अरविंद लिमिटेडला निव्वळ नफ्यात ६४% ची वाढ I Arvind Ltd profit increased by 64% I
अरविंद लिमिटेडला निव्वळ नफ्यात ६४% ची वाढ
कापड निर्माण करणारी कंपनी अरविंद लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात ६४.२२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ८७.६०/- कोटी आहे. किमतीत वाढ व विक्रीत वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले. या तिमाहीत ऑपरेटिंग महसूल रु. २२०३.५०/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १६५४.८७/- कोटी होती. इनपुट कॉस्ट वाढल्याने मार्जिन स्थिर असल्याचे कंपनीने सांगितले. एकूण खर्च रु. २०८१.२२/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १५६६.३६/- कोटी होती.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo