आयकॉनिक स्टार्ट अप ब्रँड पुरस्काराने ‘स्मिताज सिलेक्शन स्वामींनी’ चा सन्मान

आयकॉनिक स्टार्ट अप ब्रँड पुरस्काराने ‘स्मिताज सिलेक्शन स्वामींनी’ चा सन्मान करण्यात आला. अर्थसंकेतचे संस्थापक डॉ. अमित बागवे, योजक फूड्सचे श्री. श्रीकांत भिडे, संतोष लचके व सौ. रचना लचके बागवे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सौ. स्मिता नरेश या मुंबईतील एक यशस्वी उद्योजिका असून “Smita’s Selection Swamini” या उपक्रमातून साड्या, दागिने आणि पारंपरिक तसेच वेस्टर्न पोशाख भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देतात. विविध फॅशन शोमध्ये पुरस्कार विजेत्या म्हणून त्यांनी विशेष ओळख निर्माण केली आहे. शिवसेनेच्या उपविभाग संघटिका म्हणून सामाजिक क्षेत्रातही त्या सक्रिय आहेत. अनेक महिला उद्योजक गट व सामाजिक संस्थांशी त्यांचा सहभाग आहे. त्यांच्या कार्यातून उद्योजकता, फॅशन आणि समाजसेवेचा सुंदर संगम दिसून येतो.

Swamini
Swamini

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *