श्री. नादिर गोदरेज यांचा ‘मोस्ट रिस्पेक्टेड इंडियन इंडस्ट्रियलिस्ट ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मान I
व्यवसायाच्या माध्यमातून भारताला नाविन्यपूर्ण उत्पादने आणि उपायसुविधा सादर करून देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल श्री. नादिर गोदरेज यांना हुरुन इंडिया तर्फे ‘मोस्ट रिस्पेक्टेड इंडियन इंडस्ट्रियलिस्ट ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हुरुन इंडियाचे वार्षिक ‘मोस्ट रिस्पेक्टेड एंट्राप्रूनर डिनर’ हे भारतीय व्यवसायातील पिढ्यानपिढ्या आणि अनेक काळ काम करणारे समविचारी उद्योजक आणि अग्रणी यांच्या कल्पनांचा मिलाफ साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आले होते. भारतातील काही आघाडीच्या उद्योजकांचा प्रवास आणि इंडिया इंकमधील त्यांचे योगदान साजरे करण्यात आले आणि पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून त्यावर प्रकाश टाकण्यात आला.
श्री. गोदरेज यांनी या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला आणि म्हणाले, “हुरुन इंडियाकडून हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळणे खरोखरच एक सन्मान आहे. गोदरेज मध्ये आम्हाला आमच्या नाविन्यपूर्ण उत्पादने आणि उपायसुविधा यांच्याद्वारे आपल्या देशाची सेवा करण्यासाठी सक्षम बनून आपल्या देशाच्या विकासाच्या प्रवासाचा एक भाग बनण्याचा बहुमान मिळाला आहे असे मला वाटते. व्हेक्टर- बोर्न रोगांपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी कृषी सुविधा उपायांपासून शाश्वत जीवनशैली पुरविण्यापर्यंत समूहाच्या विविध व्यवसायांनी सतत स्वतःला भारताच्या आकांक्षांशी सुसंगत ठेवले आहे. आमचे अनेक दशकांपासूनचे कार्य भारताप्रती आमची अखंड वचनबद्धता व्यक्त करते आणि आपल्या राष्ट्रासाठी सर्वोत्कृष्ट गोष्टी सादर करण्यासाठी काहीतरी नवीन बनवण्याचा आमचा प्रयत्न अखंड सुरू राहील. या सन्मानाबद्दल मी भारतातील आमचे ७५० दशलक्ष हून अधिक ग्राहक, गोदरेज मधील आमचे सहकारी आणि हुरुन इंडिया यांचे आभार मानतो.”
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- Supercharge Your Business with Arthsanket Business Growth Package! 🚀
- कॉन्व्हेंट्री विद्यापीठ ग्रुप आणि गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एण्ज मॅनेजमेंटमध्ये शैक्षणिक करार
- थंडरबोल्ट तंत्रज्ञानासह लोकप्रिय काला हिट डास स्प्रे I
- ‘वेदभूमी इको व्हिलेज’ला ‘आयकॉनिक टुरिझम ब्रँड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार !
- ‘शिवांजली हॉलिडे होम’ ठरला ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ !