महिंद्रा लॉजिस्टिक्सतर्फे मुंबईजवळ भिवंडी येथे ६.५ लाख चौरस फूट मल्टी-क्लायंट वेअरहाऊसचे अनावरण
भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक लॉजिस्टिक सुविधा पुरवठादारांपैकी एक महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेडने मुंबईजवळील भिवंडी येथे आपल्या अत्याधुनिक वेअरहाऊसचे अनावरण केले. ही सुविधा ६.५ लाख चौरस फूट अशा विस्तृत क्षेत्रात पसरलेली असून महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडला लवचिक, व्यवस्थित पूर्तता आणि एकात्मिक वितरण उपाय पुरविण्यास अनुमती देते.
नवीन वेअरहाऊस ऑटोमोटिव्ह, ई-कॉमर्स आणि एफएमसीजी उद्योगांमधील विविध क्लायंटची पूर्तता आणि वितरण व्यवस्थापित करणाऱ्या महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या बहुविध क्लायंट सुविधांच्या भारतभरातील नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग असेल. हे नाशिक आणि वापी जवळील प्रमुख औद्योगिक आणि उत्पादन क्लस्टर्समध्ये सुलभ प्रवेश मिळवून देते आणि कार्यक्षम लॉजिस्टिक ऑपरेशन्स (दळणवळण कामकाज) सुलभ करते. भारतातील सर्वात मोठ्या बंदराच्या जवळ असलेले हे सुविधा केंद्र पुरवठा साखळीत महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी सज्ज असून त्यामुळे मालाची जलद आणि अधिक कार्यक्षम वाहतूक करता येईल. या सुविधा केंद्राची रचना महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या शाश्वतता मानकांनुसार करण्यात आली असून त्यामध्ये लिक्विड डिस्चार्ज मॅनेजमेंट, १००% ऑन-साइट अक्षय ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापन प्रोटोकॉल समाविष्ट आहेत. ही सुविधा पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देत ३०% हरित आच्छादन पुरविते आणि हे आयजीबीसी प्लॅटिनम प्रमाणित आहे. ग्रेड-ए वेअरहाऊसमध्ये ८४ डॉक्स, १३ मीटर स्पष्ट उंची आणि ८ MT/M2 ची लोड घेण्याची क्षमता आहे. यामुळे ते बहुमुखी आणि MLL च्या 3PLला पाठबळ देणाऱ्या उपाययोजनांच्या विस्तृत श्रेणीसाठी, लास्ट-माईल डिलिव्हरी आणि एक्सप्रेस व्यवसायांसाठी योग्य बनते. महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रामप्रवीण स्वामिनाथन म्हणाले, “आमची क्षमता वाढवण्यासाठी आणि वाढत्या मागणीला सामोरे जाण्यासाठी आम्ही संपूर्ण भारतामध्ये बिल्ट-टू-सूट (BTS) वेअरहाऊसिंग सुविधेची भर घालत आमचे नेटवर्क वाढवत आहोत. भिवंडीतील आमचे नवीनतम सुविधाकेंद्र भारतातील प्रमुख औद्योगिक केंद्रांपैकी एक असून ते आम्हाला या प्रदेशातील आमच्या मौल्यवान ग्राहकांसाठी एकात्मिक उपायसुविधांचा पोर्टफोलिओ विस्तृत करण्यास सक्षम करते. हे केंद्र जागतिक दर्जाच्या, तंत्रज्ञान-प्रणीत सुविधा वितरीत करण्याच्या आमच्या बांधिलकीला मूर्त रूप देते. २०४० पर्यंत कार्बन न्यूट्रल स्थिती प्राप्त करण्याच्या आमच्या दृष्टीकोनाशी हे सुसंगत आहे. या सुविधा केंद्रा साठी IGBC प्रमाणीकरण मिळवण्याच्या आमच्या प्रयत्नावरुन हे दिसून येते.”