शनिवार २९ ऑक्टोबर २०२२ रोजी महाराष्ट्रातील सर्वात मोठा बिझनेस नेटवर्किंग कार्यक्रम I

शनिवार २९ ऑक्टोबर २०२२ रोजी महाराष्ट्रातील सर्वात मोठा बिझनेस नेटवर्किंग कार्यक्रम

‘अर्थसंकेत उद्योजकांची दिवाळी पहाट’ ही संकल्पना ८ वर्षापूर्वी सुरू करण्यात आली आहे. विविध उद्योजकीय संस्था यात सहभागी होत असतात. या संस्थांना एका व्यासपीठावर आणण्याचे व त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचे काम अर्थसंकेत करीत आहे. अर्थसंकेतच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो उद्योजक घडले आहेत.

दरवर्षी विविध थीम घेऊन हा कार्यक्रम केला जातो. या वर्षी “प्रारंभ” या संकलपनेवर आधारित थीम असणार आहे. कोणतेही काम सुरु करण्या अगोदर आपण श्री गणेशाची पूजा करतो आणि म्हणूनच यंदा ‘प्रारंभ’ या थीम अंतर्गत आपण विविध गणेश उत्सव मंडळांचे व्यवस्थापन आणि त्यांचे समाजाप्रती केले जाणारे उपक्रम हा विषय घेण्यात आला आहे. ‘लालबागचा राजा’ व ‘मुंबईचा राजा, गणेशगल्ली’ यांच्या विशेष सत्कार करण्यात येणार आहे. अर्थसंकेतच्या सह संस्थापक सौ रचना लचके बागवे यांच्या ‘सप्तरंग उद्योजकतेचे’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात येणार आहे. ‘सप्तरंग उद्योजकतेचे’ पुस्तकात श्री नितीन बोरसे (ठाणे वर्तमान), श्रीमती नीता पवाणी (ग्लोबल कॉम्प्युटर सर्व्हिसेस), श्री सचिन शिगवण (सोलारमॅन) , श्री महेंद्र देवळेकर (आकार क्नॉलेज वर्ल्ड), श्री दीपक हरिया (बिल्डर आणि डेव्हलपर), सौ कविता देशमुख (अर्श इन्फो सर्व्हिसेस) , श्री सुशील अगरवाल (अगरवाल ज्वेलर्स) यांनी परिस्थितीशी झगडून मिळविलेल्या यशाचे शब्दांकन केले आहे. मुंबईतील प्रसिद्ध ज्वेलर श्री प्रीतम वैद्य, हेडहंटर श्री गिरीश टिळक, श्री राजेश विनायक कदम व झोई फिनटेक यांचा महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. जेष्ठ मूर्तिकार श्री मनोहर बागवे यांच्या कार्याचा इंजि. डॉ. माधवराव भिडे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

गणेश मंडळे गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. समाजाला एकत्रित आणणे आणि समाजाच्या प्रती सामाजिक काम करणे हे कार्य ते अविरतपणे करत असतात. गणपती मधील १० दिवस उत्सवाचे आणि इतर वर्षभर समाज उपयोगी उपक्रम चालू असतात. त्यासोबतच अनेक लोकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि अर्थांजन चालू राहते. गेली २ वर्षे कोरोनाच्या संकटामुळे हे कार्य बंद होते, पण या वर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यांच्या ह्या कार्याचा सन्मान अर्थसंकेत दिवाळी पहाट या कार्यक्रमात करू इच्छिते.

शनिवार २९ ऑक्टोबर २०२२ रोजी “अर्थसंकेत उद्योजकांची दिवाळी पहाट” हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी मंदीर नाट्यगृह, दादर पश्चिम, मुंबई येथे सकाळी ७ ते १० या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे. अपेक्षित उपस्थिती ९०० व्यावसायिक !

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वर्ल्ड ट्रेंड सेंटरचे चेअरमन श्री. विजय कलंत्री, श्री शंतनू भडकमकर, विकोचे श्री संजीव पेंढारकर उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क – ८०८२३४९८२२, arthsanket10@gmail.com

Arthsanket Diwali Pahat 2022
Arthsanket Diwali Pahat 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *