क्लब महिंद्रातर्फे डिस्कव्हर इंडिया NFTs सादर I

क्लब महिंद्रातर्फे डिस्कव्हर इंडिया NFTs सादर

कृत्रिम बुद्धीमत्ता प्रणीत फ्यूजन आर्टची लिमिटेड एडिशन मालिका

महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेडचा अग्रगण्य ब्रँड क्लब महिंद्रा तर्फे डिजिटल आर्टद्वारे भारत शोधण्याची अनोखी संधी देणारी NFTs ची पहिली लिमिटेड एडिशन मालिका सादर करण्यात येत आहे. जागतिक पातळीवरील दिग्गजांच्या वैशिष्ट्यपूर्ण पेंटिंग्जपासून प्रेरित २५ AI प्रणीत डिजिटल कलाकृतींचा या संग्रहात समावेश आहे. ही मालिका एक फ्यूजन आर्ट असून भारतातील काही अतुलनीय स्थळांचे सौंदर्य आणि महान कलाकारांच्या नेत्रदीपक कलाकृतींचा उत्सव साजरा करते.

क्लब महिंद्राच्या NFT योजनेने कलाप्रेमी, हॉलिडे प्रेमी आणि कला संग्राहकांना क्लब महिंद्रा रिसॉर्ट्सच्या विस्मयकारक प्रतिमांचे प्रदर्शन करून वैशिष्ट्यपूर्ण व्हर्च्युअल आर्टची मालकी मिळवण्याची अप्रतिम संधी उपलब्ध करून दिली आहे. क्लब महिंद्राने ट्रेजरपॅक सोबत भागीदारी करून MP4 आणि GIF फाईल्समध्ये विविध प्रकारच्या रिसॉर्ट प्रतिमा सादर करत पोलीगॉन POS वर तयार केलेल्या या युटीलिटी प्रणीत NFTs चे आयोजन केले आहे.

या फ्यूजन आर्टवर्क्सद्वारे, क्लब महिंद्रा तुम्हाला जिथे कलात्मकता रिसॉर्ट्सच्या रमणीय परीक्षेत्रात गुंफलेली आहे अशा क्षेत्रातून फिरवून आणते. सर्जनशीलतेची परिसीमा गाठत पाब्लो पिकासो, व्हिन्सेंट व्हॅन गॉग, लिओनार्डो दा विंची, एडवर्ड मंच, कात्सुशिका होकुसाई आणि रविंद्रनाथ टागोर यांसारख्या दिग्गजांच्या कलाकृतींसह अखंडपणे एकरूप होऊन, निवडक रिसॉर्ट्सच्या चित्रांमध्ये एक विलक्षण परिवर्तन घडून आले आहे. या बारकाईने काळजीपूर्वक निवडलेल्या प्रतिमा रिसॉर्ट्सच्या नैसर्गिक सौंदर्याचे सार एकत्र करून आणि या दिग्गज कलाकारांच्या विशिष्ट शैलींसह एक सुसंगत बंध तयार करतात.

प्रत्येक चित्र स्वतःची एक कथा सांगते. त्यात कालातीत मोहिनी आहे आणि ही मोहकता ती चित्रे ज्यावरून प्रेरित आहेत त्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रांची आठवण करून देते. या उत्कृष्ट कलाकृतींचे सादरीकरण जसे अनन्यसाधारण आहे, त्याचप्रमाणे क्लब महिंद्रा रिसॉर्ट्स देखील आहेत. प्रत्येकामध्ये एक अतुलनीय आकर्षण आणि वैशिष्ट्य आहे. कला आणि निसर्गाच्या या मनमोहक मिलाफातून, क्लब महिंद्रा एक वैशिष्ट्यपूर्ण पोर्ट्रेट रंगवते. अनन्यसाधारणपणाची भावना जागृत करते आणि या विलक्षण चित्रांप्रमाणेच ही रिसॉर्ट्स म्हणजे खरोखरच एक प्रकारचा खजिना असल्याची आपल्याला आठवण करून देते.

महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेडचे ​​मुख्य विपणन अधिकारी श्री. प्रतीक मुझुमदार म्हणाले, “भारतात डिजिटल कलेक्टीबल्स आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञान विकसित होत असताना, NFTs आमच्या ग्राहकांना एक गुंगवून ठेवणारा अनुभव देण्यासाठी सक्षम आहे. कला आणि कौटुंबिक प्रवासाच्या जगाची एकमेकांमध्ये गुंफण करत आमच्या रिसॉर्ट प्रतिमांचा हा कलात्मक ठसा सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. या आश्चर्यकारक दृश्यांद्वारे, आमच्‍या पाहुण्यांना प्रेरणा देण्‍याचे आणि सर्वसाधारणतेच्या पलीकडे जाणारा सखोल अनुभव निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आम्हाला विश्वास आहे की या प्रतिमा कल्पनाशक्तीला आकर्षित करतील, आमच्या पाहुण्यांची अपेक्षा वाढवतील आणि त्यांना खरोखरच अविस्मरणीय सुट्टी व्यतीत करण्यासाठी प्रोत्साहित करतील.”

बोनस म्हणून, NFTS च्या खरेदीदारांना २-रात्र/३-दिवसांचे सुट्टीचे व्हाउचर मिळेल आणि  त्यांना सुंदर क्लब महिंद्रा रिसॉर्ट्स प्रत्यक्ष अनुभवता येईल. ही NFT ऑफर प्रत्येकासाठी खुली आहे. त्यासाठी सदस्य असले किंवा नसले तरी चालू शकेल. या सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे  सर्व क्षेत्रातील कलाप्रेमी आणि सुट्टीप्रेमी या संधीचा लाभ घेऊ शकतात याची खात्री होते.

प्रत्येक NFT ची वाजवी किंमत 10,000 रु. ते 12,000 रु. दरम्यान आहे. त्यामुळे या वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल कलाकृती मोठ्या प्रमाणावर ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. क्लब महिंद्रा द्वारे ऑफर केलेले NFT संपूर्ण भारतामध्ये विस्तारित आहे आणि कोणीही त्यांची खरेदी करू शकतो.

Club Mahindra NFT image
Club Mahindra NFT image

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *