महिला आणि उद्योजकांना सबलीकरण – बिझनेस आयकॉनचा ऐतिहासिक उपक्रम
बिझनेस आयकॉन तर्फे अलीकडेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी एक भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. समाज, उद्योग, शिक्षण आणि व्यवसाय क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा ठसा पुढील पिढीतील नेत्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

या कार्यक्रमातील विशेष आकर्षण होते “असं घडतो ब्रँड” या विषयावरील सत्र. बिझनेस आयकॉनचे संपादक श्री. पराग गोरे यांनी चितळे ग्रुपचे श्री. इंद्रनील चितळे आणि ख्यातनाम बिझनेस कोच व मेंटॉर श्री. चकोर गांधी यांच्यासोबत विशेष संवाद साधला. या चर्चेत यशस्वी ब्रँड घडवण्यासाठी आवश्यक असलेल्या आव्हानांचा सामना, चिकाटी आणि दूरदृष्टी या बाबींचा सखोल आढावा घेण्यात आला. उपस्थित उद्योजकांसाठी ही चर्चा अमूल्य मार्गदर्शक ठरली.

कार्यक्रमादरम्यान “बिझनेस इन फोकस २०२५” या विशेषांकाचे प्रकाशन श्री. इंद्रनील चितळे यांच्या हस्ते झाले, तर “एक्स्पर्ट व्ह्यूज २०२५” या विशेषांकाचे प्रकाशन श्री. चकोर गांधी यांच्या हस्ते झाले. “बिझनेस इन फोकस २०२५” मध्ये झळकलेल्या उद्योजकांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान करण्यात आला, ज्यामुळे या सोहळ्याला आणखी प्रेरणादायी आयाम मिळाला.
महिला सन्मान आणि उद्योजकीय अनुभवांचा संगम झाल्याने हा कार्यक्रम केवळ यशस्वीच नव्हे तर सर्व उपस्थितांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला.

- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता
