अल्ट्राटेक सिमेंटला नफ्यात ७% ची घटI
अल्ट्राटेक सिमेंटला नफ्यात ७% ची घट
अल्ट्राटेक सिमेंट ने दिलेल्या माहितीनुसार, जून २०२२ अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ७.४५% ची घट झाली असून हि रक्कम रु. १५८२/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १७००/- कोटी होती.
या तिमाहीत महसूल रु. १५,१६३.९८/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ११,८२९.८४/- कोटी होती.
कंपनीचा विस्तार प्लॅन तयार असून २०२३ मध्ये त्याची अंमलबजावणी होईल. यामुळे कंपनीची क्षमता १५९.२५ मिलियन टन प्रति वर्ष ने वाढेल व हि कंपनी जगातील ३ री मोठी सिमेंट कंपनी ठरेल.
कंपनीने या तिमाहीत एकूण क्षमतेच्या ८३% कॅपॅसिटी वापरली आहे. या तिमाहीत एकूण उत्पादन १७% ने तर महसूल ३४% ने वाढला आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo