डॉ. सुषमा कुलकर्णी यांची (GEDC).च्या ‘चेअरमन पदी निवड – आर.आय.टी. अकॅडेमिक सेक्शनच्या वतीने गौरव I
डॉ. सुषमा कुलकर्णी यांची (GEDC).च्या ‘चेअरमन पदी निवड – आर.आय.टी. अकॅडेमिक सेक्शनच्या वतीने गौरव
राजारामबापू इस्न्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि राजारामनगर या महाविद्यालयाच्या डायरेक्टर डॉ.सौ.सुषमा कुलकर्णी या नुकत्याच अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘GEDC’ (Global Engineering Deans Council ) च्या चेअरमनपदी निवडून आल्या बद्दल महाविद्यालयाच्या अकॅडेमिक्स सेक्शनच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राजारामबापू सहकारी बॅंकचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील (आण्णा ) यांचे शुभ हस्ते , कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. आर.डी.सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व कार्यक्रमाचे मुख्य संयोजक , डीन अकॅडेमिक्स , डॉ. एस. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. सौ. कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.
GEDC ही इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंजिनीअरिंगची (IFEES) ची संलग्न संस्था असून संस्थेचे ध्येय म्हणजे ही संस्था अभियांत्रिकी मधील शिखर नेतृत्वगट, प्राचार्य, कुलगुरू यांचे जागतिक दर्जाचे नेटवर्क म्हणून कार्यरत आहे. अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात काम करत असणाऱ्या नेतृत्वगटाच्या सामूहिक अनुभव व सामर्थ्याचा फायदा सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी शिक्षण, संशोधन आणि जागतिक समुदायासाठी सेवा सुविधा यांचा लाभ घेण्यासाठी होत असतो. या क्षेत्रात अत्यंत प्रभावीपणे काम करत असणारी संस्था म्हणून ‘GEDC’ ची ओळख आहे.
GEDC ही संस्था प्रामुख्याने अभियांत्रिकी माहितीची देवाणघेवाण, अनुभवांची चर्चा, नेतृत्व करण्यासाठी आव्हाने आणि सर्वोत्तम पद्धती यांची चर्चा घडविण्यासाठी जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देते . याचबरोबर अभियांत्रिकी डीनना इंजिनीरिंगचे अभ्यासक्रमात भागीदारी , विकास आणि नाविन्य यासाठी एकमेकांना सहकार्य करते असते.
डॉ. सौ. सुषमा कुलकर्णी या 32 वर्षे आर.आय.टी. मध्ये कार्यरत आहेत . एक उत्कृष्ट विद्यार्थी प्रिय प्राध्यापिका, प्राचार्या आणि संचालिका म्हणुन गेली 33 वर्षे कार्यरत आहेत. त्यांनी महाविद्यालयातील शिक्षण व्यवस्थेमध्ये अनेक नवनवीन प्रयोग यशस्वीरीत्या राबविले आहेत. हे सर्व करत असताना शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध संस्थांवर प्रतिनिधित्व केले आहे. करताना आपल्या . विशेषतः GEDC मध्ये प्रतिनिधित्व करत असताना आपल्या वैशिष्ठ्यपूर्ण कार्याची छाप सोडली आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊनच त्यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची संधी मिळाली व त्या विजयी झाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डीन अकॅडेमिक्स , डॉ. एस. के. पाटील यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून त्यांना डॉ. कुलकर्णी मॅडम ‘GEDC’ च्या चेअरमन म्हणून निवडून आल्याची माहिती दिली . यावेळी बोलताना ते म्हणाले कुलकर्णी मॅडम यांच्या प्रिन्सिपॉल ते डायरेक्टर या प्रवासात त्यांनी कॉलेजच्या विकासात दिलेल्या योगदानातील अनेक क्षणांचे साक्षीदार होता आले. त्यांनी आरआयटीमध्ये केलेल्या महत्त्वपूर्ण बदलांबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहेच. प्रिन्सिपल आणि डायरेक्टरची जबाबदारी 16 वर्षांपासून सांभाळत असताना इंजिनिरिंग शिक्षणातील सर्व आधुनिक प्रयोग यशस्वीरीत्या राबवून आर.आय.टी. ला एका वेगळ्या उंचीवर आणून ठेवले आहे. विशेषतः NBA , स्वायत्तता , NAAC A+ त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय शक्यच झाले नसते असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना प्रा. शामराव पाटील (आण्णा ) यांनी महाविद्यालयाच्या प्रदीर्घ वाटचालीच्या विकासात डॉ. कुलकर्णी मॅडम यांनी खूप मोठे योगदान दिल्याचे सांगितले . महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य कै. मकरंद जोगळेकर यांनी पाया घातला , डॉ. बी.आर. बडवे यांनी इमारत बांधली तर डॉ. सुषमा कुलकर्णी यांनी त्यावर कळस चढविला असे सांगून त्यांनी ऑटोनॉमीचे आव्हान स्विकारुन त्याचा दर्जा राखला असे सांगून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी प्रा. आर.डी.सावंत सर यांनी अत्यंत खुमासदार शैलीत डॉ. सुषमा कुलकर्णी त्यांचे कौतुक केले. ” एक शांत ,मितभाषी प्राध्यापिका ते इंजिनिरिंग शिक्षण क्षेत्रातील एक ‘डायनॅमिक लीडर ‘ असा त्यांचा प्रवास थक्क करणारा असून मला याचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले अशा शब्दांमध्ये त्यांचा गौरव केला . त्यांचा हा ‘ गुड टू ग्रेट लीडर ‘ हा प्रवास अनेक संघर्षमय रस्त्यावरून झाला असल्याचे सांगून यापुढेही त्यांना कॉलेजच्या विकासात अशीच साथ देण्याचे आवाहनही केले.
आपल्या सत्काराला उत्तर देताना डॉ. सुषमा कुलकर्णी यांनी अत्यंत नम्रतापूर्वक या यशामध्ये सर्वांचाच वाटा असल्याचे सांगून यापुढेही महाविद्यालयातील सर्वच घटकांना सोबत घेऊन यापुढीलही प्रवासात अनेक शिखरे गाठायची असल्याचे सांगितले. कोणताच अनुभव नसताना अचानक आलेली ही जबाबदारी केवळ गव्हर्निंग कौन्सिल च्या सर्वच सदस्यांनी दिलेल्या विश्वासामुळेच शक्य झाल्याचे सांगितले. यशाची उत्तुंग शिखरे गाठण्यासाठी कठोर परिश्रमास पर्याय नसल्याचे सांगितले. आपल्या व्यावसायिक जडणघडणीमध्ये कै. जोगळेकर सर व डॉ. बडवे सर यांचे मोठे योगदान आहे असे सांगून आपल्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेऊन मा. भगतसिंह पाटील व मा. जयंत पाटील साहेब यांनी अत्यंत विश्वासाने माझ्यावर ही जबाबदारी सोपविली आणि तेथूनच यशाचे हे सर्व टप्पे पार पाडू शकले आणि आज जागतिक पातळीवर इंजिनिरिंग शिक्षण क्षेत्राचा दर्जा उंचाविण्यासाठी कार्यरत असणाऱ्या ‘GEDC’ (Global Engineering Deans Council ) च्या चेअरमनपदाची धुरा खांद्यावर आली असे अत्यंत नम्रतापूर्वक प्रतिपादन केले. या जबाबदारी बद्दल गवर्निंग बोर्ड चे सदस्य आ. जयंत पाटील आणि अध्यक्ष भगतसिंह पाटील यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. रणधीर पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. थोरात यांनी केले.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi