अर्थसंकेत आयकॉनिक ब्रँड पुरस्कार सोहळा संपन्न

अर्थसंकेत आयकॉनिक ब्रँड पुरस्कार सोहळा संपन्न

‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड (MahaBrand)’ हा अर्थसंकेत प्रस्तुत एक भव्य आणि प्रतिष्ठित बिझनेस सन्मान सोहळा असून, महाराष्ट्रातील विश्वासार्ह आणि लोकप्रिय ब्रँड्सचा गौरव याद्वारे करण्यात आला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील यशस्वी उद्योग, स्टार्टअप्स आणि कौटुंबिक व्यवसायांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी, ग्राहकांचा विश्वास आणि सातत्यपूर्ण गुणवत्तेबद्दल सन्मानित करण्यात आले.

आयकॉनिक ब्रँड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने ‘याश्त कन्सल्टन्ट प्रायव्हेट लिमिटेड’चा सन्मान करण्यात आला. अर्थसंकेतचे संस्थापक डॉ. अमित बागवे व माजी क्रिकेटपटू श्री. निलेश कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Yasht Consultants ही मुंबईतील एक अग्रगण्य आउटडोअर जाहिरात कंपनी असून 2010 साली स्थापन झाली आहे. कुटुंबीयांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या संस्थेचे उद्दिष्ट म्हणजे ग्राहकांना दर्जेदार आणि प्रभावी आउटडोअर मीडिया सेवा प्रदान करणे. स्थानिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर जाहिरात मोहिमा तसेच इव्हेंट मार्केटिंगसाठी ही कंपनी एक विश्वासार्ह प्लॅटफॉर्म आहे. योग्य माध्यमांची निवड करून ब्रँड्सना त्यांच्या लक्षित ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, ROI वाढवणे आणि ब्रँड रीकॉल मजबूत करणे हे Yasht Consultants चे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांसाठी ही संस्था प्रभावी मार्केटिंग भागीदार ठरली आहे. महाब्रँड इव्हेन्टची रेल्वे स्टेशनची जाहिरात यांच्यामार्फतच करण्यात आली आहे.

आयकॉनिक ब्रँड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने चौगुले विद्यालय डोंबिवली यांचा सन्मान करण्यात आला. अर्थसंकेतचे संस्थापक डॉ. अमित बागवे, IISM च्या सौ. रसिक कुलकर्णी व मराठी इन्फोलाईनचे श्री. प्रसन्ना अडावदकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वनिता चौगुले या एम.ए., एम.एड. शिक्षण घेतलेल्या शिक्षणतज्ज्ञ असून “चौगुले विद्यालय”च्या चेअरमन आहेत. १९९० साली त्यांनी ग्रामीण भागात शाळा सुरू करून मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांना, विशेषतः गरजू मुलांना, शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. शिक्षणासोबतच पतसंस्था, महिला उद्योजकता व समाजसेवेचे अनेक उपक्रम त्यांनी राबवले. ३६ वर्षे मुख्याध्यापिका म्हणून कार्य करताना त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यांच्या शाळेचा एसएससी निकाल १००% आहे. शिक्षणाद्वारे सुसंस्कृत समाज घडवणे आणि गरीब विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हे त्यांचे प्रमुख ध्येय आहे.

आयकॉनिक स्टार्ट अप ब्रँड पुरस्काराने ‘स्मिताज सिलेक्शन स्वामींनी’ चा सन्मान करण्यात आला. अर्थसंकेतचे संस्थापक डॉ. अमित बागवे, योजक फूड्सचे श्री. श्रीकांत भिडे, संतोष लचके व सौ. रचना लचके बागवे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सौ. स्मिता नरेश या मुंबईतील एक यशस्वी उद्योजिका असून “Smita’s Selection Swamini” या उपक्रमातून साड्या, दागिने आणि पारंपरिक तसेच वेस्टर्न पोशाख भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देतात. विविध फॅशन शोमध्ये पुरस्कार विजेत्या म्हणून त्यांनी विशेष ओळख निर्माण केली आहे. शिवसेनेच्या उपविभाग संघटिका म्हणून सामाजिक क्षेत्रातही त्या सक्रिय आहेत. अनेक महिला उद्योजक गट व सामाजिक संस्थांशी त्यांचा सहभाग आहे. त्यांच्या कार्यातून उद्योजकता, फॅशन आणि समाजसेवेचा सुंदर संगम दिसून येतो.

आयकॉनिक सायन्स कोचिंग ब्रँड ऑफ मुंबई पुरस्काराने ‘शिव सायन्स क्लासेस’चा सन्मान करण्यात आला. अर्थसंकेतचे संस्थापक डॉ. अमित बागवे व वास्तू रविराजचे श्री. रविराज अहिरराव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मुंबईसारख्या स्पर्धात्मक शहरात…जिथे प्रत्येक ठिकाणी competition आहे…तिथे एक नाव असे आहे, ज्याने Result, Discipline आणि Trust — हे तिन्ही एकत्र जपले आहे…Shiv Science Classes…

उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रँड्सना ट्रॉफी आणि गौरव पत्रिका देऊन सन्मानित करण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या ब्रँडची प्रतिष्ठा आणि ओळख अधिक दृढ झाली. हा सोहळा केवळ पुरस्कार वितरण नसून, महाराष्ट्रातील उद्योजकता, ब्रँड बिल्डिंग आणि ग्राहकांच्या विश्वासाचा उत्सव ठरला.

Arthsanket Iconic Awards 2026
Arthsanket Iconic Awards 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *