डॉ संदिप माळी यांना ‘बेस्ट इन्शुरन्स ऍडव्हायझर’ सन्मान I Dr Sandeep Mali ‘Best Insurance Advisor’

डॉ संदिप माळी यांना ‘बेस्ट इन्शुरन्स ऍडव्हायझर’ सन्मान I Dr Sandeep Mali ‘Best Insurance Advisor’

डॉ संदिप माळी गाव कुंडल, सांगली यांनी वयाच्या १९ वर्षापासुन सहकारी बॅंके मधुन क्लार्क म्हणून नोकरी करण्यास सुरूवात केली. ११ वर्षानंतर ती नोकरी सोडुन समाजसेवा नावाची ७० लाख ठेवी ८० लाख कर्जे आणि ५५ लाख ठेवी अशी अडचणीत असलेली पतसंस्था चालवायला घेतली. खुप अडचणी होत्या. त्यातूनच मार्ग काढत आज १३ वर्षात या संस्थेच्या ठेवी २० कोटी झाल्या आहेत. शिवाय ४ मजली स्वमालकीची इमारत सुद्धा झाली आहे.

पूरग्रस्त लोकांना रुपये ५ लाखाची मदत, अनाथ व मतिमंद मुलांच्या शाळेना कॉम्प्युटर, शालेय साहित्य वर्षी दिले जाते. अशी अनेक सामाजिक कामे सुद्धा केलेली आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने माळी यांची संचालक म्हणून निवड केली आहे. सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय सहकार परिषदमधे पतसंस्थाविशयी मत मांडण्याची संधी डॉ संदिप माळी यांना मिळाली आहे.

समाजसेवा पतसंस्था ही महाराष्ट्रातील एकमेव पतसंस्था आहे कि, जिथे कर्ज देताना लाईफ व हेल्थ इन्शुअरन्स करूनच दिले जाते. सन २०१७ ला फक्त ४५ दिवसात डॉ संदिप माळी यांनी इन्शुअरन्स मधे MDRT पूर्ण केले… त्यामुळे सहकारी संस्था मधे इन्शुअरन्स कसे करायचे याबाबतीत इन्शुअरन्स कंपनी त्यांना बऱ्याच ठिकाणी लेक्चर देण्यासाठी नेउ लागली. आज पर्यंत १४ देशा मधे जाण्याच्या योग आला आहे.

सहकारातील चांगल्या कामामुळे बॅंकॉक येथे कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी तर्फे डॉ संदिप माळी यांना डॉक्टरेट ( PHD) ची पदवी प्रदान करण्यात आली.

सहकार ,सामाजिक व बॅंकिंग क्षेत्रातील ५० हुन अधिक पुरस्कार डॉ संदिप माळी यांना मिळालेले आहेत.

Dr Sandeep Mali
Dr Sandeep Mali

दिनांक १६ नोव्हेंबर २०२० रोजी जनसेवा नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली आणि आज फक्त ४६ दिवसात या संस्थेकडे ६ कोटी ठेवी जमा झाल्या आहेत. कर्जे ४ कोटीची आहेत. याच दरम्यान शरद मल्टीस्टेट या १०० कोटी ठेवी असणाऱ्या क्रेडीट सोसायटीच्या चेअरमनपदी डॉ संदिप माळी यांची निवड झाली. आता या संस्थेच्या १०९ शाखांची मंजूरी घेतलेली आहे, त्या ही टप्याटप्याने सुरु होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *