डॅनोन इंडियाने AptaGrow लाँच करण्याची घोषणा केली I
डॅनोन इंडियाने AptaGrow लाँच करण्याची घोषणा केली
‘शक्य तितक्या लोकांपर्यंत अन्नाद्वारे आरोग्य’ पोहोचवण्याच्या आपल्या मिशनसह डॅनोन इंडियाने AptaGrow च्या राष्ट्रीय लाँचसह लहान मुलांचे पोषण चांगले व्हावे यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 3-6 वर्षे वयोगटातील मुलांच्या पोषणाची गरज AptaGrow 37 पोषक तत्त्वांसह पूर्ण करते. यात प्रीबायोटिक्सचे एक अद्वितीय मिश्रण आहे जे वाढ, मेंदूचा विकास आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक पोषक तत्त्वे देते.
उंची वाढवण्यासाठी AptaGrow कडे 100% मिल्क प्रोटीन आणि कॅल्शियम, रोगप्रतिकारक आरोग्यासाठी व्हिटॅमिन A, C, D आणि मेंदूच्या विकासाला मदत करण्यासाठी DHA, लोह, फॉलिक ऍसिड आणि आयोडीन आहे. तर प्रीबायोटिक्सचे अनोखे मिश्रण आवश्यक पोषक तत्त्वे योग्य प्रमाणात शरीराला देते. हे कमी फॅट्स असलेले, चॉकलेट/व्हॅनिला फ्लेवर्ड ड्रिंक मुलांमध्ये निरोगी वाढ आणि सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी एक आदर्श पर्याय आहे.
मुलांच्या वाढीच्या वर्षांमध्ये पुरेसे पोषण देण्याच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढवण्याच्या डॅनोनच्या वचनबद्धतेचा पुरावा म्हणजे AptaGrow.
श्रीराम पद्मनाभन, मार्केटिंग डायरेक्टर, डॅनोन इंडिया म्हणाले, “जास्तीत जास्त लोकांपर्यंत अन्नाद्वारे आरोग्य पोहोचवणे हे डॅनोनचे लक्ष्य आहे. मुलाच्या वाढीच्या काळात योग्य पाया असणे महत्त्वाचे आहे. आपल्या मुलांना सर्वोत्तम पोषण देण्यासाठी प्रत्येक आईची तळमळ असते. हे पोषण शरीराला चांगल्या प्रकारे मिळणे महत्त्वाचे आहे. एका स्वतंत्र सर्वेक्षणाच्या आधारे, 69% मातांना असे वाटले की त्यांची मुले त्यांच्या अपेक्षेनुसार वाढत नाहीत आणि 73% मातांना असे वाटते की पोषक तत्त्वांचे शोषण कमी झाल्यामुळे त्यांची वाढ योग्य नाही. हे लक्षात घेऊन आम्ही AptaGrow लाँच करत आहोत जी शास्त्रोक्त पद्धतीने डिझाइन केलेली आहे. हे प्रीबायोटिक्सचे अनोखे मिश्रण असलेले 37 महत्त्वपूर्ण पोषक तत्त्वे प्रदान करते जे पोषक द्रव्ये शोषून घेण्यास आणि मुलांच्या वाढीच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करतात.
मुलांच्या सर्वांगीण वाढीच्या गरजा जाणून त्या पूर्ण करण्यासाठी ब्रँडने आपले पहिले उत्पादन – Aptagrow ग्रोथ चक्र सादर केले आहे. हे उत्पादन केवळ मुलाची उंची, वजनच मोजत नाही तर रोगप्रतिकारशक्ती, मेंदूचा विकास आणि एकूणच आरोग्य देखील सुधारते. यासोबतच, विशिष्ट वाढीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मातांना मोफत वैयक्तिकृत आहार योजना प्रदान केली जाईल.
पालक, आणि आपल्या भागीदारांना निरोगी भारताला चालना देण्याच्या आपल्या मिशनमध्ये सामील होण्यासाठी डॅनोन आमंत्रित करते. पुरेशा पोषणविषयक गरजा पुरविण्याच्या सर्वांगीण दृष्टीकोनासह, कंपनी देशभरातील प्रत्येक मुलापर्यंत पोहोचण्याची इच्छा बाळगते. तसेच वाढीच्या योग्य वयात कोणतेही मूल आवश्यक पोषणतत्त्वांपासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्नशील आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi