बाटा इंडियाला निव्वळ नफ्यात दुपटीने वाढ I Bata India profit doubles I
बाटा इंडियाला निव्वळ नफ्यात दुपटीने वाढ
बाटा इंडिया लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात दुपटीने वाढ झाली असून हि रक्कम रु. ६२.९६/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. २९.४७/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता. ऑपरेटिंग महसुलात १२.७७% ची वाढ झाली असून रु. ६६५.२४/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५८९.९०/- कोटी होती. एकूण खर्चात ६.२९% ची वाढ झाली असून रु. ५९९.३९/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५६३.९०/- कोटी होती. कंपनीने २२ नवे फ्रेंचायसी स्टोर सुरु केले आहेत. मार्च २०२२ अखेर आर्थिक वर्षात कंपनीला रु. १०२.९९/- कोटींचा एकत्रित निव्वळ नफा झाला आहे. मागील वर्षी कंपनीला रु. ८९.३१/- कोटींचा निव्वळ तोटा झाला होता.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo