योग्यरीत्या गुंतविणे व त्या गुंतवणुकीतून संपत्ती निर्माण करणे हे सर्व सामान्य मध्यम वर्गीयांना सुद्धा शक्य आहे. आर्थिक साक्षरता पसरविणे ही काळाची गरज आहे.

गुंतवणूक करताना ती कशी करावी व कशी करू नये, गुंतवणुकीचे उद्दिष्ट काय, किती काळासाठी करावी हे असे प्रश्न सहज समजावून सांगणे आवश्यक आहे. यासाठीच आर्थिक साक्षरता प्रचारकांचाही सन्मान करणे आवश्यक आहे. यामुळे अशा प्रकारे मार्गदर्शन उपलब्ध असते हे सर्व सामान्यांना कळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *