इनस्पिरा सिटीचा 20M चौरस फूट टप्पा; गॉडविट व NHK सोबत करार
इनस्पिरा सिटी तर्फे भाडेतत्त्वावर घेतलेल्या 20 दशलक्ष चौरस फूट क्षेत्राचा टप्पा पार; गॉडविट कन्स्ट्रक्शन आणि NHK स्प्रिंग्स सोबत महत्त्वपूर्ण करार
महाराष्ट्रातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या औद्योगिक पार्कपैकी एक असून टियर-2 भागामध्ये दळणवळण आणि उत्पादन केंद्रांची वाढती मागणी असताना उच्च दर्जाच्या उद्योगांना आकर्षित करत आहे
मुंबई, 18 जून २०२५: छत्रपती संभाजी नगर येथील शेंद्रा एमआयडीसीमध्ये इनस्पिरा रिअॅल्टीने विकसित केलेले 232 एकरचे इनस्पिरा सिटी हे एकात्मिक औद्योगिक आणि गोदाम पार्क हे महाराष्ट्रातील सर्वात सक्रिय औद्योगिक कॉरिडॉरपैकी एक म्हणून लोकप्रियता मिळवत आहे. आतापर्यंत भाडेतत्त्वावर घेतलेल्या 20 दशलक्ष चौरस फूट क्षेत्राचा टप्पा ओलांडत आणि अनेक उच्च-मूल्य करार सुरू ठेवत या प्रकल्पाने २०२५ मध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
आघाडीवर राहून मागणीतील वाढीचे नेतृत्व करताना गॉडविट कन्स्ट्रक्शनसोबत एक महत्त्वपूर्ण करार करण्यात आला आहे. त्यामध्ये 1.1 दशलक्ष चौरस फूट क्षेत्राहून अधिक जागा भाडेतत्त्वावर घेतली आहे. त्यामुळे हा इनस्पिरा सिटीमधला आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार ठरला आहे. संपूर्ण भारतात आपल्या विस्तृत औद्योगिक बांधकाम व्यवसायाचा ठसा उमटविण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या गॉडविटने इनस्पिरा सिटीमध्ये भाडेतत्त्वावर जागा घेण्याचा निर्णय राष्ट्रीय उत्पादन आणि लॉजिस्टिक्स हब म्हणून इनस्पिरा सिटीच्या वाढत्या दर्जाला आणखी बळकटी देतो.
आधुनिक उत्पादन युनिटसाठी 3.5 लाख चौरस फूटपेक्षा अधिक जागा भाड्याने घेऊन NHK स्प्रिंग्सने इनस्पिरा सिटीच्या गतीला आणखी चालना दिली आहे. ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील उच्च कार्यक्षमतेच्या स्प्रिंग तंत्रज्ञानासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या या कंपनीने येथे गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्यामुळे इनस्पिरा सिटीचे सर्व दृष्टीने योग्य स्थान, तयार असलेल्या पायाभूत सुविधा आणि प्रगत उत्पादन व निर्यातमुखी उद्योगांसाठी एक पसंतीचे केंद्र म्हणून निर्माण होत असलेली ओळख अधोरेखित होते.
समृद्धी महामार्ग एक्स्प्रेसवेच्या अगदी जवळ वसलेल्या इनस्पिरा सिटीला उत्कृष्ट रस्ते संपर्काचा लाभ मिळत आहे. त्यामुळे मुंबई, नागपूर, जालना ड्राय पोर्ट आणि महत्त्वाच्या पुरवठा साखळी केंद्रांपर्यंत एका दिवसात पोहोचता येते. 5-स्टार MIDC प्रमाणपत्र, तयार पायाभूत सुविधा आणि तत्काळ वाटपाची सुविधा यामुळे हा पार्क सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME), आंतरराष्ट्रीय उत्पादक आणि लॉजिस्टिक सेवा पुरवठादारांना सातत्याने आकर्षित करत आहे.
इनस्पिरा रिअॅल्टीचे संस्थापक आणि संचालक आयुष मधुसूदन अगरवाल म्हणाले, “गॉडविट कन्स्ट्रक्शन आणि NHK स्प्रिंग्ससारख्या उद्योगजगतातील आघाडीच्या कंपन्यांकडून मिळणारी वाढती मागणी ही इनस्पिरा रिअॅल्टी टीमच्या दूरदृष्टी आणि समर्पित कामाला मिळालेली पावती आहे. या महत्त्वपूर्ण करारांमधून इनस्पिरा सिटीला एक विश्वासार्ह आणि भौगोलिक दृष्ट्या योग्य ठिकाणी असलेले महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून विकसित करण्याची आमची बांधिलकी प्रतिबिंबीत होते. लहान आणि मोठ्या सर्व प्रकारच्या व्यवसायांच्या शाश्वत वाढीस पाठबळ देणाऱ्या पायाभूत सुविधांच्या विकासावर आमचा भर आहे. समृद्धी महामार्गाच्या जवळ असल्यामुळे आमच्या प्रकल्पाचे महत्व अधिक वाढते. त्यामुळे महत्त्वाच्या बाजारपेठांशी अखंड संपर्क साधता येतो आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीतील आमच्या भूमिकेला बळकटी मिळते.”
भाडेकराराला मिळत असलेली मजबूत गती आणि ठोस मागणीमुळे इनस्पिरा रिअॅल्टी भविष्यातील गरजांनुसार तयार औद्योगिक परिसंस्था निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यायोगे स्थानिक रोजगार आणि भारताच्या व्यापक विकासगाथेत योगदान दिले जाईल.
About Inspira Realty
Inspira Realty, a young and dynamic real estate developer is dedicated to creating premium living spaces that prioritize human-centric design and thoughtful planning. Renowned for our prime locations, exceptional architectural designs, and redevelopment projects, Inspira Realty is led by seasoned professionals and supported by a skilled team of architects, engineers, and project managers. With a focus on premium architecture, consciously Made in India materials, and robust execution, we are committed to delivering unique, integrated lifestyle and workplace environments that exceed our customers’ expectations.
Inspira Realty operates primarily in Mumbai and Chhatrapati Sambhaji Nagar. In the residential real estate sector, over 2 million sq. ft. is being developed in high-density suburbs of Mumbai, including Chembur, Bandra, Santacruz, Malad, Vile Parle, and Borivali. In Chhatrapati Sambhaji Nagar, the company is developing Inspira City, a warehousing and industrial land parcel spanning 232 acres in the strategically located Shendra district. Being connected to Samruddhi Mahamarg, Inspira City offers excellent connectivity, robust infrastructure, and a range of incentives designed to enhance competitiveness for diverse businesses. Furthermore, Inspira Realty is developing a 28-acre township featuring residential apartments, plotted land, and a host of amenities.

- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड

