म्युच्युअल फंडांकरिता सेबीची नवी नियमावली I
म्युच्युअल फंडांकरिता सेबीची नवी नियमावली
२०२२ मध्ये म्युच्युअल फंड इंडस्ट्री करिता सेबी ने नवी नियमावली आणली. या क्षेत्राची सुरक्षितता संबंधात हि नियमावली होती.
एखादी म्युच्युअल फंड योजना बंद करायची असल्यास ट्रस्टींना युनिट होल्डर्स कडून परवानगी ची आवश्यकता लागेल. जास्तीत जास्त युनिट होल्डर्स च्या उपस्थितीत प्रति युनिट १ मत याप्रमाणे मत घेऊन ४५ दिवसांच्या आत मतदानाचा निकाल जाहीर केला जाईल.
मार्च २०२२ मध्ये सेबी ने आणलेल्या नियमावलीत म्युच्युअल फंड रिडेमशन करिता टू फॅक्टर ऑथेंटिकेशन ची गरज पडेल. पोर्टफोलिओ रिबेलेंस करिता टाईमफ्रेम जारी केले गेले. ३० व्यवसायिक दिवसांचा कालावधी याकरिता देण्यात आला आहे.
डीव्हीडेंड ट्रान्सफर व रिडेमशन करिता नवी नियमावली लागू करण्यात आली. याकरिता सेबी ने दिलेल्या कालावधीत पैसे ट्रान्सफर न केल्यास फंड कंपन्यांना १५% व्याजदराने गुंतवणूकदारांना पैसे दयावे लागतील.
AAA संदर्भातील डेबीट व मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट मध्ये गुंतवणूक करताना प्रति गुंतवणूकदार स्कीम च्या नेट असेट व्हॅल्यू च्या १०% गुंतवणूक करू शकेल.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo