डॉ अशोक खोसला यांना प्रदान करण्यात आला पहिला ‘सोहराब पिरोजशा गोदरेज एन्व्हायरन्मेंट पुरस्कार’ I

डॉ अशोक खोसला यांना प्रदान करण्यात आला पहिला ‘सोहराब पिरोजशा गोदरेज एन्व्हायरन्मेंट पुरस्कार’ I

मुंबई फर्स्ट, गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड आणि असोसिएट कंपन्यांच्या समन्वयातून यशस्वीपणे सुरु करण्यात आलेल्या सोहराब पिरोजशा गोदरेज एन्व्हायरन्मेंट पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून डॉ अशोक खोसला यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. हा पुरस्कार सोहळा आज मुंबईत पार पडला. डॉ अशोक खोसला यांनी पर्यावरण व शाश्वतता या क्षेत्रांमध्ये दिलेल्या लक्षणीय योगदानाच्या सन्मानार्थ त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. 

आघाडीचे प्रवर्तक पर्यावरणवादी डॉ अशोक खोसला यांनी फक्त भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर आपला कायमचा ठसा उमटवला आहे. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी नॅशनल सिक्युरिटी अड्वायजरी बोर्ड, नॅशनल एन्व्हायरन्मेंट बोर्ड, कॅबिनेटचे सायन्स अड्वायजरी कौन्सिल याठिकाणी काम केले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉ खोसला एक ट्रेंडसेटर मानले जातात. १९६५ साली हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पर्यावरणावर पहिला युनिव्हर्सिटी कोर्स सुरु करण्यात, १९७२ साली विकसनशील देशातील, पर्यावरणासाठी पहिल्या सरकारी एजन्सीचे नेतृत्व करण्यात आणि १९८३ साली शाश्वत विकासासाठी पहिला सामाजिक उद्यम सुरु करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 

गोदरेज इंडस्ट्रीजचे चेयरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्री नादिर गोदरेज यांनी सांगितले, पहिल्या ‘सोहराब पिरोजशा गोदरेज एन्व्हायरन्मेंट पुरस्काराचे’ मानकरी म्हणून डॉ अशोक खोसला यांच्या नावाची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. पर्यावरणविषयक कामात त्यांनी मिळवलेले यश आणि या क्षेत्राप्रती त्यांची निष्ठा यामुळे त्यांनी स्वतःचा कायमस्वरूपी प्रभाव निर्माण केला आहे. या पुरस्कारामागची भावना आणि विचार यांचे ते मूर्तिमंत रूप आहेत. त्यांच्या योगदानाचा सन्मान करत असताना, पर्यावरण संरक्षण व संवर्धन आणि शाश्वतता यांच्याप्रती आमची बांधिलकी कायम जपत राहण्याची प्रेरणा आम्हाला मिळत आहे.”

या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख वक्ते, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनचे माजी चेयरमन आणि सीएसआयआरचे माजी डायरेक्टर जनरल डॉ रघुनाथ माशेलकर, एफआरएस यांनी उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले, “मी स्वतःला खूप सुदैवी मानतो की मला अतिशय अनोखा असा हा सोहळा मला पाहायला मिळतो आहे, ज्यामध्ये पर्यावरण क्षेत्रातील प्रवर्तक एस पी गोदरेज यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार पर्यावरण क्षेत्रातील ख्यातनाम डॉ अशोक खोसला स्वीकारत आहेत.”

पहिल्या ‘सोहराब पिरोजशा गोदरेज एन्व्हायरन्मेंट पुरस्काराचे’ मानकरी डॉ अशोक खोसला यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले, “यंदाच्या वर्षीचा एस पी गोदरेज पुरस्कार स्वीकारताना मला खूप आनंद होत आहे. माझी संघटना, डेव्हलपमेंट अल्टर्नेटीव्ह्जने गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड आणि असोसिएट कंपन्यांसोबत अनेक पर्यावरण व उदरनिर्वाहविषयक मुद्द्यांवर काम केले आहे. एक शास्त्रज्ञ म्हणून मी मानतो की, ग्रह आणि व्यक्ती यांचा सहजीवन पद्धतीने विकास व्हावा हे आपले सर्वांचे व्हिजन साकार करण्यासाठी नावीन्य खूप महत्त्वाचे आहे. डीएमधील माझी टीम आणि मी गेली अनेक वर्षे यासाठी कार्यरत आहोत. माझे योगदान अल्पशे आहे पण मी आशा करतो की या पुरस्कारामुळे युवकांना पुढाकार घेण्याची आणि पृथ्वीच्या, मानवासकट सर्व प्रजातींच्या संरक्षणासाठी भरीव कार्य करण्याची प्रेरणा मिळेल.”

मुंबई फर्स्टचे उपाध्यक्ष श्री रॉजर सी बी परेरा यांनी सांगितले, “दिग्गज व्यक्तीमत्व श्री एस पी गोदरेज काळाच्या खूप पुढे जाऊन विचार करणारे होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य, वेळ, कौशल्ये पर्यावरणासाठी अर्पण केले. ते या क्षेत्रात अक्षरशः २४X७ झटत होते. त्यांच्याप्रमाणेच पर्यावरणाप्रती बांधिलकी जपणारे, १९६५ सालापासून फक्त भारतात नव्हे तर जागतिक पातळीवर कार्यरत असलेले डॉ अशोक खोसला यांची निवड पहिल्या सोहराब पिरोजशा गोदरेज एन्व्हायरन्मेंट पुरस्कारासाठी करणे ज्युरींसाठी खूपच स्वाभाविक होते.”

पहिल्याच वर्षात या पुरस्काराला प्रचंड यश लाभले. मूल्यांकन निकषांमध्ये प्रभाव, नेतृत्व, पर्यावरणाविषयी बांधिलकी, समुदायासोबत संबंध, नाविन्यपूर्ण दृष्टिकोन, ऍडव्होकसीसाठी प्रयत्न, उपक्रम पुढे वाढवता येण्याची क्षमता, शैक्षणिक आउटरीच आणि विज्ञानावर आधारित दृष्टिकोन यांचा समावेश होता.

गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड आणि असोसिएट कंपन्यांनी डॉ अशोक खोसला यांचे हार्दिक अभिनंदन करून या सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व व्यक्ती व संस्थांचे आभार मानले. सोहराब पिरोजशा गोदरेज एन्व्हायरन्मेंट पुरस्कार शाश्वत व पर्यावरणाविषयी जागरूक भविष्य निर्माण करण्याप्रती गोदरेजची अतूट बांधिलकी अधोरेखित करतो.

SP Godrej Award
SP Godrej Award

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *