अदानी विल्मर तांदूळ ब्रँड विकत घेणार I Adani Wilmar to buy Rice Brand I

अदानी विल्मर तांदूळ ब्रँड विकत घेणार

अदानी विल्मर कंपनी देशभरातील प्रख्यात तांदूळ ब्रँड चे मालकीहक्क व प्रोसेसिंग युनिट्स विकत घेणार

कमोडिटी क्षेत्रातील प्रख्यात कंपनी अदानी विल्मर च्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या विविध राज्यातून कंपनी तांदळाचे लोकल ब्रँड व प्रोसेसिंग युनिट्स खरेदी करणार आहे. याकरिता वेस्ट बंगाल पासून सुरवात केली असून फॉरचून या ब्रँड ने विक्री केली जाईल. वेस्ट बंगाल मधील हे युनिट कंपनीने घेतले असून या युनिट ची क्षमता ३० ते ३५ मिलियन टन आहे. बासमती तांदूळ विभागात कंपनी कार्यरत आहे. परंतु एकूण दैनंदिन वापरात या तांदुळाचे प्रमाण १०% आहे. त्यामुळे इतर लोकल ब्रँड चे तांदूळ हे एक मोठे मार्केट असून त्यात आम्ही काम करणार आहोत अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अंगशु मलिक यांनी दिली. नॉर्थ व साऊथ इंडिया मध्ये कंपनी विविध तांदूळ ब्रँड व युनिट्सच्या शोधात आहे.

Adani Wilmar rice brand Mar 2022
Adani Wilmar rice brand Mar 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 4
Avadhut sathe 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *