गोदरेज मायक्रोवेव ओव्हनच्या मदतीने आता एयर फ्राइड पदार्थ बनवा ९० टक्क्यांपर्यंत कमी तेलात I

मुंबई, २० ऑक्टोबर २०२२ – सणासुदीचे दिवस जवळ येत असल्यामुळे गोड आणि तळलेल्या पदार्थांचा आस्वाद घेण्याची शक्यता

सर्वाधिक असते, पण ते खाल्ल्यानंतर अपराधीपणाही वाटतो. ही दुहेरी मनस्थिती कमी करण्यासाठी गोदरेज मायक्रोवेव ओव्हन्सच्या कनव्हेक्शन मायक्रोवेव ओव्हन्समध्ये ऑइल फ्री हेल्थ फ्राय मोड देण्यात आला असून त्यामुळे हे अगदी योग्य दु इन वन मशिन बनले आहे. या सुविधेमुळे स्वयंपाकघरातील ओट्यावर वेगवेगळी उपकरणे वापरण्याची गरज संपली आहे. यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे फ्रेंच फ्राइजसामोसेभजीकटलेट्स असे तुमचे आवडीचे विविध पदार्थ नेहमीच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा ९० टक्क्यांपर्यत कमी तेलात बनवता येतात आणि मुख्य म्हणजे चवही तशीच राहाते.

ऑइल- फ्री हेल्थ फ्राय मोडमध्ये उच्च वॉटेज क्वार्ट्झ आणि एलिमेंटरी हीटर समाविष्ट करण्यात आला आहे, जो उष्णता देतो व खाण्याच्या पदार्थावरून सर्वत्र समान पद्धतीने पसरवतो. यामुळे पदार्थ चांगल्या पद्धतीने शिजतो. विशेष म्हणजे, मायक्रोवेव ओव्हन कॅबिनेटच्या उच्च क्षमतेमुळे यात नेहमीच्या एयर फ्रायरच्या तुलनेत पदार्थ एरवीपेक्षा ३३ टक्के कमी वेळात आणि ३ पट जास्त प्रमाणात शिजवता येतो व चवही टिकून राहाते. हा ओव्हन स्वयंपाकाच्या शिजवणे, तळणे, ग्रिल, बेक, आंबवणे, भाजणे, कुरकुरीत करणे, वाफवणे, कळी आणणे अशा सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करणारे परिपूर्ण उपकरण आहे.

याविषयी गोदरेज अँड बॉयसची प्रमुख कंपनी असलेल्या गोदरेज अप्लायन्सेसचे व्यवसाय प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी म्हणाले, ‘महामारीनंतर भारतीय आरोग्याविषयी जास्त जागरूक झाले असून ते त्यांच्या खरेदीतून व निवडीतून दिसून येत आहे. महामारीनंतर मायक्रोवेव ओव्हन्सच्या खरेदीमध्ये वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षात या श्रेणीमध्ये किमान १५ टक्क्यांची वाढ होईल असा अंदाज आहे. गोदरेज अप्लायन्सेसमध्ये आम्ही विचारपूर्वक तयार केलेली उत्पादने बनवून ग्राहकांना त्यांचे आरोग्य व स्वास्थ्य जपण्यासाठी मदत करण्यावर भर देतो. आमच्या कन्व्हेक्शन मायक्रोवेव ओव्हन्समधील ऑइल- फ्री हेल्थ फ्राय मोड हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. स्वयंपाकघरातील जागा मर्यादित झाली आहे, शिवाय ग्राहकांना ते खात असलेल्या पदार्थांची चव किंवा प्रकार यामध्ये तडजोड कारावी लागते. आमचा सर्व सुविधांनी युक्त आणि वापरण्यास सोपा कन्व्हेक्शन मायक्रोवेव म्हणूनच चांगल्या आरोग्याच्या तुमच्या प्रवासात चव किंवा प्रकाराबाबत तडजोड न करता साथ देतो.’

या ओव्हनमध्ये 375 पर्यंत प्री- प्रोग्रॅम्ड भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पदार्थांच्या पाककृती देण्यात आल्या आहेत. वेगवेगळे स्वरुप आणि रंगांत तसेच क्षमतेमध्ये – 20L, 23L, 25L, 28L, 30L, 33L आणि 34L उपलब्ध असलेला हा मायक्रोवेव ओव्हन सर्व स्वयंपाकघरांसाठी साजेसा आहे. मॅग्नेट्रॉनवर 5 वर्षांची वॉरंटी आणि संपूर्ण मायक्रोवेव ओव्हनवर 1 वर्षाची वॉरंटी व कंपनीची विस्तारित विक्रीपश्चात सेवा, ऑफलाइन तसेच अमेझॉन, फ्लिपकार्ट अशा ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर असलेली सहज उपलब्धता यांमुळे सणांच्या या काळात हे उत्पादन तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम गुंतवणूक ठरेल.

Microwave Oven with Health Fry Mode
Microwave Oven with Health Fry Mode

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *