United Shine पुण्यात प्रीमियम शू व लेदर केअर सेवांची नवी सुरुवात
शहरातील बूट व लेदर वस्तूंच्या प्रीमियम देखभालीसाठी ‘United Shine – Premium Shoe & Leather Care’ या नाविन्यपूर्ण स्टार्टअपचे पहिले आउटलेट नुकतेच विमान नगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात सुरू करण्यात आले. या भव्य उद्घाटन सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिजित घाटगे (संस्थापक – Pokket Cafe), वैभव फरतडे (प्रदेशाध्यक्ष – मराठा उद्योजक लॉबी), कृष्णा निडवंचे (संस्थापक – नादब्रह्म इडली), तसेच अमित बागवे व सौ. रचना लचके बागवे (संस्थापक – अर्थसंकेत), सोमनाथ शिनगारे (संस्थापक – Jaggery Tales), सौ. ऐश्वर्या पठारे (नगरसेविका – पुणे महापालिका) आणि डॉ. दादा कोद्रे (नगरसेवक – पुणे महापालिका) उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते फीत कापून या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी या अभिनव स्टार्टअप संकल्पनेचे कौतुक करत पुणे शहरात अशा प्रीमियम सेवांची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले.
‘United Shine’ या स्टार्टअपची स्थापना ‘बाराखडी उद्योजकतेची’ पुस्तकाचे लेखक विजय गोपाळराव पवार आणि ‘इनोव्हेटिव्ह लॉंड्री बास्केट’चे संस्थापक वैभव होळसांबरे या दोन तरुण उद्योजकांनी केली आहे. या केंद्रात शू क्लिनिंग, स्नीकर्स क्लिनिंग, लेदर शूज पॉलिशिंग, तसेच लेदर बॅग आणि इतर लेदर वस्तूंचे रिस्टोरेशन अशा आधुनिक तंत्रज्ञानाधारित प्रीमियम सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्राहकांना त्यांच्या बूट व लेदर वस्तू नव्यासारख्या करण्याची सुविधा येथे मिळणार आहे.
याच आउटलेटच्या माध्यमातून ‘Veltan’ या लेदर प्रोडक्ट्स ब्रँडचीही सुरुवात करण्यात आली आहे. या ब्रँडअंतर्गत हँडमेड कोल्हापुरी चप्पल, प्रीमियम लेदर शूज, लेदर बॅग्ज, बेल्ट्स आणि वॉलेट्स यांसारखी आकर्षक व किफायतशीर उत्पादने उपलब्ध आहेत.
हा उपक्रम Shop No. 3, Shalimar Triumph, Opp. Viman Prestige Society, Clover Park, Viman Nagar, Pune – 411014 येथे सुरू करण्यात आला असून, पुणेकरांकडून या नव्या स्टार्टअपला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.


