गोदरेज अँड बॉयसचे भारतामध्ये संरक्षण क्षेत्राच्या स्वदेशीकरणामध्ये योगदान I

गोदरेज अँड बॉयसचे भारतामध्ये संरक्षण क्षेत्राच्या स्वदेशीकरणामध्ये योगदान

संरक्षण व्यवसायातून दोन अंकी वृद्धी साध्य करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट

मुंबई, २७ ऑक्टोबर २०२२: गोदरेज समूहातील प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयस आपल्या स्वदेशी उत्पादन कौशल्यांसह भारताचे संरक्षण क्षेत्र मजबूत करत आहे. ग्राहकांचा विश्वास, प्रभावी ऑर्डर बुक आणि अंमलबजावणीतील उत्कृष्टता यांच्या बळावर या व्यवसायाने हल्लीच्या काळात उत्तम वृद्धी साध्य केली असून संरक्षण व्यवसायातून दोन-अंकी वृद्धी मिळत राहील अशी कंपनीची अपेक्षा आहे. गोदरेज मटेरियल हँडलिंग, गोदरेज टुलिंग, गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स, गोदरेज एरोस्पेस आणि गोदरेज प्रिसिजन इंजिनियरिंग यासारख्या आपल्या विविध व्यवसायांमार्फत ही कंपनी संरक्षण क्षेत्राला सेवा व उत्पादने पुरवते. गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स, गोदरेज एरोस्पेस आणि गोदरेज प्रिसिजन इंजिनियरिंग यांनी गांधीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या डेफएक्स्पो २०२२ मध्ये भाग घेऊन आपल्या संरक्षण क्षमता प्रदर्शित केल्या होत्या.

२०२५ सालापर्यंत, ३५,००० कोटी रुपयांच्या एक्सपोर्ट्ससह, १.७५ लाख कोटी रुपयांची संरक्षण उत्पादने तयार करण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाला अनुसरून गोदरेज ग्रुपची ही प्रमुख कंपनी क्षमता विस्तार, तंत्रज्ञान भागीदारी व संशोधन आणि विकास यामध्ये लक्षणीय गुंतवणूक करत आहे. महाराष्ट्रात खालापूर येथे या व्यवसायांसाठी १,००,००० चौरस मीटरपेक्षा मोठ्या जागेवर ग्रीन फील्ड फॅसिलिटी उभारण्यासाठी गोदरेज अँड बॉयस प्रयत्नशील आहे.

एअर फ्रेम्ससारख्या एरोस्पेस, लॅन्ड व नेव्हल ऍप्लिकेशन्ससाठी, ब्राह्मोस आणि एमआरएसएएम, माईन-म्युनिशन लेयर, काउंटर माईन फ्लेल, विविध प्रकारचे लॉन्चर्स, व्हेसल्स आणि सबमरिन्स यांच्यासाठी वॉटरटाईट आणि प्रेशर टाईट डोअर्स व हॅचेस यांच्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारची महत्त्वपूर्ण व जटिल पद्धतीची उपकरणे गोदरेज अँड बॉयसने विकसित करून पुरवली आहेत.

हल्लीच या कंपनीने भारतामध्ये डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरीला (डीआरडीएल) प्रतिष्ठित ब्राह्मोस मिसाईलच्या एअर-लॉन्च्ड प्रकारासाठी पहिली एअरफ्रेम असेम्ब्ली पुरवली. आयएनएस विक्रांतमध्ये गोदरेजने जवळपास ७०० वॉटर-टाईट दरवाजे पुरवून फिट देखील करून दिले आहेत, याठिकाणी कंपनीने फोर्कलिफ्ट्स देखील पुरवल्या आहेत. आयएनएस विक्रांतच्या मेडिकल बेमध्ये गोदरेज हेल्थ केयर फर्निचर फिट करण्यात आले आहे. हल्लीच या कंपनीने आर्मी रेजिमेंट्ससाठी रगडाईज्ड हेवी-ड्युटी फोर्कलिफ्ट्स पुरवल्या आहेत.

संशोधन आणि विकास क्षमता मजबूत करून गोदरेज अँड बॉयसने संपूर्ण जगभरात अत्याधुनिक उत्पादने पुरवत असताना देशांतर्गत गरजा देखील पूर्ण केल्या आहेत. भारतात संरक्षण उपकरणांचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी ऊर्जा स्रोत, एअर कंडिशनिंग इक्विपमेंट, हायड्राऑलिक्स आणि न्यूमॅटिक्स, कंट्रोलर्स इत्यादी विभागांमध्ये विशेष नैपुण्य संपादन केलेल्या अनेक बुटीक एमएसएमईसोबत कंपनीने भक्कम भागीदारी उभारली आहे. आपल्या भागीदारांसह नाविन्यपूर्ण उत्पादने विकसित करून, रोबोटिक्स, आयआयओटी आणि कंट्रोल सिस्टिम्स उभारून कंपनीने आपल्या उत्पादनांमध्ये प्रगती घडवून आणली आहे.

गोदरेज अँड बॉयसचे हेड – स्ट्रॅटेजिक प्रोजेक्ट्स – इंडस्ट्रियल प्रॉडक्ट्स बिझनेसेस श्री. कौस्तुभ शुक्ला यांनी सांगितले, “भारताच्या स्वायत्त संरक्षण कार्यक्रमाला सहयोग प्रदान करण्यामध्ये आमच्यासाठी वृद्धीच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध आहेत आणि त्यातून लाभ मिळवण्यासाठी आम्ही क्षमता व योग्य भागीदारी उभारत आहोत. संरक्षण क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने आमचे सर्व व्यवसाय ग्राहकांसोबत सक्रियपणे संवाद साधत आहेत, नवनवीन गोष्टी, संकल्पना विकसित करत आहेत, गुंतवणूक व विस्तार करत आहेत.

जागतिक पातळीवरील मोठमोठ्या कंपन्यांना जटिल प्रिसिजन सिस्टिम्स आम्ही पुरवत आहोत. गेल्या अनेक वर्षात निर्यात कामगिरी उत्तम आहे, संरक्षण क्षेत्रातील आमच्या महसुलापैकी २०% ते ४०% हिस्सा निर्यातीतून येत आहे. सरकारची संरक्षण निर्यात उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यात मदत करू शकू असा आत्मविश्वास यामुळे आमच्या मनात निर्माण झाला आहे.”

संरक्षण उत्पादनांसाठी भारत सरकारने एक व्हिजन तयार केले आहे, २०४७ सालापर्यंत जगभरातील आघाडीच्या १०० डिफेन्स कॉर्पोरेशन्समध्ये २० भारतीय डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना स्थान मिळवून देणारे धोरण आखले आहे. संरक्षण क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकारने देशांतर्गत कंपन्यांकडून उपकरणे मिळवण्याचे ठरवले आहे आणि सुयोग्य इकोसिस्टिमच्या विकासासाठी ही कंपनी वचनबद्ध आहे.

godrej work
godrej work

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *