गोदरेज अँड बॉइस विविध उद्योगांतील हरित उर्जा व्यवसाय वाढीवर लक्ष केंद्रित करणार I
गोदरेज अँड बॉइस विविध उद्योगांतील हरित उर्जा व्यवसाय वाढीवर लक्ष केंद्रित करणार
गोदरेज प्रोसेस इक्विपमेंटतर्फे पुढील पाच वर्षांत ग्रीन हायड्रोजन व्यवसायातील उपकरणांचा वाटा दुप्पट करण्याचे उद्दिष्ट
मुंबई, १ ऑगस्ट २०२३ – गोदरेज अँड बॉइस या गोदरेज समूहाच्या प्रमुख कंपनीने आपल्या गोदरेज प्रोसेस इक्विपमेंट व्यवसायाच्या माध्यमातून शाश्वत उर्जा निर्मितीच्या दिशेने वाटचाल करण्याचे ठरवले आहे. सरकारच्या या क्षेत्रातील धोरणाशी सुसंगत राहाण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २९ पर्यंत हरित हायड्रोजन क्षेत्रातील प्रक्रिया उपकरणांचा हिस्सा दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. हरित हायड्रोजनचा अवलंब वाढवण्यासाठी देशात जोरदार प्रयत्न केले जात असून शून्य कार्बन उत्सर्जनाचे महत्त्वाकांक्षी ध्येय पूर्ण करण्यासाठीही वेगाने काम सुरू आहे. अधिक शाश्वत आणि पर्यावरणपूरक अर्थव्यवस्थेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे कंपनीच्या या क्षेत्रातील महत्त्वाकांक्षांनाही बळ मिळाले आहे.
गेल्या काही वर्षांत भारत हरित हायड्रोजन क्षेत्रातील महत्त्वाचा घटक म्हणून उदयास आला आहे. देशाच्या ग्रीन हायड्रोजन मिशनअंतर्गत हरित हायड्रोजन उत्पादन क्षमता २०३० पर्यंत प्रती वर्ष किमान ५ दशलक्ष टनपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याच उद्दिष्टाला योगदान देण्यासाठी गोदरेज प्रोसेस इक्विपमेंटने आपल्या क्षमता आणि कौशल्यांचा संबंधित प्रकल्प आणि धोरणात्मक गुंतवणुकीच्या मदतीने हरित हायड्रोजन क्रांतीला चालना देण्यासाठी वापर करण्याचे ठरवले आहे.
कंपनीने ब्लू हायड्रोजन प्रकल्पांसाठी जागतिक पातळीवर यशस्वीपणे उपकरणांचा पुरवठा केला आहे. त्याशिवाय कंपनीला मध्यपूर्व भागातील हरित हायड्रोजन प्रकल्पासाठी गरजेच्या हीट एक्सचेंजर्सचा पुरवठा करण्यासाठी कंत्राट मिळाले आहे.
गोदरेज प्रोसेस इक्विपमेंटचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख हुसैन शारीयार म्हणाले, ‘हरित आणि स्वच्छ भविष्याच्या दिशेने भारत करत असलेल्या प्रवासाचा भाग होताना आम्हाला अभिमान वाटत आहे. त्यासाठी हरित हायड्रोजनचा अवलंब करण्यासाठी आम्ही मदत करत आहोत. शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या देशाच्या महत्त्वाकांक्षेसाठी आम्ही योगदान देत आहोत. गुजरातमधील दहेज सुविधेच्या विकासासाठी कंपनीने ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हायड्रोजन हरित उर्जा आणि उर्जा क्षेत्रासाठी खास व मोठ्या उपकरणांचे वितरण सहजपणे करता यावे म्हणून ही गुंतवणूक करण्यात आली आहे. हरित उर्जा क्षेत्रात क्रांती आणण्यासाठी भारत व जगभरातील अधिकाधिक कंपन्यांशी भागिदारी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi