बुलेटच्या वेडाचं व्यवसायात रुपांतर – श्री ओंकार भोवर

बुलेटच्या वेडाचं व्यवसायात रुपांतर – श्री ओंकार भोवर

बुलेट वर्ल्ड संपर्क – श्री ओंकार भोवर – 9819410930

आपल्या छंदाचे व्यवसायात रुपांतर करुनही व्यवसायात मोठ्ठे यश मिळवतां येते हे बुलेट वर्ल्ड चे संस्थापक श्री. ओंकार मधुकर भोवर यांनी दाखवुन दिले. परळ येथे त्यांचे बुलेटची सर्विस सेंटर आहे. त्यांच्या उत्तेजनीय कामगिरीबद्दल मुंबईच्या महापौर व प्रथम नागरीक माननीय सौ. किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते अर्थसंकेत महाराष्ट्र उन्नतिकड़े प्रस्तुत BEST START-UP OF THE YEAR-2020 (MALE) हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

मराठी माणुस व्यवसायात कात टाकतोय. सध्या तरुण आणि युवा उद्योजक आपला नवनविन संकल्पना घेवुन बाजारात उतरुन व यसस्वी होताना दिसतांयतं. ओंकार यांनाही सुरुवाती पासुनचं व्यवसायांची प्रचंड आवड. पदवीपर्यंतच शिक्षण झाल्यानंतरच सुरुवातीला नोकरीला सुरुवात केली. पण नोकरीत काही मन रमेना. व्यवसायाची आवड असल्याने एका व्यवसायाला सुरुवात केली परंतु कोणताही अनुभव न घेतां मोठी उडी मारल्यानं व्यवसाय बंद करायची वेळ आली.

एकतर घरच्यांच्या मनाविरुद्घ व्यवसाय व पहिल्याच व्यवसायात मोठ्ठं नुकसान झालेल्या ओंकार यांनी खचुन न जाता पुन्हा नव्याने सुरुवात करायचं ठरवले. परंतु मराठी माणुस व्यवसाय करु शकतं नाही, वो अपने बस कि बात नही, आपली नोकरीचं बरी, तुला मुलगी कोण देणारं वगैरे वगैरे वाक्यांना छेद देऊन त्यानी पुन्हा भरारी घ्यायचं ठरवलं. परंतु नव्याने सुरुवात कशी करायची घेच कळत नव्हतं.

मराठी तरुणांना व्यवसाय तर करायचा आहे, पण कोणता व्यवसाय करु ? हाचं मोठ्ठा प्रश्न असतो. त्यांना बुलेटची आवडं असल्याने त्यांनी आपल्या छंदालाचं व्यवसायात परावर्तित करायचं ठरवलं.

सुरुवातीची काळ हा प्रत्येक उद्योजकाच्या आयुष्यातल्या खडतर काळ असतो व सुरुवातीचे ९९९ दिवस जो व्यवसायात पुर्ण करतो, तो पुढे निघुन जातो, असं म्हणतातं.

बुलेट हे त्यांच पॅशनच असल्याने त्यांनी दर्जेदार सेवा, व्यवसायीक प्रामाणिकपणा, मार्केटींग, नेटवर्किंग व नवनवीन संकल्पना राबवत अल्पावधीतचं बुलेट वर्ल्ड चे सर्वत्र पोहचवलं. गुगल व जस्ट-डायल चे २०१८-१९-२० वर्षाचे बेस्ट बुलेट सर्विस सेंटर हे बुलेट वर्ल्ड ला मिळालेले आहे. त्याच्या “मतदान करा व बुलेटची सर्विस मोफतं मिळवा” या संकल्पनेला संपुर्ण महाराष्ट्रातून उत्कृष्ट प्रतिसाद लाभला.

महाराष्ट्रातल्या संपुर्ण पिॅन्ट व इलेक्ट्रॉनिक्स माध्यमानीही त्याच्या या कॅम्पियनची दखल घेतली होती. त्यांनी लडाख मध्ये केलेल्या स्वच्छ भारत अभियानाची दखल लेह-लडाख मध्येही घेतली गेली होती. तसेच संपुर्ण देशांतील Best 500 Brand In India -2020 मध्ये त्यांच्या बुलेट वल्ड्चे नोमिनेशन झालेलं आहे.

India Star Passion Award – 2019 व OMG Books Of Record -2020 ने त्यांना सन्मानित केलेलं आहे.

समाजात व्यवसाय करत असताना आपणही समाजाचं देणं लागतो व जिद्द, ध्येयनिश्चिती, चिकाटी, ग्राहकांच्या अपेक्क्षा पुर्ण केल्या तर मराठी माणुसही कोणत्याही व्यवसायात यसस्वी होवु शकतो.

बुलेटच्या वेडाचे व्यवसायात रूपांतर – ओमकार भोवर I Bullet World Omkar Bhowar Start up Awards 2020 I

Bullet world Onkar Bhowar
Bullet world Onkar Bhowar

अर्थसंकेत – मराठी उद्योजकांचे हक्काचे व्यासपीठ ! संपर्क – 8082349822

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *