इ-कॉमर्स खरेदी मध्ये सस्टेनॅबिलिटी हा एक महत्वाचा I
फेडेक्स च्या नवीन संशोधनानुसार, इ-कॉमर्स खरेदी मध्ये सस्टेनॅबिलिटी हा एक महत्वाचा विचार असतो.
८३% भारतीय ग्राहक स्पष्ट इएसजी धोरण असलेल्या कंपनीकडून वस्तू खरेदी करण्याची अधिक शक्यता असते.
भारत, नोव्हेंबर १८, २०२२: FedEx Express या जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस वाहतूक कंपनीने केलेल्या नवीन संशोधनानुसार, कोविड महामारीच्या काळात इ-कॉमर्स स्वीकारणारे लघु आणि मध्यम उद्योग (एसएमइज्),ग्राहक आता त्यांच्या वस्तू विकत घेण्याच्या निर्णयामध्ये सस्टेनॅबिलिटी वर भर देतात, या तथ्याला कमी लेखत आहेत.
सर्वेक्षणातील ८५% भारतीय लघु आणि मध्यम उद्योजकांनी (एसएमइज्) म्हटले की, त्यांचे ग्राहक सस्टेनॅबिलिटी पेक्षा वस्तू लौकरात लौकर मिळण्यामध्ये अधिक स्वारस्य घेतात. ८०% उद्योजकांना वाटते की, ग्राहकांना वस्तू शक्य तेवढी स्वस्त मिळण्यात स्वारस्य असते. ग्राहकांकडून घेतलेल्या माहितीनुसार मात्र वास्तविकता फार वेगळी आहे.
महत्वाच्या नोंदी: ग्राहकांना सस्टेनॅबिलिटी आणि वेग हे दोन्ही हवे आहे.
कोविड १९ च्या काळात इ-कॉमर्स ची वेगाने वाढ झाली कारण ग्राहकांची पर्यावरणाबाबतची काळजी वाढत आहे. मोठ्या संख्येने ग्राहकांना आपल्या पृथ्वीचे भविष्य सर्वात महत्त्वाचे वाटते आणि त्याबाबत ते तडजोड करू इच्छित नाहीत. त्यांना सस्टेनॅबिलिटी आणि जलद वितरण हे दोन्ही हवे आहेत. भारतामध्ये सर्वेक्षणातील ७०% ग्राहकांनी त्यांच्या वस्तू लौकरात लौकर मिळण्यामध्ये जेवढे स्वारस्य दाखविले तेवढेच ऑनलाइन वस्तू विकत घेण्याच्या प्रक्रियेच्या सस्टेनॅबिलिटी बाबत ही दाखविले.
तैवान, हाँगकाँग, मलेशियातील ग्राहकांपेक्षा; जे सामान मिळण्याच्या वेळेवर जास्त लक्ष केंद्रित करतात; भारतातील ग्राहक सस्टेनॅबिलिटी वर अधिक जोर देतात. सर्वेक्षणानुसार, भारतातील १० पैकी ९ ग्राहकांना लघु आणि मध्यम उद्योजकांनी सस्टेनेबल वितरण करावे अशी अपेक्षा आहे आणि त्यांना जास्त व्यवसाय मिळण्याची शक्यता आहे. प्रभावी पर्यावरणपूरक, सामाजिक आणि प्रशासकीय (इ एस जी) धोरण असलेल्या कंपन्यांकडून खरेदी करण्यास १० पैकी ८ जण प्राधान्य देतात; पण केवळ ३८% लघु आणि मध्यम उद्योजकांकडेच हे इ एस जी धोरण प्रत्यक्षात आहे. लघु आणि मध्यम उद्योजक हे मान्य करतात की, ग्राहकांना त्यांच्याकडून सस्टेनेबल व्यवसाय करण्याची अपेक्षा आहे पण ७४% उद्योजक एक तर त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची काळजी करतात किंवा यासाठी केलेली गुंतवणूक परतावा देईल याची त्यांना खात्री नसते.
वितरणामध्ये अधिक सस्टेनेबल दृष्टिकोन घेणे
FedEx Express च्या आशिया पॅसिफिक, मिडल ईस्ट आणि आफ्रिका (ए एम इ ए) चे अध्यक्ष श्री. कवल प्रीत म्हणाले की, “ज्या लघु आणि मध्यम उद्योजकांना आपला इ कॉमर्स व्यवसाय वाढवायचा आहे त्यांच्यासाठी आता सस्टेनॅबिलिटी हा अतिरिक्त पर्याय उरला नाहीये. ग्राहक आता वस्तु विकत घेण्याच्या निर्णयामध्ये या पर्यायला महत्वाचे आणि तडजोड न करता येणारे मानतात.लघु आणि माध्यम उद्योजक त्यांच्या पुरवठा साखळीला शेवटच्या ग्राहकापर्यंत जोडणाऱ्या लॉजिस्टिक्सचा विचार करून तत्काळ बदल करू शकतात. FedEx मध्ये आम्ही आधीच आपल्या वितरणाचा पृथ्वीवर होणार परिणाम कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत.”
FedEx Express मिडल ईस्ट, भारतीय उपखंड आणि आफ्रिका ऑपरेशन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. कामी विश्वनाथन म्हणाले, “आज ग्राहकांमध्ये पर्यावरणाप्रती असलेल्या जागरुकतेचा प्रभाव ग्राहकांच्या ब्रॅंडकडे पाहण्याचा दृष्टिकोनावर मोठ्या प्रमाणात पडत आहे ज्यामुळे व्यवसायासाठी प्रभावी इ एस जी धोरणे उद्योजकांनी स्वीकारणे अत्यावश्यक बनते. सस्टेनॅबिलिटी वर भर देणाऱ्या भागीदारांसोबत काम करणे आणि योग्य लॉजिस्टिक्स प्रदात्यासोबत सहभागी होणे हे भारतातील लघू आणि मध्यम उद्योजकांना हवामान बदलाचा प्रभाव मर्यादित करण्यामध्ये त्यांचे योगदान देण्यात खूप पुढे नेऊ शकतात. FedEx मध्ये आम्ही सातत्याने जास्त सस्टेनेबल पुरवठा साखळी ईको सिस्टम प्रदान करण्यासाठी काम करीत आहोत आणि आम्ही जबाबदरीने जगाशी जोडण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
FedEx आपल्या carbon neutral global operations by 2040 चे लक्ष्य मिळविण्यासाठी वितरणाच्या प्रक्रियेमध्ये कार्बन उत्सर्जन कमी करायला वेगवेगळे मार्ग अवलंबत आहेत. यामध्ये शेवटच्या अंतरांच्या वितरणासाठी इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये गुंतवणूक करणे, FedEx Ship Manager® Lite सारखे डिजिटल पर्याय वापरणे जेणेकरून ग्राहक त्यांची शिपिंग ची माहिती मोबाइल वरून भरू शकतील आणि वेळ वाचवू शकतील; शिवाय याचा खरा उद्देश कागद रहित एयर वे बिल म्हणजे कागदांची बचत आहे. या शिवाय, FedEx पुनर्निर्मिती आणि पुनर्वापर करता येऊ शकणारे पॅकेजिंग वापरुन शिपींग प्रक्रियेतील कचऱ्याचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे.
कोणत्याही लघु आणि मध्यम उद्योगांसाठी प्रभावी इ एस जी धोरण तयार करने ही एक पेक्षा जास्त वैयक्तिक विजयांची बेरीज आहे. सामान्य ग्राहकाभिमुख एन्टरप्राइझने केलेल्या एकूण ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जनापैकी ८०% पेक्षा जास्त उत्सर्जन त्यांच्या अंतर्गत कामांच्या बाहेरून होते, मुख्यत्वे उत्पादनातून आणि त्यांच्या पुरवठा साखळीतून कुठून तरी ते होते. या साखळीतील एक जुडलेली कडी म्हणून ग्राहकांच्या अपेक्षांना पूर्ण करण्यासाठी आणि पृथ्वीवरील या संपूर्ण प्रक्रियेचा प्रभाव कमी करण्यासाठी लॉजिस्टिक्स प्रदात्यांची सुद्धा एक भूमिका असते.
What’s next in E-Commerce Survey बाबत:
हे ऑनलाइन सर्वेक्षण हॅरिस इंटरअॅक्टिव द्वारे जुलै २०२२ मध्ये ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, भारत, मलेशिया, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, तैवान, व्हिएतनाम, फिलीपिनस् आणि थायलंड या ११ बाजारपेठांमध्ये घेतला गेला. प्रत्येक बाजारपेठातील २५० हून कमी कर्मचारी असलेले व इ-कॉमर्स मध्ये काम करणारे ३०० लघु आणि मध्यम उद्योजक आणि त्याबरोबर १८ वर्षाच्या वरील ५०० ग्राहक (भारतामधील १००० ग्राहक) या मध्ये समाविष्ट करण्यात आले.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi