भारती एअरटेलने मुदतीपूर्वीच केली कर्जाची परतफेड I Bharti Airtel repaid loan before time I
भारती एअरटेलने मुदतीपूर्वीच केली कर्जाची परतफेड
२०१५ मधील लिलावात विकत घेतलेल्या एअरवेव्हज करिता भारती एअरटेल ने रु.८८१५/- करोडची परतफेड टेलिकॉम डिपार्टमेंटला दिले असून यामुळे व्याज बचत व कॅश फ्लो सुधारणा होणार असल्याचे कंपनीने सांगितले. हि परतफेड नियोजित तारखेआधीच केली आहे. कंपनी 4G च्या विस्तारासाठी कार्यरत आहे. मे – जून मध्ये होणाऱ्या 5G स्पेक्ट्रम सेल मध्ये कंपनी भाग घेणार आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२७ व वर्ष २०२८ करिता असलेले इंस्टालमेंट ची परतफेड २०२२ मधेच केली आहे. कंपनीने मागील ४ महिन्यांत रु.२४,३३४/- करोड ची परतफेड, नियोजित परतफेड तारखेआधीच केल्या आहेत. या कर्जावर कंपनीला १०% व्याजदर आहे. मागील वर्षी कंपनीने टेलिकॉम डिपार्टमेंट ला २०१४ मध्ये खरेदी केलेल्या एअरवेव्ह्ज चे रु.१५,५१९/- करोड ची परतफेड केली होती.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo